महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,26,405

सुप्रसिद्ध नृसिंह मंदीर, भातोडी (भातवडी)

By Discover Maharashtra Views: 3360 2 Min Read

सुप्रसिद्ध नृसिंह मंदीर, भातोडी (भातवडी)

नृसिंह मंदीराची स्थापना १३०० -१४०० या काळात झाली आहे. कान्हो नर्सो नावाचे प्रधान हे शाही दरबारात होते. त्यांनी या मंदीराची स्थापना केली आहे, मंदीराला भक्क्म तटबंदी करुन त्यावर मंदीर बांधलेलेआहे. मंदीराचे संपुर्ण बांधकाम दगडी आहे. मंदीराच्या समोर मेहकरी नदी आहे या नदीचा उगम जवळील गर्भगिरी डोगंररागेतील परीसरातुन झालेला आहे. या मंदीराचे प्रतीरुप पाकिस्तानात कराची मधील नरसिमपाल या भागात आहे असे बोलले जाते. दरवर्षी नृसिंह जयंतीच्या काळात या ठिकाणी जयंती उत्सव साजरा होतो, त्या वेळी राज्य आणि देशभरातुन भाविक गावास भेट देतात. भातोडी गावाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, इतिहासात 1624 मध्ये झालेली “भातवडीची लढाई” गनिमी काव्यासाठी सुप्रसिद्ध आहे. या लढाईमध्ये शहाजीराजेनी मोठा विजय मिळवला, परतुं, या लढाईमध्ये शहाजीराजेंचे धाकले बंधु व छत्रपती शिवरांयाचे चुलते शरीफजीराजे भोसले हे धारातीर्थी पडले. शरीफजीराजे भोसले यांचे समाधीस्थळ याठीकाणी आहे.

अहमदनगर शहरा पासुन भातोडी गाव नगर – बीड रोडवर 18 कि.मी. आहे.

The Famous Narsingh temple –

Village – Bhatodi (Bhatwadi) Tal. Dist. – Ahmednagar

The Narasimha Temple was established during the period of 1300-1400 century. A chief named Kanho Narso was in the royal court. He has set up this temple, the temple has been fortified and has been built on it. The whole work of the temple is of stone. In front of the temple the river is known as Mehkari river. The river originates from the garbhgiri hills in nearby area. The replica of this temple is said to be in the Narasimha pal area of ​​Karachi, Pakistan. Every year during Nrusinha Jayanti, a grand festival is celebrated at this place, during which devotees from all over the state and the country visit. Bhatodi is also known for its historical significance, the “Battle of Bhatwadi” is well known in history. Also, the Samadhi of Shahaji Raje’s brother and Chatrapati Shivaji Maharaj Uncle Sharifji Raje Bhosale is in the village. Bhatodi village is only 18 km away from Ahmednagar city on Nagar- Beed road.

– दत्ता लबडे, भातोडी (अहमदनगर)

Leave a Comment