नैसर्गिक दगडी स्तंभ, मुकादमगुडा, चंद्रपूर –
जिवती पासून साधारणता 15-20 कि.मी. अंतरावर मुकादमगुडा नावाचे गाव आहे. या गावाला लागूणच काही अंतरावर नाला वाहतो. या नाल्याजवळ डोंगर आहे. या डोंगरावर दगडांचे अनेक खांब आहेत. प्रथमदर्शी बघता हे खांब कृत्रिम असल्याचे वाटतात. मानवांनी मंदीर बांधकाम वा इतर बांधकामासाठी तयार केले असावेत, असे वाटतात. मात्र तसे नाही. हे दगडी खांब नैसर्गिक आहेत. अश्या दगडांना Columnar Basalt ( कॉलमार बेसाल्ट ) म्हणतात. असे दगड ज्वालामुखीचा लावा पासून बनतात. लावा कोणत्या स्थितीत व कसा थंड झाला, यावर दगडांची संरचना ठरते.
जर मुकादमगुडा येथील दगड Columnar Basalt असतील तर लाखो वर्षापुर्वी जिवतीचा भुभागावर जिवंत ज्वालामुखी अस्तित्वात होते, असे म्हणता येईल. अर्थातच हे दगड Columnar Basalt आहेत, हे केवळ भारतीय भुवैज्ञानिक सर्वेक्षण विभागातील तज्ञच सांगू शकतील.
(फोटो आणि माहिती – Nilesh Zade)