नवकंडम आणि अरिकंडम –
पूर्वीच्या काळात विशेषतः दक्षिणेकडे युद्धात पराभूत राजास जिवंत पकडून मारून टाकत ..ही प्रथा अगदी पाचव्या सहाव्या शतकात भारतात प्रचलीत होती..बदामीचे चालुक्य आणि कान्ची पल्लव या दोन घराण्यातील रक्तरंजित संघर्ष प्राचीन भारताच्या अभ्यासकाना माहिती आहेच..तर नवकंडम म्हणजे स्वतःचे नऊ भाग करणे आणि मरणे. अरिकंडम म्हणजे स्वतःला एकदा कापून मरणे. या दोन्ही पद्धती प्राचीन तमिळ संस्कृतीचा एक भाग आहेत… मृतांच्या स्मरणार्थ उभारलेली स्मारके तामिळनाडू पासून आंध्र प्रदेश व तेलंगणा महाराष्ट्रात भागात आढळतात…काही ठिकाणी शिलालेख कोरलेले आहेत..
भारतातील प्राचीन पौराणिक साहित्यात राजाला देवाच्या बरोबरीचे म्हणून गौरवण्यात आले आहे… विशेषतः तमिळ साहित्यात राजाराजा चोल याचा विष्णूचा अवतार म्हणून उल्लेख करतात . त्याचप्रमाणे कलिंगथुप्पाराणीने कन्नने (विष्णू) कुलोत्तगंथुंगा चोल म्हणून जन्मल्याचा उल्लेख केला आहे.अशा राजाचे कल्याण हे प्रत्येक नागरिकावर ऋण होते.म्हणूनच राज्याच्या कल्याणासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या प्राणांची आहुती दिली पाहिजे अशी धारणा होती..काही लोक आपला प्राण राजासाठी राखून ठेवत ..
काही जाती भारतात होत्या ज्या राजासाठी आपला प्राण राखून ठेवत.त्यांच्या साठी स्मारक उभी करीत.कन्नड मध्ये वेळळोवेळी कल्ल बघायला मिळतात त्याना आपण मराठीत वीरगळ म्हणतो तो शब्द कन्नड भाषेतून आला आहे .. युद्धांच्या काळात राजा मरण न घेता विजयी होऊन परतला तर आनंदाने काही लोक प्राणत्याग करत .जी लोक स्वतःचा इच्छेने प्राण देतात त्याच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जायची.व अशा मृत व्यक्तीची स्मृती जागवली जायची……या प्रकारास नवकान्डम म्हणत.. यात फक्त पुरुषांनीच नवकांड दिल्याचे पूर्वी मानले जायचे परंतु हल्ली स्त्रियांच्या अनेक मूर्ती तमिळ आंध्र व तेलगंणा राज्यात सापडल्या आहेत.
यात दुसरा एक प्रकार होता एखादा राजा आजारपणामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर असेल तर आणि त्या राजाला त्याच्या काही योजना स्वप्न अथवा काही कर्तव्ये पूर्ण करायची राहून गेली असल्यास..तो मृत्यूच्या सावटाखाली असल्यास तो आपला मृत्यू पुढे ढकलण्यासाठी परमेश्वराला नवस करायचा आणि तो नवस केल्यावर काही कालावधी नंतर ते कार्य कर्तव्य पार पाडल्यानंतर आवश्यकतेनुसार ते त्या देवतेसमोर नवकांड देत असत..
अनेक राजे युद्धात पराभूत होऊन कैद झाले आणि ते पराभव व अपमान सहन करू शकले नाहीत. पराभूत होऊन परत आल्यावर असा अपमान मिळाल्यावर त्याना जगायची इच्छा होत नसायची आणि त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येत असत..अशा वेळी मरायचे तर आहेच. पण त्यांना भित्र्यासारखे मरायचे नाही.. त्यांना वीर मरायचे आहे..अशी पराभूत राजे व त्यांचे अंगरक्षक सैनिक नवस करून नवकांडम द्यायचे..त्यात प्रामुख्याने जे सैनिक राजांच्या मुख्य सुरक्षा दलात होते त्याच्यावर राजाच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी होती असे सैनिक तुकडी असत..तमिळनाडु मधील प्रसिद्ध अशा चोल साम्राज्याच्या राजाच्या संरक्षणासाठी “वेलकरा सैन्य” होते आणि पांड्य राजासाठी “तेन्नावन ” हे सैनिक होते …त्यांनी राजाच्या जीवाला धोका झाला तर दुर्गा देवीच्या समोर स्वत: च्या हातांनी आपले डोके कापून आत्मबलिदान करण्याची शपथ घेत असत…तेव्हा .. त्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा आज्ञाभंगामुळे राजाच्या जीवाला धोका झाला राजाला आपला जीव गमवावा लागला तर . ते पराभूत सैनिक देवीला नवकंदम अर्पण करत असत.ते डेजंर होते..मध्ययुगीन कालखंडात पराभूत राजाला जीवदान देण्याचं धोरण मोघल सम्राट अकबराने आखल्याच मानलं जाते…नवकडंम आणि अरिकडंम याचा अपभ्रंश होऊन देवीचा निस्सीम भक्त असलेल्या कदंब राजघराण्याची व तेथून महाराष्ट्रातील तुलजाभवानी देवीचे मुख्य पुजारी कदम यांच्या आडनावाची उत्पत्ती झाली नसेल का ?नवकंडम.
आत्मपिडक उपासना हिंदु जैन धर्मात व तंत्रिक पंथात होती.. ..ती मोठ्या प्रमाणात प्राचीन काळात मिसळून ही गेली… पूर्वी ज्या भागात तंत्रिक पंथाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला त्याठिकाणी आत्मपिडक उपासना आजही बघायला मिळते ..भारतातील मोठमोठ्या राजघराण्याचा परस्पराशी संघर्ष चालायचा लढाया व्हायच्या परंतु ते देवसत्तेला मानित … राजसत्तेहून देव सत्तेचे स्थान उच्च आहे किंबहुना ते सर्वोच्च आहे अशी ती प्रामाणिक भावना त्यांच्यात होती म्हणून तर भारतातील अनेक लेणी अंजठा वेरूल बदामी लेणी व रामेश्वर मंदिराचा विस्तार अनेक सत्ताधारी राजानी केला …..
आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी ला डाव्या हाताची करंगळी कापून द्यायची प्रथा होती… राष्ट्राकूट राजघराण्यातील नृपती अमोघवर्ष यांनी प्रजेच्या रक्षणासाठी इस सन 871 मध्ये करंगळी कापून अर्पण केली …..तसे शिलालेख देखील मिळाले आहेत …अंहिसा धर्माचा समर्थक असलेला स्वतः जैन धर्माचा एक चक्रवर्ती सम्राट असलेला राजा अमोघवर्ष हा जर कोल्हापूर महालक्ष्मीला करंगळी देत असेल तर याचा सरळ अर्थ निघतो करंगळी समर्पण हा समकालीन तंत्रिक प्रभावाखाली एक भाग होता सत्ताकक्षातील लोकांच्या भावनाचा आदर राजा करायचा …लोक राजाला उगीच विष्णू मानित नव्हते …तो प्रतिपालक आहे .राजासाठी व देशासाठी प्राण देण तो प्राण राखून ठेवणारी लोकच वेगळे होती..
विशाल फुटाणे
MA Mphil इतिहास व पुरातत्व संशोधक, सोलापूर