!! शिवाजी महाराजांचे आरमार !!
भाग ३
(क्रमश्यः)
कुलाब्याचा बराचसा भाग आणि जवळजवळ संपुर्ण रत्नागिरी जिल्हा इसवी सन १६६३ पर्यंत ताव्यात आल्यावर शिवाजी महाराजांनी यथाकाळ प्रसंग साधुन आपले लक्ष सध्याच्या कर्नाटक किनार्याकडे वळविले इ.स.१६६५ मधे शिवाजी महाराजांनी बसरुर लुटले आणि इ.स. १६६५ पर्यंत फोंडे, सोंधे, कारवार ताब्यात आणल्यामुळे त्यांचा अमल दक्षिनेस गंगावळी नदी पर्यंत बसला. उत्तर कोकनापासुन कर्नाटकातील गंगावळी पर्यंत जंजिरेकर सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज या सागरी सत्ता सागरी किणार्यावर प्रमुख होत्या त्यांच्याशी शिवाजी महाराजांना स्वराज्याचे आरमार बळकट करण्यासाठी युद्धे करावी लागली. अहमदनगर ची नीजामशाही इ.स.१६३६ ला नष्ट झाल्यावर सिद्धी विजापुर चा अदिलशाहा च्या नोकरीत रुजु झाला.
अदिलशाहाचा समुद्रावरील वॅपार व मक्केच्या यात्रेला जाणारे मुसलमान यांना संरक्षण देणे हे त्याची जबाबदारी असुन, त्यांच्याकडे त्याचा मुळाचा दंडा- राजापुरी, जंजिरा, या विभागापासुन बानकोटापर्यंतचा भाग देण्यात आला होता. शिवाजी महाराजांनी कुलाबा जिल्ह्याचा पुर्वभाग आपल्या ताब्यात आणल्यावर त्यांचा सिद्धीसी संघर्ष सुरु झाला. सिद्धी प्रमुख फतहखान याने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर हल्ले केले. शिवाजी महाराजांनी सिद्धीच्या पारिपत्याकरीता रघुनाथ बल्लाळ कोरडे यांच्या नेतृत्वाखाली ५ -७ हजार सैन देउन सिद्धी विरुद्ध रवाना केले. त्याने तळे, घोशाळ वगैरे महत्वाचे किल्ले देऊन शेवटी दंडा राजापुरी हे किनार्यावरील मोक्याचे ठीकाण देण्यास सिद्यास भाग पाडले व तह झाला.
शिवाजी महाराजांनी दंडा राजापुरीची मजबुती करुन लिंगाणा वगैरे किल्ले बांधल्यामुळे सिध्याच्या किनारपट्टीवरील धाडीस पायबंद बसला. शिवाजी महाराजांनी सिद्धींला कायमचा नेस्तनाबूत इ.स.१६६९ मध्ये जंजिरा या त्यांच्या किल्ल्यावर हल्ला चडविला. इ.स.१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी आपली सर्व सागरी शक्ती एकवटली. फतहखान या सिद्धीच्या प्रमुखास शिवाजी महाराजांनी जहाजीरीचे आमीश दाखवुन जंजिरा ताब्यात देण्यासाठी फीतवले पण फतहखाना विरुद्ध बंड झाले व सिद्धी संबळ याची मोगलांच्या नौदलाधिकारी पदी नेमनुक झाली. त्याच्या हाता खाली सिद्धी कासीम यास जंजिरा अधिकारी नेमण्यात आले. आणि सिद्धी खैरीयत याची नेमनुक किल्ल्यावर झाली.
याला शह देण्याकरीता शिवरायांनी इ.स.१६७० च्या नोव्हेंबर मध्ये जंजिरा पासुन दहा मैल अंतरावर नांदगाव जंजिरा किंल्ल्यास वेढा घालण्या करिता १६० जहाजे १०,००० घोडे २०,००० सैन्य जमा केले. सुरुंग लावण्याचे सामान व हत्यारे ही तयार ठेवली होती. या नौदलाचा बेत गुप्तपणे सुरतेकर खुष्कीने शिवाजी महाराजांनी स्वारी केली म्हणजे दर्यातुन त्याना जाऊन मिळणे असा होता. हा बेत तडीस नगेल्याने शिवाजी महाराजांचे आरमार मुंबई ला वळसा घालून माहीमकडे गेले व बेत बदलल्याने परत फिरले. पुढे दमण जवळून जात असताना त्यांच्या नौदलाधिकारी यानी १२,००० रु. किमतीचा माल घेऊन जाणारे पोर्तुगीजांचे जहाज पकडले. पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांच्या आरमारावर हल्ला करुन त्यांची बारा जहाजे पकडुन नेली; पण बाकीची दाभोळ कडे निसटली. सिद्धी कासीम ने इ.स. १६७१ मध्ये मराठ्यांच्या ताब्यातील दंडा राजापुरी चा किल्ला हल्ला करून जिंकुन घेतला. तो परत मीळवण्या करिता इंग्रजांची मदत व्हावी म्हणून वकील पाठवुन शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. तो बेत फसला.
संदर्भ:-
¤ शिवाजी महाराजांचे आरमार:- भा.कृ.आपटे,
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला
{क्रमश्यः}