महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,05,920

शिवाजी महाराजांचे आरमार भाग ४

Views: 3909
3 Min Read

!! शिवाजी महाराजांचे आरमार !!

भाग ४
(क्रमश्यः)

इसवी सन १६७२ च्या अखेरीस औरंजेब बादशहा ने सुरतेशरुन सिद्धीच्या मदतीसाठी ३६ जहाजांचा एक काफीला पाठविला. त्या जहाजांनी शिवाजी महाराजांच्या आरमारात धुमाकूळ घातला या काफील्याने शिवरायांच्या आरमाराची तब्बल ५०० तारवे नष्ट केली आणि तो मुंबई बंदरात शिरला. या वेळी गुप्तपणे फ्रेंचानी शिवाजी महाराजांच्या आरमारास ८० तोटा व २००० मन शिसे विकले. डचांनी शिवाजी महाराजांनी मुंबई घेण्यासाठी त्याना ३००० सैनिक मागीतले व मोबदल्यात त्यांनी शिवाजी महाराजांना दंडा राजापुरी घेण्यासाठी २२ जहाजे द्यावीत या अटीवर बोलनी सुरु केली. ती फलदृप झाल्याची दिसत नाही. परत इ.स.१६७४ सिंद्दी संबळने शिवरायांच्या एक नौदलाधिकारी दौलतखान यावर सातवळीच्या खाडीत हल्ला केला. सिद्याचा प्रराभव होऊन तो हरेश्वर कडे निघुन गेला.

इ.स. १७७५ च्या सप्टेंबर महिन्यात ५७ जहाजे जमवुन जंजिरा जिंकण्याचा अटीतटीचा प्रयत्न केला. त्या ५७ जहाजां पैकी १५ गुराबा असून बाकीची गलबते होती. जंजिरा जेरीस आनन्याकरीता किनारपट्टीवर शिवाजी महाराजांनी तरते तराफे तयार केली. आरमाराने वेढा दिला. किनार्यावर मोरोपंथ पेशव्याच्या अधिपत्याखाली १०००० सैन्य जमा झाले. सिद्धी कासीम हा आरमार घेऊन आला. त्याने मराठ्यांचा आरमाराची व तरफ्यांची फळी फोडली आणि जंजिरा किल्ल्यावरील हल्ला अयशस्वी झाला. पुढे इ.स.१६७८ ते १६८० सिद्धी व शिवाजी महाराज यांच्यात जळपोळ एखीदी चकमक चालुच होती. त्यात इसवी सन १६७८ मध्ये दर्यासारंग व दौलतखान यांना ४००० सैन्य देऊन शिवाजी महाराजांनी पनवेलातुन रवाना केले. याचा उद्देश सिद्ध्याचे माजगाव येथे नांगरुन ठेवलेले आरमार जाळणे, पण तो बेत फसला.

जंजिरा घेण्याचा बेत हा सदैव फसत गेला याचे मुख्य कारण म्हणजे कमकुवत सिद्धीला ऐनवेळी इंग्रज व पोर्तुगीज यांच्या कडुन मदत मिळत गेली. कमकुवत सिद्धीला शक्तिशाली शिवाजी महाराजांविरुद्ध मदत करणे हे त्यांचे धोरण होते. सिद्धीने शिवाजी महाराजांच्या आरमारात विरुद्ध स्वबळावर लढला नाही तर त्याला ऐनवेळी इंग्रज व पोर्तुगीज यांची मदत मिळत होती. व जेव्हा मदत नाही मिळाली तेव्हा सिद्धी मार खाऊन, हार पत्करुन पळून जात होता. {आपण जंजिरा फीराय गेल्यावर यातील मुद्दे लक्षात ठेवावे, व तेथे गेल्यावर तेथील स्थानिक बोटवाले जो खोटा इतिहास सांगुन सिद्धींची लाल करतात त्यांना हा इतिहास सांगणे}

संदर्भ:-
¤ शिवाजी महाराजांचे आरमार”- भा.कृ.आपटे
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला

{क्रमश्यः}

माहिती संकलन
दुर्गवेडा कृष्णा घाडगे
कार्याध्यक्ष:- हिंदवी स्वराज्य फाऊंडेशन
अध्यक्ष:- हिंदवी स्वराज्य गडकोट समिती
Leave a Comment