!! शिवाजी महाराजांचे आरमार !!
भाग ५
(क्रमश्यः)
इसवी सन १६५७ मध्ये शहाजीराजे याच्या मुलाने वरच्या चौलचा ताबा घेतला आहे. (पोर्तुगीज कागदपत्रातील उल्लेख) शिवाजी महाराज कंल्याण भिवंडी व पनवेल येथे आरमार बांधत आहेत याची नोंद पोर्तुगीज दप्तरात घेतली आहे व त्याचा उल्लेख पाठीमागील भागात केलेला आहे. इ.स.१६६५ मध्ये ८५ तारवे घेऊन शिवाजी महाराजांनी बेदुरच्या राज्यातील बसरुरवर हल्ला केला त्यात त्याना भरपुर अमाप लुट मिळाली. हा हल्ला शिवाजी महाराजांच्या आरमारी सत्तेचा दर्शक असला तरी त्यात प्रत्येक्ष आरमारी लढाई झाली नाही. या मोहीमे नंतर मराठ्यांच्या आरमाराशी पोर्तुगीजांच्या आठ तारवांशी लढाई झाली.
शिवाजी महाराजांचे आरमार होनावर, बसरुर, गंगोळी,मंगळुर वगैरे कर्नाटकातील बंदरातुन १२० पडाव पकडुन नेत आहे, असी बातमी गोव्याच्या विजरई आंतोनियु द मेलु द कास्त्रु यास मिळाली. शिवाजी महाराजांची एकुन पंचवीस जहाजे होती. त्यापैकी तेरा पकडलेल्या पाडावात आघाडीवर होती व उरलेली पिछाडीस होती. मराठ्यांच्या आरमाराची व पोर्तुगीज आरमाराची मुगराजवळ गाठ पडुन पोर्तुगीजांनी मराठ्यांची आघाडीवरील तेरा तारवे पकडुन नेली. बाकीची जहाजे निसटली व सुखरुप पोचली. शिवाजी महाराजांनी वकीला मार्फत दिलगीरी व्यक्त केल्यामुळे पोर्तुगीजांनी मराठ्यांची आघाडीवरील पकडलेली तेरा जहाजे सोडुन दिली. या ठिकाणी शिवाजी महाराजांची विलक्षण बुद्धी दिसुन येते युद्ध न करता पकडलेली सर्व जहाजे सोडवू घेऊन गेले. शिवाजी महाराजांचे योग्य व अचूक नियोजन याचा प्रत्येय वारंवार पहाय मिळतो.
२६ मार्च १६६५ शिवाजी महाराजांच्या आरमाराने पोर्तुगीजांचे एक लढाऊ तारु पकडले. आनखी एक जहाज शिवरायांनी पकडले हे जहाज दमनहुन सुरतेकडे चालले होते. शिवाजी महाराज व पोर्तुगीज यांच्या मधील वादाचा प्रश्न म्हणजे दस्तकांचा (Cartares). ठराविक जकात देऊन दर्यावर संचार कराय पोर्तुगीज आपले दस्तक मोगल, अदिलशाही, व इक्केरीचे राजे यांना देत. पोर्तुगीज हिंदी महासागरावर आपले सार्वभौमत्व आहे असे मानीत. दस्तक विरहीत मराठ्यांची जहाजे ते पकडीत व शिवाजी महाराज ही पोर्तुगीजांची जहाजे कोनत्या न कोनत्या कारनाने पकडीत. शेवटी पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांच्या आरमाराला दर्यावर मोगलांना ज्या सवलती देत त्या सवलती देण्यास मान्य केले. यावरुन लक्षात येते की शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना ही जुमानले नाही व शेवटी पोर्तुगीजांसारख्या बलाढ्य आरमारी सत्तेला ही मराठ्यांच्या समोर झुकवले. जे मुगलांना, अदिलशाहा ला जमले नाही ते मराठ्यांनी म्हणजे च शिवाजी महाराजांनी व त्यांच्या आरमारी सत्तेने करुन दाखवले.
संदर्भ:-
¤ शिवाजी महाराजांचे आरमार:- भा.कृ.आपटे
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला
¤ पोर्तुगीज कालीन साधने
{क्रमश्यः}