महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,05,908

शिवाजी महाराजांचे आरमार भाग ६

Views: 3794
3 Min Read

!! शिवाजी महाराजांचे आरमार !!

भाग ६
(क्रमशः)

इसवी सन १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी काढला. त्यावेळी पोर्तुगीज कारागीर कामावर होते, (चित्रगुप्ताच्या बखरीतील उल्लेखा नुसार) पण कै.पांडुरंग पिसुर्लेकर यांच्या मताप्रमाने यास कागदोपत्री आधार नाही. कोकनच्या किनारपट्टीवर इंग्रजांनी वेलदोडे आणि मीरी याच्या व्यापाराकरीता राजापुरास १६४९ मध्ये वखार घातली. पुढे मुंबई बेटे पोर्तुगीजांकडुन त्यांना इ.स.१६६५ मध्ये मिळाली. इ.स. १६६८ मध्ये मुंबई इंग्लंडच्या बादशहाकडुन इष्ट इंडिया कंपनीकडे देण्यात आली. सत्तेचे संतुलण राखण्या करिता वृद्धींगत असलेल्या शिवाजी महाराजांच्या सत्तेविरुद्ध जमेल तेव्हा विजापुरकरांस जंजिरेकर सिद्धी ला किंवा मुगलांना सहाय्य करणे हे त्यांचे धोरण होते.

दंडा राजापुरी मराठ्यांच्या हातातुन गेली ती मीळवण्यासाठी व जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी व तोफांकरीता इंग्रजांची मदत मिळावी म्हणून शिवाजी महाराजांनी प्रयत्न पण ते व्यर्थ ठरले. हे इंग्रज पाताळ यंत्री, लबाड, घातकी हे शिवाजी महाराजांचे हाड वैरी होते. ते शिवाजी महाराजांच्या विरुद्ध सदैव जंजिरेकर सिद्धी ला, मुगलांना, अदिलशाही ला मदत करत. तसेच हा सिद्धी ही इंग्रजांना मदत करत आणि त्यांच्या जहाजांना मुंबई बंदरात नांगरुन राहण्यात परवानगी देत. त्यामुळे सिद्धीचे आरमार मुंबई बंदराचा आश्रय घेऊन शिवाजी महाराजांच्या किनारपट्टीवर उत्पात करीत. इंग्रजांचा हा विरोध मोडून काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुंबईच्या दक्षिनेस असलेल्या खंदेरी बेटाचा ताबा घेऊन तटबंदी करण्याचे ठरविले.खांदेरी बेटावरुन मुंबई बंदरावरील हालचाली टेहाळता येणार होत्या. आणि ते बेटे हातात आलि म्हणजे इंग्रज व सिद्धी या दोघांवर ही वचक बसणार होती. शिवाजी महाराजांना खांदेरी सहज घेऊन देणार नव्हते, ते विरोध हा करनारच. यातुन च खांदेरी ची आरमारी लढाई झाली. त्यावर सविस्तर जानून घेऊयात.

इंग्रजांवर वचक करण्याकरीता खांदेरी घेण्याचा बेत शिवाजी महाराजांनी इसवी सन १६७२ च्या एप्रिल महीन्यात केला. शिवाजी महाराजांचे आरमारी अधिकारी मायनाक भंडारी व दौलतखान यांनी खांदेरी वर मानसे उतरुन तटबंदी करण्यास सुरवात केली. इंग्रजांनी जोरदार विरोध केल्याने त्याना माघार घ्यावी लागली. पुढे सात वर्षांनंतर २७ ऑगस्ट १६७९ शिवाजी महाराज खांदेरी घेण्यासाठी जय्यत तयारी करीत आहेत ही बातमी मुंबई ला इंग्रजांना कळाली. २ सप्टेंबर १६७९ ला थळहुन मानसे व साहित्य खांदेरीवर रवाना होऊन तटबांधनी चे काम सुरु झाल्याचे समजताच इंग्रजांनी इनझाईन डॅनिएल ह्यूजेस यास तीन शिबाड देऊन खांदेरी व किनारा यांमध्ये नांगरट करण्यास सुरवात केली. बेटावर मराठ्यांची ४०० मानसे असुन त्यांनी मोक्याच्या ठिकाणी सहा तोफा डागल्या होत्या.

मुंबईच्या दुय्यम गव्हर्नराने खांदेरी व मुंबईच्या बेटाच्या परिसरात असलेल्यामुळे कायदेशीर इंग्रजांचे आहे व ते बेट मराठ्यांनी सोडुन द्यावे असे मायनाक भंडारी यांना कळवले. आपल्या धन्याच्या परवानगी शिवाय आपण काय करु शकत नाही असे मायनाक भंडारी यानी इंग्रजाना कळवले. पुर्वीच्या तीन सीबाडाच्या मदतीसाठी रिव्हेंज जहाज, मानसे व युद्धसाहीत्य भरुन पाठवण्यात आले.

संदर्भ:-
¤ शिवाजी महाराजांचे आरमार:- भा.कृ.आपटे
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला

{क्रमश्यः}

माहीती संकलन
दुर्गवेडा कृष्णा घाडगे
कार्याध्यक्ष:- हिंदवी स्वराज्य फाऊंडेशन
अध्यक्ष:-हिंदवी स्वराज्य गडकोट समिती
Leave a Comment