महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,05,904

शिवाजी महाराजांचे आरमार भाग ८

Views: 3742
3 Min Read

!! शिवाजी महाराजांचे आरमार !!

भाग:-८
(क्रमश्यः)

नोव्हेंबर च्या १६ तारखेस सिद्धी ५०० ते ७०० मानसे घेऊन इंग्रजांच्या मदतीस आला. त्याने नेहमीप्रमाणे किनारपट्टीवर धाडी मारल्याने दौलतखानास राग आला. त्याने इंग्रजांना त्या बाबत जाब विचारला. डिसेंबर अखेरपर्यंत परिस्थित सुधारणा झाली नाही. शत्रूचा डोळा चुकवून किनारपट्टीवर खांदेरी चा उपराळा करण्याचा उपक्रम मराठी जहाजांचा चालुच राहीला. त्यानी थळाच्या किनार्यावर तोफा ही उभारल्या. आपला टिकाव लागणार नाही इंग्रजांनी तहाची बोलणी सुरु केली. जाॅन चाईल्ड मुंबई चा दुय्यम गर्वनर व आन्नाजी दंत्तो पंडीत यांच्यात बोलणी होऊन तह झाला. १८/०१/१६८०. आन्नाजीने या तहास महाराजांची सम्मती मिळवुन देण्याचे आश्वासन दिले.

मैत्रीचा तह होऊन इंग्रजांनी मराठ्यांच्या शत्रुना मदत न करण्याचे मान्य केले. ३० जानेवारी स इंग्रजांचे आरणार मुंबई स परतले. मराठ्यांनी इंग्रजांचे पकडलेले कैदी व जहाजे देण्याचे मान्य केले. शिवाजी महाराजांना मोक्याचे खांदेरी चे बेट मिळाल्याने इंग्रज व सिद्धी यांना चांगलाच शह बसला. मराठ्यांपाशी एकंदर ४० ते ५० छोटी मोठी जहाजे असुन त्यावर सुमारे ४५० ते ५०० मानसे होती. त्यांची गलबते व गुराबा कमी वजनाची असल्याने खांदेरीच्या उथळ समुद्रात दृतगतीने हालचाली करु शकत. अक्षी नागावची खाडी मराठ्यांच्या जहाजास फार आश्रयास सोईची होती. जवळच कुलाब्याचा किल्ला होता. या मुळे मराठ्यांच्या मुख्य तळावर इंग्रज हल्ला करु शकले नाहीत.

शिवाजी महाराजांच्या आरमारात गुराबा, तरांडी, तारवे, गलबते, शिबाड, पगार या प्रकारची जहाजे असल्याचा उल्लेख सभासद बखर मध्ये आहे म्हणजे च कृष्णाजी अनंत सभासद सांगतो. मल्हार रामराव चिटनीस बखर मध्ये मचवे, बाभोर, तिरकती व पाल यांची नोंद सापडते. लढाऊ जहाजांत गलबत, गुराब व पाल ही प्रमुख होती. गलबतांपेक्षा गुराबा मोठ्या प्रमाणात असत आणि पाल सर्वात भारी असे. ही सर्व जहाजे उथळ बांधनीची म्हणजे लांबीच्या प्रमाणात अधिक रुंदीची असत. नाळीकडील भाग खुप निमुळता व उथळ असे, त्यामुळे त्याना समुद्राचे पाणि कमी घर्षनाने कापता येई. नाळीवर आलेले पाणि उघडेपणामुळे दोन्ही बाजुला वाहुन जाई. तीन डोल काठ्यांचे गुराब साधारण पणे ३०० टन वजनाचे असे व छोटे १५० टनांचे जहाजांवर तोफा असत. या जहाजांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पठानाची लांबी आणि नाळिच्या तुळइची लांबी सारखी असे. पठाणाच्या नाळीकडील भाग टोकदार असे.

संदर्भ:-
¤ कृष्णाजी अनंत सभासद बखर
¤ चिटनीस बखर
¤ शिवाजी महाराजांचे आरमार:- भा.कृ.आपटे
मराठ्यांचा इतिहास खंड पहीला

{क्रमश्यः}

माहीती संकलन
दुर्गवेडा कृष्णा घाडगे
कार्याध्यक्ष:- हिंदवी स्वराज्य फाऊंडेशन
अध्यक्ष:- हिंदवी स्वराज्य गडकोट समिती
Leave a Comment