महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,97,947

नवाश्मयुगीन शेती

Views: 1739
16 Min Read

नवाश्मयुगीन शेती –

शेतीचा प्राचीन पुरावा प्रामुख्याने पॅलेस्टाईन, इराक, मेसोपोटेमिया व इजिप्त या भागात मिळालेला आहे. एमर जातीचा गहू मोठ्या प्रमाणात लागवड करून या देशात पिकवला जाई.  सर्वात प्राचीन बार्लीची् लागवड केल्याचा पुरावा इराक मध्ये जार्मो या ठिकाणी मिळालेला आहे. या दोन्ही धान्याचा प्रसार पश्चिम आशियातून इतरत्र झाला असावा. अगदी अलीकडे तांदळाच्या लागवडीचा नवाश्मयुगीन पुरावा आग्नेय आशियात उपलब्ध झालेला आहे. शेतीतील उत्पन्न होणाऱ्या गहू ,बार्ली व्यतिरिक्त नवाश्मयुगीन मानव हा कंदमुळे व विविध फळे ही खात असावा. मात्र त्याच्या प्रयोग प्रयत्नपूर्वक लागवडीचा पुरावा मिळाला नाही. या काळात  इजिप्तमध्ये मानव मुळे खात असावा व चीन व इराण मधील अक्रोडाचा खाण्यासाठी वापर केला जात असावा. युरोपातील सफरचंदासारखी फळे खाल्ली जात असावी कारण त्याचा पुरावा नवाश्मयुगीन व त्यांच्या अवशेषात मिळालेला आहे.इजिप्तमधील शेतकरी तागाची ही लागवड करत असत असे दिसते.(नवाश्मयुगीन शेती)

भारतात शेती बद्दलचा पुरावा अपुरा असून तो पश्चिम आशिया इतका  विपुल नाही. काश्मीरमध्ये बुर्जझोम  येथे दगडी पाटे व शेतीस लागणारी दगडी फळासारखी हत्यारे मिळालेली आहेत. कर्नाटका टेकलकोटा येथे कुळीथाचा पुरावा मिळाला आहे. याव्यतिरिक्त काही गळीताची धान्येही पिकवली जात असावी असे दिसते.. दक्षिण भारतात आजही अनेक कृत्रिम तळे निर्माण केलेले आढळतात ही पद्धत महाश्मयुगीन लोकांनी प्रचलित केल्याचे मानले जाते. कदाचित नवाश्मयुगीन लोकांनीही दगड रचून अथवा कृत्रिम बंधारे बांधून शेतीसाठी पाणी साठवले असण्याची शक्यता आहे.

पशुपालन व पैदास याचा विचार केला तर नवाश्मयुगीन काळातील माणूस जो स्थिर आयुष्य जगायला लागला होता त्याला अन्ना बरोबर पशूंच्या उत्पन्नाची ही गरज भासली असावी आणि म्हणून तो नदीकाठी राहू लागला व अशा वस्तीभोवती निरनिराळे प्राणी ही येऊ लागले. पश्चिम आशियातील पुरावा उपलब्ध केलेला आहे तो पुरातत्त्वज्ञ व प्राणी शास्त्रज्ञ यांनी सिद्ध केले की मेंढी, शेळी, बैल व डुक्कर या क्रमाने हे प्राणी नवाश्मयुगात मानवाने पाळायला तसेच माणसाळवायला  लावण्यात यश मिळवले. त्यातील मेंढ्यांचा प्रकार उरियल जातीच्या मेंढ्या प्रथम पश्चिम आशियात माणसाळवल्या गेल्या. तेथून त्यांचा युरोपात प्रसार झाला. अत्यंत प्राचीन डुकराची हाडे इराणमध्ये मिळालेली आहेत. त्यातूनच पाळीव डुकरांची निपज झाली असावी. युरोप व आग्नेय आशिया इत्यादी विभागात आढळून येणारे विविध जातीची पाळीव डुकरे यांच्या संकरातून निर्माण झाले असावे. भारतात  वशिंडयुक्त बैलाची जात नवाश्मयुगापासूनच प्रचलित असल्याचे दिसून येते. युरोपामध्ये मात्र रानटी बैला द्वारेच हा  प्राणी माणसाळवला गेला.

वस्रे  व अलंकार यांचा विचार केला तर नवाश्मयुगीन काळात  सुतकताईचा आढळ दिसून येतो आणि त्यानुसार विणकाम केले जाईल असे सांगता येते. त्यासाठी मातीच्या आणि दगडाच्या पातळ टकळ्यांचा टोक यांचा उपयोग केला जाई. मागाचा पुरावा इजिप्त मधील नवाश्मयुगीन बदारी संस्कृतीच्या लोकांशी निगडित आहे. हे  लोक आडव्या मागावर विणकाम करीत. मागावरील विणकामाच्या वेळी उपयोगी ठरणारे,  मातीचे बनवलेले वजनदार गोळे बरोबरच इजिप्त बरोबरच तुर्कस्तानातील हिस्सारलिक येथे व उत्तर फ्रान्समधील नवाश्मयुगीन वसाहती सापडलेली आहेत.

नवाश्मयुगाच्या लोकांनी अलंकाराचाही वापर केलेला दिसून येतो. इजिप्त, इराण मध्ये ज्या मातीच्या मूर्ती सापडले आहेत त्यांना लुंगी सारखे वस्त्र नेसत असे  दिसते तर इराण मध्ये सियाल्कचे लोक घागऱ्यासारखे पसरट कमरेभोवती गुंडाळून ते पाठीमागे बांधतात. स्त्रिया वक्ष भाग कपड्याने आच्छादित. युरोपातील लोक चामड्याचे कपडे व केसाळ चामडे वापरत.हे लोक गुंड्याचाही वापर करीत. इंग्लंड मधील लोक चामडी पट्टे शंखाच्या बकलाने बांधत असल्याचे दिसून येते.

वरील सर्व माहिती शां.बा. देव यांच्या पुरातत्वविद्या या पुस्तकातील आहे. हे  पुस्तक  कान्टिनेंटल प्रकाशन पुणे यांनी १९७६ मध्ये पहिली आवृत्ती आणि २००८ मध्ये दुसऱ्या आवृत्ती प्रकाशित झाली होती. अर्थातच या नंतरच्या काळात बरेच संशोधन झाले. तसेच नवाश्मयुगाची संकल्पना बदलली आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बदल झाले असे म्हणण्यापेक्षा सखोलपणे बाबी समजायला मदत झाली.

१९ व्या शतकातील शेती

शेतीचा प्राचीन पुरावा प्रामुख्याने पॅलेस्टाईन, इराक, मेसोपोटेमिया व इजिप्त या भागात मिळालेला आहे.एमर जातीचा गहू मोठ्या प्रमाणात लागवड करून या देशात पिकवला जाई.  सर्वात प्राचीन बार्लीची् लागवड केल्याचा पुरावा इराक मध्ये जार्मो या ठिकाणी मिळालेला आहे. या दोन्ही धान्याचा प्रसार पश्चिम आशियातून इतरत्र झाला असावा. अगदी अलीकडे तांदळाच्या लागवडीचा नवाश्मयुगीन पुरावा आग्नेय आशियात उपलब्ध झालेला आहे. शेतीतील उत्पन्न होणाऱ्या गहू ,बार्ली व्यतिरिक्त नवाश्मयुगीन मानव हा कंदमुळे व विविध फळे ही खात असावा. मात्र त्याच्या प्रयोग प्रयत्नपूर्वक लागवडीचा पुरावा मिळाला नाही. या काळात  इजिप्तमध्ये मानव मुळे खात असावा व चीन व इराण मधील अक्रोडाचा खाण्यासाठी वापर केला जात असावा. युरोपातील सफरचंदासारखी फळे खाल्ली जात असावी कारण त्याचा पुरावा नवाश्मयुगीन व त्यांच्या अवशेषात मिळालेला आहे.इजिप्तमधील शेतकरी तागाची ही लागवड करत असत असे दिसते.

भारतात शेती बद्दलचा पुरावा अपुरा असून तो पश्चिम आशिया इतका  विपुल नाही. काश्मीरमध्ये बुर्जझोम  येथे दगडी पाटे व शेतीस लागणारी दगडी फळासारखी हत्यारे मिळालेली आहेत. कर्नाटका टेकलकोटा येथे कुळीथाचा पुरावा मिळाला आहे. याव्यतिरिक्त काही गळीताची धान्येही पिकवली जात असावी असे दिसते.. दक्षिण भारतात आजही अनेक कृत्रिम तळे निर्माण केलेले आढळतात ही पद्धत महाश्मयुगीन लोकांनी प्रचलित केल्याचे मानले जाते. कदाचित नवाश्मयुगीन लोकांनीही दगड रचून अथवा कृत्रिम बंधारे बांधून शेतीसाठी पाणी साठवले असण्याची शक्यता आहे.

पशुपालन व पैदास याचा विचार केला तर नवाश्मयुगीन काळातील माणूस जो स्थिर आयुष्य जगायला लागला होता त्याला अन्ना बरोबर पशूंच्या उत्पन्नाची ही गरज भासली असावी आणि म्हणून तो नदीकाठी राहू लागला व अशा वस्तीभोवती निरनिराळे प्राणी ही येऊ लागले. पश्चिम आशियातील पुरावा उपलब्ध केलेला आहे तो पुरातत्त्वज्ञ व प्राणी शास्त्रज्ञ यांनी सिद्ध केले की मेंढी, शेळी, बैल व डुक्कर या क्रमाने हे प्राणी नवाश्मयुगात मानवाने पाळायला तसेच माणसाळवायला  लावण्यात यश मिळवले. त्यातील मेंढ्यांचा प्रकार उरियल जातीच्या मेंढ्या प्रथम पश्चिम आशियात माणसाळवल्या गेल्या. तेथून त्यांचा युरोपात प्रसार झाला. अत्यंत प्राचीन डुकराची हाडे इराणमध्ये मिळालेली आहेत. त्यातूनच पाळीव डुकरांची निपज झाली असावी. युरोप व आग्नेय आशिया इत्यादी विभागात आढळून येणारे विविध जातीची पाळीव डुकरे यांच्या संकरातून निर्माण झाले असावे. भारतात  वशिंडयुक्त बैलाची जात नवाश्मयुगापासूनच प्रचलित असल्याचे दिसून येते. युरोपामध्ये मात्र रानटी बैला द्वारेच हा  प्राणी माणसाळवला गेला.

वस्रे  व अलंकार यांचा विचार केला तर नवाश्मयुगीन काळात  सुतकताईचा आढळ दिसून येतो आणि त्यानुसार विणकाम केले जाईल असे सांगता येते. त्यासाठी मातीच्या आणि दगडाच्या पातळ टकळ्यांचा टोक यांचा उपयोग केला जाई. मागाचा पुरावा इजिप्त मधील नवाश्मयुगीन बदारी संस्कृतीच्या लोकांशी निगडित आहे. हे  लोक आडव्या मागावर विणकाम करीत. मागावरील विणकामाच्या वेळी उपयोगी ठरणारे,  मातीचे बनवलेले वजनदार गोळे बरोबरच इजिप्त बरोबरच तुर्कस्तानातील हिस्सारलिक येथे व उत्तर फ्रान्समधील नवाश्मयुगीन वसाहती सापडलेली आहेत.

नवाश्मयुगाच्या लोकांनी अलंकाराचाही वापर केलेला दिसून येतो. इजिप्त, इराण मध्ये ज्या मातीच्या मूर्ती सापडले आहेत त्यांना लुंगी सारखे वस्त्र नेसत असे  दिसते तर इराण मध्ये सियाल्कचे लोक घागऱ्यासारखे पसरट कमरेभोवती गुंडाळून ते पाठीमागे बांधतात. स्त्रिया वक्ष भाग कपड्याने आच्छादित. युरोपातील लोक चामड्याचे कपडे व केसाळ चामडे वापरत.हे लोक गुंड्याचाही वापर करीत. इंग्लंड मधील लोक चामडी पट्टे शंखाच्या बकलाने बांधत असल्याचे दिसून येते.

वरील सर्व माहिती शां.बा. देव यांच्या पुरातत्वविद्या या पुस्तकातील आहे. हे  पुस्तक  कान्टिनेंटल प्रकाशन पुणे यांनी १९७६ मध्ये पहिली आवृत्ती आणि २००८ मध्ये दुसऱ्या आवृत्ती प्रकाशित झाली होती. अर्थातच या नंतरच्या काळात बरेच संशोधन झाले. तसेच नवाश्मयुगाची संकल्पना बदलली आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बदल झाले असे म्हणण्यापेक्षा सखोलपणे बाबी समजायला मदत झाली.

१९ व्या शतकातील नवाश्मयुग ही संकल्पना दनिश पुरातत्त्वज्ञांनी मानवाची  तंत्रज्ञानातील प्रगती आणि मानवाचा संबंध या दृष्टीने त्याने तयार केलेले पॉलिश दगडी अवजारे आणि मृद्भांडी तयार करण्याची प्रक्रिया या दृष्टीनेच बघितले गेले होते. परंतु काळाच्या ओघात काही उत्क्रांतीचे मानववंश शास्त्रज्ञ जसे की, एडवर्ड टेलर यांनी मानवी जिवनाच्या तीन अवस्था योजल्यात, रानटी, अन्नगोळा करणारा भटका माणूस आणि शेती करणारा, नागरी अवस्था ह्या प्रगतीच्या अवस्था मानल्या गेल्यात. त्यातील दुसरी अवस्था जी होती, त्यामध्ये माणसाने भांडी बनवायची कला आणि प्राणी माणसाळवणे  या दोन बाबी वर प्रभुत्व मिळवले.  या अर्थाला खऱ्या अर्थाने या संकल्पना व्ही. गोर्डन चाईल्ड यांनी नवाश्मयुगीन जीवनाचा जो पश्चिम आशिया आणि इजिप्त यांच्या अंतुलिया येथील तसेच आणि युरोपमधील जी तीन हजार वर्षाचा काळ होता, त्या काळाचा सखोल पट मांडला,  खऱ्या अर्थाने दुसऱ्या महायुद्धानंतर  या विषयाकडे बघितले गेले आणि व्ही. गोर्डन चाईल्ड संकल्पना मांडली.

नवाश्मयुगाची संकल्पना १९ व्या शतकात दनिश इतिहासकारांनी अश्मयुगीन मानवाची अवजारांमधील प्रगती आणि माणसाने वापर सुरू केलेले पॉलिश असलेले दगडी हत्यारे आणि मृद्भांडी तयार करणे आणि  यावरून मोजमाप करून वापरली. परंतु शास्त्रज्ञ एडवर टेलर यांनी या काळाची तीन टप्प्यांत विभागणी केली, जे रानटी अवस्था, शिकारी अवस्था आणि नागरी अवस्था हे मानवाच्या प्रगतीत मानले गेले. दुसरी अवस्था जी शिकारी अवस्था म्हटली गेली, त्यामध्ये माणसाने भांडी तयार करणे आणि प्राण्यांना माणसावण्याची कला हस्तगत केली. परंतु या काळात महत्त्वाची योगदान आहे ते व्ही  गोर्डन  चाईल्ड यांचे  होय. त्यांनी नवाश्मयुगातील जीवनाचा मानवी जीवनाचा पश्चिम आशिया आणि इजिप्त या भागातील अनातोलिया आणि नंतर युरोपात ३००० वर्षाचा काळाचा पट मांडला. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर हे गृहीतक तपासले गेले आणि त्यात मोठा पट अभ्यासाचा मानला गेला असं म्हणायला हरकत नाही.

आता मोठ्या प्रमाणात नवाश्मयुगातील माणसाच्या त्याने पर्यावरणावर कसा ताबा मिळवला? आणि त्याचे विकासाचे टप्पे निसर्गातील अन्नसाखळी समजून घेऊन तसेच अन्न उत्पादन करून रानटी वनस्पती आणि प्राण्यांची हालचाली आणि प्राण्यांचे प्रजनन समजून घेऊन याच्यावर त्याने ताबा मिळवला आणि म्हणूनच हे युग म्हणजे शेतीचा युग मानलं गेलं. यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी शेतीबरोबर आलेल्या म्हणजे लहान लहान वस्त्या ज्या पश्चिम आशियामध्ये दिसून येतात आणि जिथे रानटी गहू आणि बार्ली हे त्या भागातील मुख्य पीक दिसून आली. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे शेळ्या आणि मेंढ्या पाळणे हा दिसून येतो. त्याचबरोबर गहू आणि बार्ली आणि शेळ्या मेंढ्या कॉम्प्लेक्स असं नाव देत तो एक विभागच तयार झालेला दिसतो. विशेषतः लेवन्त ते अफगाणिस्तान हा भागात होय. ह्या भागातील परिस्थितीचा विचार केला तर पहिली म्हणजे प्राणी पाळणे आणि अन्न उत्पादन करणे या जो अभ्यास झाला त्याचे थेअरी आणि मॉडेल मांडले गेले त्यात गोर्डन चाइल्ड यांनी ,”एनफोर्स ट्रॉफी प्रोपीन्किटी थेअरी” मांडली जिचा डायरेक्ट संबंध म्हणजे उत्तर प्लायटोसिन डिसिगेशनसी म्हणजे उत्तर हिमयुगातील वातावरण संबंधित मांडला गेला. त्यानंतर कार्ल डब्लू. बुडझर यांनी १९५८ मध्ये ,”क्वाटर्नरी स्टैटोग्राफी एन्ड क्लायमेट इन नियर इस्ट” या निबंधात एक बाब   सुचवली की, काही टप्पे जे वातावरणातील बदलांमध्ये उतार चढाव होत होते, विशेषतः पूर्वेकडील भागात होय. त्यात काही कारणे  ज्यामध्ये पहिले  प्राणी माणसावले गेले आणि वनस्पती लागवड केली गेली. त्या बदलत्या वातावरणाचा काळ हा पुर्व होलोसीन हा होता. तंत्रज्ञान विकसित करण्याची प्रक्रिया नवाश्मयुगीन समाजाने पर्यावरण समजून घेणे, विभागांच्या भौगोलिक विशेषतः या काळात समजून घेतल्या. हळूहळू मग लोकसंख्या वाढली. ही गुंतागुंतीची प्रक्रिया हा बदल समजून घ्यायला मदत करते. कारण प्राणी माणसाळवणे आणि वनस्पती निरीक्षण करून उपयोगाचे लागवड करणे यात काळाचा मोठा भाग आहे. यात बारीकसारीक गोष्टी तपशीलवार निरीक्षणातून आणि अनुभवातून तो शिकत गेला. तसेच वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती मध्ये वेगवेगळ्या बाबींची विकसित झाल्यात. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर भारतातील खानदेशातील भागात नवाश्मयुगाचे फारसे पुरावे मिळत नाही. याउलट तिथला माणूस धातू वापरायला सुरुवात झालेली दिसते म्हणजे मधले टप्पे सापडत नाहीत.

ही संकल्पना दनिश पुरातत्त्वज्ञांनी मानवाची  तंत्रज्ञानातील प्रगती आणि मानवाचा संबंध या दृष्टीने त्याने तयार केलेले पॉलिश दगडी अवजारे आणि मृद्भांडी तयार करण्याची प्रक्रिया या दृष्टीनेच बघितले गेले होते. परंतु काळाच्या ओघात काही उत्क्रांतीचे मानववंश शास्त्रज्ञ जसे की, एडवर्ड टेलर यांनी मानवी जिवनाच्या तीन अवस्था योजल्यात, रानटी, अन्नगोळा करणारा भटका माणूस आणि शेती करणारा, नागरी अवस्था ह्या प्रगतीच्या अवस्था मानल्या गेल्यात. त्यातील दुसरी अवस्था जी होती, त्यामध्ये माणसाने भांडी बनवायची कला आणि प्राणी माणसाळवणे  या दोन बाबी वर प्रभुत्व मिळवले.  या अर्थाला खऱ्या अर्थाने या संकल्पना व्ही. गोर्डन चाईल्ड यांनी नवाश्मयुगीन जीवनाचा जो पश्चिम आशिया आणि इजिप्त यांच्या अंतुलिया येथील तसेच आणि युरोपमधील जी तीन हजार वर्षाचा काळ होता, त्या काळाचा सखोल पट मांडला,  खऱ्या अर्थाने दुसऱ्या महायुद्धानंतर  या विषयाकडे बघितले गेले आणि व्ही. गोर्डन चाईल्ड संकल्पना मांडली.

नवाश्मयुगाची संकल्पना १९ व्या शतकात दनिश इतिहासकारांनी अश्मयुगीन मानवाची अवजारांमधील प्रगती आणि माणसाने वापर सुरू केलेले पॉलिश असलेले दगडी हत्यारे आणि मृद्भांडी तयार करणे आणि  यावरून मोजमाप करून वापरली. परंतु शास्त्रज्ञ एडवर टेलर यांनी या काळाची तीन टप्प्यांत विभागणी केली, जे रानटी अवस्था, शिकारी अवस्था आणि नागरी अवस्था हे मानवाच्या प्रगतीत मानले गेले. दुसरी अवस्था जी शिकारी अवस्था म्हटली गेली, त्यामध्ये माणसाने भांडी तयार करणे आणि प्राण्यांना माणसावण्याची कला हस्तगत केली. परंतु या काळात महत्त्वाची योगदान आहे ते व्ही  गोर्डन  चाईल्ड यांचे  होय. त्यांनी नवाश्मयुगातील जीवनाचा मानवी जीवनाचा पश्चिम आशिया आणि इजिप्त या भागातील अनातोलिया आणि नंतर युरोपात ३००० वर्षाचा काळाचा पट मांडला. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर हे गृहीतक तपासले गेले आणि त्यात मोठा पट अभ्यासाचा मानला गेला असं म्हणायला हरकत नाही.

आता मोठ्या प्रमाणात नवाश्मयुगातील माणसाच्या त्याने पर्यावरणावर कसा ताबा मिळवला? आणि त्याचे विकासाचे टप्पे निसर्गातील अन्नसाखळी समजून घेऊन तसेच अन्न उत्पादन करून रानटी वनस्पती आणि प्राण्यांची हालचाली आणि प्राण्यांचे प्रजनन समजून घेऊन याच्यावर त्याने ताबा मिळवला आणि म्हणूनच हे युग म्हणजे शेतीचा युग मानलं गेलं. यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी शेतीबरोबर आलेल्या म्हणजे लहान लहान वस्त्या ज्या पश्चिम आशियामध्ये दिसून येतात आणि जिथे रानटी गहू आणि बार्ली हे त्या भागातील मुख्य पीक दिसून आली. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे शेळ्या आणि मेंढ्या पाळणे हा दिसून येतो. त्याचबरोबर गहू आणि बार्ली आणि शेळ्या मेंढ्या कॉम्प्लेक्स असं नाव देत तो एक विभागच तयार झालेला दिसतो. विशेषतः लेवन्त ते अफगाणिस्तान हा भागात होय. ह्या भागातील परिस्थितीचा विचार केला तर पहिली म्हणजे प्राणी पाळणे आणि अन्न उत्पादन करणे या जो अभ्यास झाला त्याचे थेअरी आणि मॉडेल मांडले गेले त्यात गोर्डन चाइल्ड यांनी ,”एनफोर्स ट्रॉफी प्रोपीन्किटी थेअरी” मांडली जिचा डायरेक्ट संबंध म्हणजे उत्तर प्लायटोसिन डिसिगेशनसी म्हणजे उत्तर हिमयुगातील वातावरण संबंधित मांडला गेला.

त्यानंतर कार्ल डब्लू. बुडझर यांनी १९५८ मध्ये ,”क्वाटर्नरी स्टैटोग्राफी एन्ड क्लायमेट इन नियर इस्ट” या निबंधात एक बाब   सुचवली की, काही टप्पे जे वातावरणातील बदलांमध्ये उतार चढाव होत होते, विशेषतः पूर्वेकडील भागात होय. त्यात काही कारणे  ज्यामध्ये पहिले  प्राणी माणसावले गेले आणि वनस्पती लागवड केली गेली. त्या बदलत्या वातावरणाचा काळ हा पुर्व होलोसीन हा होता. तंत्रज्ञान विकसित करण्याची प्रक्रिया नवाश्मयुगीन समाजाने पर्यावरण समजून घेणे, विभागांच्या भौगोलिक विशेषतः या काळात समजून घेतल्या. हळूहळू मग लोकसंख्या वाढली. ही गुंतागुंतीची प्रक्रिया हा बदल समजून घ्यायला मदत करते. कारण प्राणी माणसाळवणे आणि वनस्पती निरीक्षण करून उपयोगाचे लागवड करणे यात काळाचा मोठा भाग आहे. यात बारीकसारीक गोष्टी तपशीलवार निरीक्षणातून आणि अनुभवातून तो शिकत गेला. तसेच वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती मध्ये वेगवेगळ्या बाबींची विकसित झाल्यात. अगदी उदाहरण द्यायचे झाले तर भारतातील खानदेशातील भागात नवाश्मयुगाचे फारसे पुरावे मिळत नाही. याउलट तिथला माणूस धातू वापरायला सुरुवात झालेली दिसते म्हणजे मधले टप्पे सापडत नाहीत.

@सरला भिरूड

Leave a Comment