निझामशाही गढी, दौला वडगाव –
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दौला वडगाव या गावी एक मजबूत निझामशाही गढी म्हणजे भुईकोट आहे. गेल्या लेखात आपण भातवडीच्या लढाईबद्दल माहिती घेतली त्या इतिहास प्रसिद्ध गावापासून दौला वडगाव ४ कि.मी अंतरावर आहे. भुईकोटाची तटबंदी, प्रवेशद्वार, ४० फुटी बुरूज आजही मजबूत स्थितीत उभे आहे. गढीत दोन प्रवेशद्वारातून प्रवेश होतो. आतमध्ये तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. गढीत आतमध्ये वाड्याचे अवशेष पहायला मिळतात.
या गावास दौला- वडगाव हे नाव का पड़ले हे कदाचित त्या विभागाच्या निजामशाहीतील सरदाराचे नाव दौलाखान किंवा दौलतखान असण्याची शक्यता वाटते त्यावरून दौला वडगाव हे नाव पडले. या भुईकोटाभोवती खंदक होता यावरून किती सुरक्षित होते हे लक्षात येते. गावात बाहेर माळावर कलावंतीणीचा महाल आहे.
टीम – पुढची मोहीम
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल