महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,895

निंबाळकर गढी, भाळवणी, बीड

Views: 1861
2 Min Read

निंबाळकर गढी, भाळवणी, बीड –

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील भाळवणी गावात निंबाळकर घराण्याची भव्य गढी आहे.  गुगलवर शोधताना भालोनी असे टाकावे म्हणजे सापडेल. भाळवणीकर निंबाळकर हे महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे आजोळ. भाळवणी आष्टीपासून १० कि.मी तर राशीनपासून ६७ कि.मी अंतरावर आहे.

भाळवणी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे गावात निंबाळकरांचे एकच मराठ्यांचे घर असुन बाकी ९९% मुस्लीमांची वस्ती आहे.गढीचे भव्य प्रवेशद्वार, भव्य बुरूज, तटबंदी अस्तित्वात आहे. मागील तटबंदी आणि बुरूजाचा काही भाग ढासळला आहे. गढीच्या बाहेरील बाजूस पायऱ्या असलेली मोठी विहीर आहे. समोरच एक वाडा आहे. गढीच्या बाहेर पण तटबंदी आणि प्रवेशद्वार आहे अशी सुरक्षा व्यवस्था होती. गढीत आत प्रवेश करण्यासाठी ३ प्रवेशद्वार आहेत व आत प्रवेश करताना दगडी बांधकाम लक्ष वेढून घेते. पूर्वीचा वाड्याचा भाग ढासळल्यामुळे नवीन घरांचे बांधकाम केले आहे.आतमध्ये पाण्याच्या व्यवस्थेसाठी उभारलेला आड आहे.बुरूजावरून टेहळणी करता येवू शकते. बुरूजाला शत्रूवर मारा करण्यासाठी जंग्या आहेत. गढीमध्ये अरूणराव निंबाळकर यांचे वास्तव्य आहे.

फलटणच्या निंबाळकर घराण्याची शाखा असलेले हे भाळवणीचे निंबाळकर घराणे. जगदेवराव मुधोजीराव नाईक निंबाळकर हे या घराण्याचे मूळ पुरूष होत. सईबाईसाहेब ह्यांना ३ भाऊ होते यातले सर्वात मोठे वैराग बार्शीजवळ होते दुसरे भाळवणी बीडला तर तिसरे फलटण असे हे इतिहाससंपन्न घराणे.खर्ड्याच्या लढाईत पराक्रम गाजवल्यानंतर भाळवणीची जहागीरी आप्पासाहेब निंबाळकरांना मिळाली.  छञपती शाहूंचे सेनापती राहिलेल्या हणमंतरावांचे घराणे निजामाकडे गेल्यानंतर सुलतानजी नावाने ओळखले गेले. बीड, खर्डा त्यांची जहागीरीची ठिकाणे असून यांचाच एक पुरुष आप्पासाहेब 42 गावच्या जहागीरीवर भाळवणीला आले.

विलासराव देशमुखांचे आजोबा भाऊसाहेब आणि आजी गुणाबाई  तीन मुले आणि तीन मुली अशी अपत्ये होती.त्यांच्यापैकी सुशीलाबाईंचा विवाह दगडोजीराव देशमुखांशी झाला. त्यांना दोन मुले आणि दोन मुली. विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. विलासराव लहानपणी भाळवणीला नेहमी यायचे. मामा नानासाहेबासोबत  पोहणे, फिरणे, घोड्यावर फेरफटका मारणे व्हायचे. गावाने विलासरावांचे मृत्यूनंतर सर्व धार्मिक विधी, दुखवटा याचे पालन केले.

टीम पुढची मोहीम

Leave a Comment