महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,55,468

जुन्या मोहिनीराज मंदिराचे अवशेष, नेवासा

By Discover Maharashtra Views: 1496 1 Min Read

जुन्या मोहिनीराज मंदिराचे अवशेष, नेवासा –

भगवान विष्णूच्या मोहिनी अवताराला समर्पित असे महाराष्ट्रातील एकमेव मंदीर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा गावात असून सध्याचे हे मंदीर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे सरदार चंद्रचूड यांनी अठराव्या शतकात बांधले आहे. मंदिरातील गर्भगृहात भगवान विष्णूची मोहिनी अवताराची मूर्ती जिला भक्त “मोहिनीराज” म्हणतात ती अर्धनारी नटेश्वर रूपातील आहे. याच गावात प्रवरा नदीच्या तीरावर मोहिनीराजाचे जुने पुरातन मंदिर अस्तित्वात होते असे ग्रामस्थ सांगतात. आज त्या जुन्या मोहिनीराज मंदिराचे अवशेष केवळ भग्न अवशेष शिल्लक आहेत.

जुन्या मंदिराचा शोध घेत असताना आपण एका अरुंद रस्त्याने प्रवरा नदीच्या घाटावर जाऊन पोहचतो. तिथे आपल्याला भग्नावस्थेत असलेले मंदिराचे प्रवेशद्वार, मंदिराचे काही अवशेष, शिवपिंडी, भग्न नंदी व काही मूर्ती इतरत्र विखुरलेल्या दिसतात.

सद्यस्थितीत शिल्लक असलेल्या प्रवेशद्वाराच्या सुंदर द्वारशाखेवरून पुरातन मंदिराच्या सौंदर्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. घाटावर अजून काही मंदिरे असून त्यातील गणपती व मारुती मंदिर चांगल्या स्थितीत आहेत. या सर्व अवशेषांवरून लक्षात येते की प्राचीन असा ऐतिहासिक वारसा नेवासा गावाला लाभला आहे.

Rohan Gadekar

Leave a Comment