महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,14,047

आपला इतिहास

Views: 2550
2 Min Read

आपला इतिहास…

इतिहास हा खर तर सर्वात जास्त उपेक्षित विषय पण आपला इतिहास हा सह्याद्रीच्या भुगोलाशी निगडित आहे. इथल्या दुर्गम दुर्गांशी आणि प्राचीन संस्कृतीशी आहे. इथे गड़ – किल्ले – दुर्ग, प्राचीन मंदिरे, शिलालेख, लेणी आणि ह्या सर्वांची रचना इतकी वैविध्यपूर्ण आहे. महाराष्ट्रातल्या बहुसंख्य किल्ल्यांचा संबंध छत्रपति शिवाजीमहाराजांशी जोडला जातो. शिवकाळात’संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’हा विचार प्रकर्षाने जाणवतो.

सातवाहन, राष्टकूट, शिलाहार,यांचा दुर्गबांधणी मधला सहभाग दुर्लक्ष करण्याजोगा नाही. पण शिवकाळ हा किल्ल्यांची उभारणी व त्यांचा उपयोग यांचा सुवर्णकाळ होता. दुर्गबांधणीतल्या तंत्राचा परमोच्च अविष्कार शिवदुर्गरचनेत आढळतो. त्यांनी काही जलदुर्ग उभारले तर काही गिरिदुर्ग, काही वनदुर्ग तर काही अश्मदुर्ग. शिवछत्रपती महाराजांनी राजाभिषेकानंतर रघुनाथपंतांकडून ‘राज्यव्यवहारको श’तयार करवून घेतला. त्यात ७ वे प्रकरण किल्ल्यांवर आहे. तर रामचन्द्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात ८ व्या प्रकरणात किल्ल्यांचे महत्त्व, त्यांची रचना व व्यवस्था यावर उहापोह केला आहे.

त्यात म्हटले आहे की “गड़कोट हेच राज्य, गड़कोट म्हणजे राज्याचे मुळ, गड़कोट म्हणजे खजिना, गड़कोट म्हणजे सैन्याचे बळ, गड़कोट म्हणजे राज्यलक्ष्मी, गड़कोट म्हणजे आपली वसतिस्थळे, गड़कोट म्हणजे सुखनिद्रागार किंवा गड़कोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण. दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून, पुढे बुरुज देउन. येतिजाती मार्ग बुरुजांचे आहारी पडोन दरवाजे बांधावे. किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे.

याकरता गड़ पाहून एक, दोन, तीन दरवाजे तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून, वरकड दरवाजे आणि दिंडया चिणून टाकाव्यात.”ग़डा वर येणारे मार्ग सुद्धा तितकेच महत्त्वाचे असायचे. त्याबदल लिहिले आहे,”ग़डावर यावयाचे मार्ग असतील ते सुगम नसावेत. सुगम असले तर ते मार्ग मोडून त्यावर झाडी वाढवून आणखीकड़े परके फ़ौजेस येता कठिण असे मार्ग घालावे. ग़डाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी (डोंगर उतारावरची झाडी) प्रयत्ने वाढवावी. त्यामध्ये एक काठीही तोड़ो न द्यावी. बलकुबलीस (अडचणीच्या वेळी) झाडीमध्ये हशम बंदूके घालावी, या कारणेजोगे असो द्यावे.

Leave a Comment