ओवरी, संगम माहूली, सातारा –
संगम माहूली हे सातारा मधील दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द आहे. येथे वेण्णा कृष्णाचा नदीचा संगम आहे. आशा संगम झालेल्या स्थानाला तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त होतो. अशा संगमक्षेत्री धार्मिक कार्य , विधी व पर्व काळात स्नान केले जाते.आशा वेळी यात्रेकरुंना चांगली सोय मिळावी म्हणून आनेक जण पुण्याच काम केल जाव यासाठी आनेक मंदिरात अथवा नदीकाठी ओव-या बांधून देतात. कधी कधी या ओवरी, ओव-या नवसासाठी पण बांधल्या जातात.
अशा ओव-यात तात्पुरती निवासाची सोय केली जाते. तसेच यात पुजा अर्चा , मंत्रपठण , संध्या , अर्ध्य , होम हवन वैगरे धार्मिक कार्य होतात.
सदर ओवरी ही संगमाकाठी असून ओवरीच बांधकाम शाहूकालखंडातील आहे असे दिसते. ही ओवरीत खुप धार्मिक केली असतील हे नक्की. यात सहा देवकोष्टक असुन चारही खांबांवर विविध प्रकारचे कमलपुष्प कोरले आहेत. खांबांवर असलेल्या नागांनी या ओवरीच छत तोलून धरले आहे. हे बांधकाम हे विश्वेश्वर मंदिराच्या खांबाशी मिळत जुळत आहे. पुढच्या बाजूला दिवे लावण्यासाठी खास कोनाडे असून उत्सवात ही ओवरी प्रकाशात उजळून निघत असेल.
दगडी बांधकामाची ही प्रशस्त ओवरी आनेक पुरात आज सुध्दा तग धरून आहे. भुजल जवळील इतिहासकालीन ही साधने ऐतिहासिक वारसा म्हणून जपली पाहीजेत . लाखमोलाची ही साधने नैर्सगिक आपत्तीत अथवा अतिक्रमाणात नष्ट होऊ न देणे हे समाजाचे कर्तव्य आहे.लाखमोलाची ही साधने नैर्सगिक आपत्तीत अथवा अतिक्रमाणात नष्ट होऊ न देणे हे समाजाचे कर्तव्य आहे.
संतोष मु चंदने. चिंचवड