गडदुर्गा | राजगडाची पद्मावतीदेवी माता…
गडदुर्गा – शिवरायांच्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगडाची ओळख या गडावर आहेत तीन माची त्यातील पद्मावती माचीवर पद्मावतीदेवीचं चौसोपी देऊळ आहे माचीच्या नावावरून देवीचं नाव ठेवलं गेलंय, असं म्हणतात गडावर सध्या जे पद्मावतीदेवीचं मंदिर आहे ते एकोणीसाव्या शतकातील भोर संस्थानच्या कालखंडात बांधलं गेलं आहे…
राजेंनी आपल्या वैभवाला साजेशी अशी मूर्ती घडवली तिची प्राणप्रतिष्ठा केली या नवीन बांधलेल्या देवळात एक छोटा गाभारा आहे त्या गाभाऱ्यात देवीचा प्राचीन तांदळा आहे…
१६४२मध्ये शिवरायांनी देवी पद्मावतीची मूर्ती घडवली ती साकारताना ब्रह्मदेवाची धर्मपत्नी असल्याचं भान ठेवूनच कारागीरांना घडवायला सांगितली १६९३ मध्ये मुघलांनी राजगड ताब्यात घेतला गड ताब्यात घेण्याआधी राजगडाच्या मराठा किल्लेदारांनी शिवरायांनी प्राण प्रतिष्ठापना केलेली देवी पद्मावतीची मूर्ती तलावात टाकली मंदिर रिकामं ठेवले भोर संस्थानच्या ताब्यात किल्ला आल्यावर त्यांनी देवीची नवीन मूर्ती बनवली सध्या गडावर दोन पद्मावती सापडतात इतिहास संशोधकांच्या मते राजगडावरील जननी हे आद्यदैवत तांदळास्वरूपात आहे ते शाक्त पंथाशी नातं संगताना दिसतं…
शिवकाळात देवी जननीला महिष बळी दिला जात असे तर देवी पद्मावती ही शाकाहारी देवी वैश्य अनुयायांशी नातं सांगते तिचा पती बिरमदेव-ब्रह्मदेव-ब्रह्मर्षी हा त्या डोंगराचा स्वामी होता त्याच गडाच्या दक्षिणेकडे काळाई आहे ही काळाई सूर्यपत्नी असून ती यमदेवाची माता आहे या देवतेकडेच तिचा पुत्र यम याला थोपवण्याचं आणि गडावरील अपमृत्यू टाळण्याचं सामर्थ्य आहे महाराष्ट्रात ही देवता यमाई, काळकाई, काळेश्वरी, काळूबाई इत्यादी नावांनी ज्ञात आहे…
“तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया
तुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई….”
Credit – सचिन पोखरकर