पहीने धबधबा…
नागमोडी वळणे घेत जाणारा घाटातील रस्ता, सर्वत्र पसरलेलं दाट धुकं, रिमझिम बरसणारा पाऊस, आल्हाददायक मनमोहून टाकणारी हिरवळ आणि कोसळणारे धबधबे.
वर्षां ऋतूमध्ये बाहेर पडावं, भन्नाट वारा अनुभवावा, पावसात चिंब भिजावं आणि आंतरबाह्य़ ओलंचिंब होऊन जावं यासारखं दुसरं सुख नाही.
सह्य़ाद्री ही महाराष्ट्राला मिळालेली एक अभूतपूर्व अशी देणगीच आहे. कुठल्याही ऋतूमध्ये मनाला भावणारा सह्य़ाद्री ऐन पावसाळ्यात तर फारच रांगडा, सुंदर आणि मोहक भासतो. सर्वत्र हिरवागार रंग आणि त्यामध्ये फुललेली असंख्य रानफुले, डोक्यावर पावसाळी ढग, आजूबाजूला डोंगरावरून कोसळणारे धबधबे आणि खाचरांमध्ये बळीराजाने केलेली पेरणी असे सर्वत्र आल्हाददायी वातावरण असते.
सुदैवाने सह्य़ाद्रीचा सहवास आपल्याला लाभलेला असल्यामुळे अनेक सुंदर, आगळीवेगळी अशी भटकण्यासाठी मुबलक ठिकाणं आहेत. असेच एक ठिकाण म्हणजे पहीने गावं. हे गावं नाशिक जिल्ह्यामध्ये त्रंबकेश्वर पासून १० किमी अंतरावर त्रंबकेश्वर-घोटी रोडवर आहे.
माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti