महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,127

जव्हार संस्थानचा पहिला राजवाडा

By Discover Maharashtra Views: 1454 2 Min Read

जव्हार संस्थानचा पहिला राजवाडा –

जव्हार संस्थानचा पहिला राजवाडा २०० वर्षापूर्वीचा सन १७५० साली कृष्णराजाने बांधला होता. पण दुर्दैवाने अवघ्या ७२ वर्षानी इ.स.१८२० साली  तो अग्निनारायणाच्या भक्षस्थानी पडला.

पेशव्यांचा अनुज्ञेने जव्हार संस्थान चा गादीवर बसलेले तीसरे विक्रमशाह उर्फ़ मालोजीराव इ.स.१८२१ मधे वारल्यानंतर जव्हार संस्थानचा गादीवर कोणी वारस नव्हता, त्यामुळे विक्रमशाहच्या दोन भावात तंटा निर्माण झाला. तिसरया विक्रमशाहला दोन बायका होत्या, आनंदीबाई आणि सगुणाबाई. सगुणाबाई त्यावेळी थोड्याच दिवसात प्रसूत होऊन त्याना मुलगा झाला, त्यांचे नाव तिसरा पतंगशाह ठेवले.

विक्रमशाह उर्फ़ मालोजीराव इ.स.१८२१ मधे वारल्यानंतर जव्हार संस्थानचा गादीवर कोणी बसायचे यावरुन खुप वादंग माजला…तो इतका माजला की त्यामुळे राज्यात या प्रकरणाने बंड माजले आणि या गादीवरुन झालेल्या भांडणातुन बंडखोरांनी इ.स.१८२२ साली जव्हारचा राजवाडा जाळुन कागदपत्रे,जूने ऐतिहासिक पुरावे वैगेरे सर्व जळुन राख झाले.

आजही जून्या राजवाडा मधे नगारखाना तसेच नक्षी काम केलेले दगड़ी जोते दिसतात.

जव्हार संस्थान उदयाला आले त्या काळात खलजी सुलतान सत्ता, तुघलक सुलतान सत्ता,बहिमनी सुलतान ,बीरदरची बेरिदशाही, वह्राडची इमादशाही, अहमदनगरची निज़ामशाही, विजापुरची आदिलशाही, मोगल सुलतानची सत्ता अशा यवनी सत्ता तसेच पोर्तुगीज, ब्रिटिश, शिवशाही, पेशवे, अशा अनेक सत्ता उदयाला आल्या. पण जव्हार संस्थान ई.स.१३१६ पासुन दि. १० जून १९४८  पर्यंत भारतीय संघराज्यात विलीन होईपर्यंत तब्बल ६३२ वर्ष अस्तित्वात होते हे विशेष उल्लेखनिय.पण जव्हार संस्थान ई.स.१३१६ पासुन दि. १० जून १९४८  पर्यंत भारतीय संघराज्यात विलीन होईपर्यंत तब्बल ६३२ वर्ष अस्तित्वात होते हे विशेष उल्लेखनिय.

साभार – अभिजीत जगदाळे

Leave a Comment