खानदेशातील अश्मयुगीन स्थळे –
पुरातत्त्वशास्त्र म्हणजे प्राचीन मानवी समाजाचे अध्ययन आहे. ते करण्यासाठी प्राचीन लोकांनी मागे सोडलेल्या अवशेषांचा शोध घेऊन व त्यांचे सखोल निरीक्षण करावे लागते. निरीक्षणातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करतात. त्यासाठी त्या जुन्या कालखंडातील हवामान, भौगोलिक परिस्थिती, ज्ञात इतिहास आणि एकूणच तत्कालीन पर्यावरण विचारात घेतात. यांत अनेक गोष्टींचा अंतर्भाव असल्यामुळे, हे शास्त्र विज्ञान व मानवशास्त्र अशा दोन्ही विभागांत समजले जाऊ शकते. प्राचीन भारतीय इतिहासाची पुरावे हे पुरातत्त्व अभ्यासाच्या आधारे मिळालेले आहेत ज्या प्रमाणे सिंधू संस्कृती हडप्पाकालीन स्थळे या सर्व घटकांचा अभ्यास पुरातत्त्व शास्त्राच्या माध्यमातून केला गेलेला आहे.लाखो वर्षांपूर्वीचे मानवी जीवन समजून घेण्यासाठी पुरातत्व हे एकमेव शास्र आहे. पुरातत्त्वशास्त्र हे मानव जातीचा इतिहास शोधते. सुमारे २.५ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत मानवाने प्रथमतः तयार केलेल्या दगडी हत्यारापासून ते नजीकच्या काही दशकांपर्यंतच्या काळाचा अभ्यास या विषयात येतो..त्याकाळचा अभास करण्यास इतिहासकारांना काहीच साधन लिखित स्वरूपात उपलब्ध नसते. हा काळ म्हणजे मानवी इतिहासाच्या एकूण काळापैकी सुमारे ९९ % काळ आहे. म्हणज्र प्रागैतिहासिक ते साक्षरतेचा प्रसार होईपर्यंतचा काळ.(खानदेशातील अश्मयुगीन स्थळे)
पुरातत्त्वशास्त्राचा उद्देश मानवी उत्क्रांतीपासून ते सांस्कृतिक उत्क्रांतीपर्यंतचा सांस्कृतिक इतिहास जाणून घेणे हा आहे. पुरातत्त्वशास्त्रात खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो. निरीक्षण व सर्वेक्षण, उत्खनन आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्खननानंतरचे विश्लेषण. यानंतर पुरातन काळाची अधिक माहिती मिळू शकते. व्यापक अर्थाने, पुरातत्त्वशास्त्र हे परस्परावलंबी शाखांतील शोधांवर अवलंबून आहे. त्या शाखा म्हणजे इतिहास, कलेचा इतिहास, वैज्ञानिकशास्त्रे, भूगर्भशास्त्र, तसेच भाषाशास्त्र, भौतिकशास्त्र, माहितीविज्ञान, रसायनशास्त्र, संख्याशास्त्र, जीवशास्त्राच्या इतरशाखा पुरापर्यावरणशास्त्र(paleoecology), पुराप्राणिशास्त्र (paleozoology), paleoethnobotany,व पुराजीवशास्त्र (paleobotany) प्रागैतिहासिक काळापासून मानवी इतिहास उभा करण्यासाठी विसाव्या शतकात पुरात्विय संशोधनात तंत्र आणि व्याप्ती यात बरेच बदल झाले.
उत्खननाची शास्त्रशुध्द पध्दत विकसित होत गेली. इतिहास म्हणजे केवळ कलात्मक वस्तू आणि वास्तू किंवा विशिष्ट मानवी वंशाचा, वर्गाचा अथवा प्रदेशाचा अभ्यास करण्याचे ध्येय न रहाता विशाल मानवी समाजाच्या संपूर्ण अस्तित्व, विकास आणि विकासाला, अधोगतीला कारणीभूत ठरलेल्या सर्व पुराव्यांचा अभ्यास करणे हे ध्येय पुरातत्व शास्राने पुढे नेल्याने या शास्त्राच्या कक्षा संबंध मानवी समाजाच्या इतिहासाशी एकरूप झाल्या आहेत असे प्रतिपादन पुरातत्व विद्या या पुस्तकात शां.बा.देव यांनी केले आहे. प्राचीन मानवी जीवन कसे होते? इतिहास प्रामुख्याने राजकीय घटना आणि घडामोडी यांवर जोर देतो पण सर्वसामान्य माणसाचे जीवन कसे होते? याचा आढावा लिखीत इतिहास घेत नाही तशी साधने उपलब्ध नाहीत म्हणून पुरातत्व शास्त्रांच्या आधारे त्याने मागे ठेवलेल्या वस्तूंच्या आधारे समजून घेण्यासाठी मार्ग म्हणजे पुरातत्व होय.सर मॉर्टीमर व्हिलरच्या मते तर पुरातत्त्वीय पुराव्यांवरून मानवी मनाचा वेध घेता येतो. आणि तो कसा घ्यायचा हे पुरात्वज्ञांचे काम आहे. म्हणून पुरातत्वज्ञ केवळ वस्तूरूप पुरावा खणून काढतो असे नाही तर मानवी समाजाचे व्यक्तिमत्त्व खणून काढतो.
मानवी इतिहासाचे अभ्यासकांनी सोयीसाठी तीन कालखंड कल्पिलेले आहे. १.प्रागइतिहास, २. इतिहासपुर्व काळ, ३.इतिहासकाळ होय. एवढ्या मोठ्या कालखंड उभा करणे हे एक आव्हान आहे. त्यामुळे नवनवीन गोष्टी समोर येत जातात तशतशी आधीचे सिध्दांत आणि गृहितके बदलावी लागतात. यात अजून एक महत्वाचे ठरते ते म्हणजे भौगोलिक घटना आणि त्यांचे परिणाम याचाही अभ्यास केला जातो कारण मानवी जीवन हे पर्यावरणाचे अभिन्न अंग आहे. नविन येणारे तंत्र आणि तंत्रज्ञान हे सुद्धा मानवी जिवनात अमुलाग्र बदल घडवत असतात. जसे की पाषाणयुगात दगडी शस्रे वापरून शिकार करणारा माणूस शेती करायला लागल्यापासून स्थिरावला भटके आयुष्य संपले. पशुपालक झाल्यावर अन्नाची चणचण संपली आणि इतर बाबतीत विचार करू लागला. संस्कृती म्हणजे जगण्याची रीत आणि ही रीत सतत बदलती असते कारण मानवी विकास हा सुद्धा वाहता ओघ असतो.चाकाचा शोध,धातूचा शोध अशी हजारो उदाहरणे देता येतील.
मानवी संस्कृतीच्या वेध घ्यायला पुरातत्त्वीय अवशेष व्यतिरिक्त इतर शाखांची मदत घ्यावी लागते. मानववंशशास्त्र, भाषाशास्र होय. साहित्य, परंपरा हळूहळू इतर शास्त्र जोडली गेली कारण प्रत्येक शास्त्र मानवी जीवनाचा अभिन्न अंग आहे.जगभरात असे संशोधन होते आहे आणि विविध संस्कृती त्यांच्या विशेष स्वरूपात समोर येत आहे. त्यांचा तुलनात्मक अभ्यास होतो आहे आणि मानवी विकासाचे टप्पे वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थिती आणि इतर घटकांवरून समोर येत आहे. चीन, इजिप्त जपान,इराण इराक पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ही यादी बरीच लांबलचक आहे कारण मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रिया जाणून घ्यायची उत्सुकता आहे. भारतात अशी उत्खनने आणि अभ्यास होत आहे. मोहेंजोदडो हडप्पा व्यतिरिक्त अनेक स्थळे सापडली त्यावरून पहिला नागरीकरण, त्याचा ऱ्हास, दुसरे नागरीकीकरण आणि त्याचा ऱ्हासाची कारणे यांची मिमांसा तुलना होते आहे. या पुरातत्विय स्थळांची तुलना आंतरभारतीय तसेच जगातील इतर संस्कृतीशी होत आहे. या पार्श्वभूमीवर खानदेशातील पुरातत्त्वीय स्थळे काय सा़ंगतात त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे.
खानदेशातील हवामान भौगोलिक परिस्थिती यांचा विचार केला तर पर्वतीय रांगा, तापीपुर्णा पांझरा, गिरणा इत्यादी नद्या आणि त्यांच्या उपनद्या यामुळे हा भुभाग समृध्द होता. नदीकाठच्या बाजूला मानवी वसाहती आणि संस्कृती बहरते. महाराष्ट्रातील इतर पुरातत्त्वीय स्थळांशी तुलना केली तर गोदावरी, कृष्णा नदीच्या खोऱ्यात असलेल्या लोकवस्तीच्या तुलनेत तापी नदीच्या खोऱ्यात असलेल्या लोकवस्तीच्या संख्या तसेच लोकसंख्या जास्त असल्याचे ढवळीकर आणि वसंत शिंदे यांच्या अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. खानदेशात सापडलेल्या स्थळांपैकी काही अश्मयुगीत बऱ्यापैकी ताम्रपाषाणयुगीन स्थळे आहेत. संस्कृतंचा सविस्तर चर्चा केली तर पहिली संस्कृती सावळदा जे प्रकाशेच्या विरूध्द किनाऱ्यावर आहे. प्रकाशेला जेव्हा उत्खनन झाले त्याच काळात येथे एम.ए. साळी यांनी उत्खनन केले. ताम्रपाषाणयुगीन दक्षिण भारतात प्रातिनिधिक असे हे स्थळ आहे म्हणून सावळदा संस्कृती असे नाव दिले. गुजरात मधील संबंध अधोरेखित करणारी रंगपूर या पुर्वहडप्पन स्थळाशी संबंध खापरे आणि मातीच्या भांड्यावरून समजतो. पशुपालक तसेच शेती अशी ही संस्कृती आहे.
दुसरी उत्तर हडप्पा संस्कृती महाराष्ट्रातील दायमाबाद हे उत्तम उदाहरण आहे. मातीचे शिक्के, हडप्पा लिपी असलेले शिक्के, ब्रांझचे साठे इत्यादि गोष्टी लक्षात येतात यावरून उत्तरेकडील संस्कृती शी देवाणघेवाण होती हे लक्षात येते. तापीच्या खोऱ्यात गुजरात, मध्यप्रदेशातील स्थळे ही या संस्कृतीची उदाहरणे आहेत. माळवा संस्कृती महाराष्ट्रातील स्थिरावलेले शेतकरी दिसतात. यांत दायमाबाद, इनामगाव, कायथा, नागद, विदिशा, ऐरण, नावडाटोली ही उदाहरणे आहेत. या संस्कृतीची विशेषतः आहे ती म्हणजे चुली, तंदुर, धान्य साठविण्यासाठी कोठारे सुबकपातळ भांडी लालकाळी वर काळ्या रंगाच्या चित्र काढलेली धान्ये गहू, हरभरा, बार्ली तर प्राण्यांच्या अवशेषात गाईगुरे, शेळ्यामेंढ्या तसेच दागदागिने, मणी, शंखशिंपले आणि त्यांच्या बांगड्या गुजरात किनाऱ्याशी संबंध दिसतो. धार्मिक जीवन दिसते मातीचे बैल, वृक्षपुजा,आहुतीच्या जागा मातृकांच्या मृणमुर्ती इत्यादि खूप सखोल अभ्यास केला गेल्यामुळे विशेषतः दायमाबाद आणि इनामगाव या स्थळांचा त्यामुळे संपूर्ण मानवी जिवनाचा पट मांडता आला. जोर्वे संस्कृती मोठी खेडी ही संकल्पना विकसित झालेली दिसते तांत्रिक प्रगती झालेली दिसते. या संस्कृतीची ओळख करून घेतली कारण खानदेशातील उत्खनन स्थळांवर या तिन्ही संस्कृतीचे थर दिसतात.(खानदेशातील अश्मयुगीन स्थळे)
महाराष्ट्रातील दोनशे पुरातत्त्वीय स्थळांपैकी शंभर स्थळे तापीच्या खोऱ्यातील आहे. या खोऱ्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना दक्षिण आणि उत्तर भारत यांच्यामधील स्थान तसेच शेतीसाठी उपयुक्त व योग्य हवामान यामुळे महाराष्ट्रातील आद्य शेतकरी तापी खोऱ्यात उदयास आला. ताम्रपाषाणयुगीन समाज रचनेची आणि संस्कृती यांची माहिती कावठे गावी झालेल्या उत्खननातून सन १९८४ मधील आद्य शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रकाश पडतो. सुमारे एक लाख वर्षांपूर्वी अश्मयुगीन काळात खानदेशात मानवी वस्तीचे पुरावे साळी यांनी केलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री येथील भाडणे गावात केलेल्या उत्खननात दिसून आले आहेत. भाडणे येथील उत्खननात अश्मयुगीन हत्यारे सापडलेली आहेत. अशीच उत्खनने किरवाडे, भोनगाव, भाडणे, भामेर, साक्री, दातरती, ढवळी विहिरपाडा इत्यादि ठिकाणी झाली आहेत. यांचा काळ सुमारे इ.स.पुर्व एक लाख ते तीस हजार वर्ष एवढा आहे.
उत्तर अश्मयुगीन स्थळे –
कासारे, गणेशपूर, खोरी, घोडदे, छडवेल, टिटाणे, नवडणे, मालपूर, म्हसदी, वसमार, शेणपूर, शेवगे ही आहेत. उत्तर पुराश्मयुगीन स्थळे इ.स.पूर्व तीस हजार ते दहा हजार वर्ष एवढा मोठा आहे. आष्ठाणे, आमखेल, इंदवे, धनेर, नवडणे, ब्राम्हणवेल, वासखेडी इत्यादि होय.
ताम्रपाषाणयुगीन स्थळे –
इ. स. पुर्व २५०० ते एक हजार वर्षे चि़ंचखेडे, चिकसे, छडवेल, जैताणे, दुसाणे, भाडणे, नाडसे, रूणबली, साक्री इत्यादि होय. नामशेष झालेल्या प्राण्यांच्या अश्मीभूत अस्थी दहिवेल आणि दाभलपाडा येथे मिळाल्या आहेत. साक्रीपासून चार किलोमीटर अंतरावर पश्र्चिमेला कवठे हे गाव आहे. १९५८ मध्ये डॉ वसंत शिंदे यांनी उत्खनन करून महाराष्ट्रातील शेतकरी साडेचार हजार वर्षांपूर्वी येथे रहात होते हे सिद्ध केले.येथील उत्खननात ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीची वसाहत सापडली आहे आणि त्यावरून खानदेश तसेच परत एकदा १८८४ मधील उत्खननातून प्रकाश पडला. येथली मृद्भभांडी ही इसवीसन पूर्व पाचशे ते पहिल्या शतकातील आहे. लाल दणकट भांडी, सावळदा संस्कृतीची भांडी, तपकिरी रंगाची गुळगुळीत भांडी, लाल राखी रंगाची भांडीजाड, तांबडी रंगाची भांडी या सर्व भांड्यावरून मानव पशुपालन करत होता हे समजते. उत्खननात विविध हत्यारे, शंखशिंपले, मणी मिळाले आहेत. हरप्पन संस्कृतीशी संबंध होता हे मण्यावरून कळते. दफन पध्दतीत शरीर उणाणे तर लहान मुलांना लांब आकाराच्या खड्ड्यात वाकलेल्या स्थितीत पुरत अनेक प्राण्यांच्या हाडांवरून उदरनिर्वाह करण्यासाठी विविध प्राण्यांवर अवलंबून होते हे दिसते.
प्रकाशे येथील उत्खननात ताम्रपाषाणयुगापासून तर मध्ययुगीन पुरावे सापडले आहेत. यांत उत्तर सिंधु, माळवा, जोरवे संस्कृतींचे अवशेष दिसतात. हत्यारे, पाती, चाकु, शिंपले, मातीच्या असंख्य वस्तू दिसतात. सातवाहन काळातील जीवन समजून घेण्यासाठी प्रकाशे येथील उत्खननात सापडलेल्या वस्तू उपयोगी आहे. इथल्या लोकवस्तीचा कालखंड इ. सन पूर्व १७०० ते इसवीसनाच्या तेराशे पर्यत आहे नंतर ते एक तिर्थक्षेत्र उदयास आलेले दिसते.
महाराष्ट्र-एक पुरातत्त्वीय समालोचन या पुस्तकातील यादीच्या आधारे खानदेशात (धुळे, नंदुरबार) जिल्ह्यातील ३०-४० हजार वर्षांपासून गावांनी अतिप्राचीन वैभवशाली इतिहास आपल्या उदरात साठवून ठेवला आहे. (इंडियन अर्किऑलॉजी-ए-रिव्हियू 1953 ते 54) तापी खोऱ्यात महाराष्ट्रातील पहिल्या शेतकरी वसाहतीचा उत्खननीय पुराव्यावरून शोध लागला. खानदेशवासीयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सावळदा (शिरपुरा-धुळे मार्गावर) येथे उत्तर हरप्पन काळात संस्कृती विकसित झाली ती सावळदा संस्कृती म्हणूनच (इ. स. पूर्व २२००-१८०० ते ) उदयास आली. खानदेशात एका स्वतंत्र संस्कृतीचा त्याकाळात उदय झाला. असा ऐतिहासिक वारसा अतिप्राचीन काळापासून धुळे व नंदुरबार भागास लाभला आहे. उत्तर हरप्पन संस्कृती ५ ते ४ हजार वर्षांपूर्वी येथेच विकसित झाली. त्या पुरातत्त्वीय संस्कृतीचे अवशेष कावठे (साक्री) येथील उत्खननात मिळाले.
खानदेशात २०० च्या वर प्राचीन संस्कृतीची स्थाने पुरातत्त्वीय संशोधकांना मिळाल्यास १०० च्या वर स्थाने धुळे जिल्ह्यात मिळाल्या. इ. स. पूर्व १४०० ते १००० जार्वे संस्कृतीकालीन अवशेष (अक्कलपाडा) चिंचखेडा येथे मातीची भांडी, खापरे व तांब्याचा भाला सापडला. यावरून येथे समृद्ध संस्कृती नांदत होती. नासा येथील अभ्यासक डॉ. पियानो यांच्या अभ्यासावरून खान्देशचा (धुळे जिल्ह्याचा) भूभाग भौगोलिक स्थित्यंतरानुसार ६६ लाख वर्षांपूर्वी तयार झाला. पांझरा नदी ही १० लाख वर्षांपूर्वी शेंदवडच्या डोंगरातून उगम पावली. धुळे जिल्ह्यास पांझरा, कान या नद्यांवर बंधारे बांधून त्या पाण्यावर अभिनव जलसिंचन व्यवस्था प्राचीन काळापासून आजतागायत सुरू आहे. प्रकाशा, कावठे येथील उत्खननात सापडलेल्या वस्तू, अलंकार, मणी, भांडी वैभवाची साक्ष देतात. लोकसंस्कृतीची, गणराज्याची समृद्ध संपभूमी होती. इ. स. पूर्व काळात मौर्यांनी येथे सत्ता स्थापली. इ. स. पूर्व २३० च्या सुमारास सातवाहनांचे वर्चस्व निर्माण झाले. महत्त्वाचे व्यापारी मार्ग (सार्थवाहपथ) याच जिल्ह्यातून गेल्याने व्यापारी महत्त्व वाढले. सुरत-बऱ्हाणपूर सुरत-नागपूर, नागपूर-आगा इत्यादी मार्ग. इ.स. २४० ते ४१९ पर्यंत अभिरांनी या प्रदेशावर राज्य केले. खान्देश प्राचीन काळापासून अभिरांची म्हणजे अहिरांची भूमी म्हणून ओळखली जाते. पुढच्या काळाचा आढावा घेण्यासाठी खानदेशात आणि त्यांच्या परिसरात, सीमांवर असलेल्या बौध्द लेणींचा आढावा घेऊ या.खानदेशातील अश्मयुगीन स्थळे.
Khandesh