पानिपत!!
मराठ्यांनी १७ व्या शतकात गाजवलेली शौर्यभूमी!! प्रत्येक मराठी माणसाच्या अगदी जिव्हाळ्याचा पानिपत हा विषय आहे. आता १४ जानेवारी जवळच येत आहे. त्यादिवशी अनेक माहितीपूर्ण लेख पानिपत वर येणारच आहेत. अनेक संदर्भ ग्रंथ आणि अभ्यासाला उपयुक्त अशी पुस्तके असताना परदेशात असणाऱ्या श्री Manoj Dani सर यांनी एक महत्वाचा संदर्भ ग्रंथ याच विषयावर लिहिलेला आहे.
पानिपत युद्धात मराठ्यांनी केलेला खर्च, त्याची असलेली नोंदी . तसेच भाऊ पेशवे, अहमद शाह अब्दाली, रोहिला, दिल्ली या संदर्भात असलेली अनेक दुर्मिळ चित्रे त्यांनी देशविदेशातील म्युझिअम मधून मिळवून या संदर्भ ग्रंथात प्रकाशित केलेली आहेत.
प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी सर्व माहिती अतिशय छान संकलित केलली आहे. खरे तर पानिपत हे मी स्वतः मागच्या वर्षी संपूर्ण पाहून आणि ४ दिवस अक्षरशः जगून आलो होतो. पण या पुस्तकाने त्या जगण्याला एक मौलिक अर्थ मिळवून दिलेला आहे.
मनोज दाणी सर यांचे याच विषयावर एक व्याख्यान ही येत्या शनिवारी आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहेत. पण असे दुर्मिळ छायाचित्रे छापलेले त्यांचे पुस्तक त्या आधी हातात येणे ही माझ्यासाठी खूपच महत्वाची गोष्ट आहे. सदरहू ग्रंथ हा इंग्रजी मधून असून त्यात अनेक दुर्मिळ आणि कधीही न पाहिलेली चित्रे आहेत!! अशी अभ्यासात्मक ग्रंथ संग्रही असणे हे खरे तर मोठे भाग्यच म्हणायचे!!
आपल्या या अदभुत आणि अविस्मरणीय कामगिरीसाठी आपणस मानाचा मुजरा सर!!
बहुत काय लिहिणे!!
किरण शेलार.