पानीपत भाग २ –
अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासाचं एक अजरामर पान…
सुरुवातीला सदाशिवराव यांचे निर्णय मान्य नसल्याने व युद्ध हरते पाहुन अनेक सरदार मंडळी एनवेळी रणांगण सोडून गेली पण जनकोजी शिंदे व मानाजी पायगुडे मात्र शेवट पर्यंत लढत होते भाऊंसोबत पुढे भाऊ हि रणांगनावर दिसेनासे झाले..हे बघून फौज घाबरली व पळत सुटली..घात झाला..मराठे युद्ध हरले..मराठ्यांची पुर्ण एक पीढी ह्या युद्धात कामी आली.सदाशिवराव,विश्वासराव, मानाजी पायगुडे, बळवंतराव मेहेंदळे,, अशी अनेक मोठी सरदार मंडळी कामी आली..जनकोजी शिंदे,इब्राहिमखान गार्दी जिवंत कैदेत सापडले त्यांचा गीलच्यानी तिथेच खून केला.समशेरबहाद्दर परत येत असताना जाटाच्या मुलखात दिग येथे वारला,मराठ्यांच्या सर्व सैन्याची वाताहात झाली.. पुढील सहा महिने जगली-वाचलेली फौज आणि इतर लोक महाराष्ट्रात परतत होते.(पानीपत भाग २)
पानिपतच्या भूमीवरून विश्वासराव यांनी वडील नानासाहेब पेशवे यांना लिहिलेले एक पत्र हृदयाचा ठाव घेणारे आहे. त्यामध्ये ते लिहितात की, ‘फौज व खजिना पाठविणे. मी आपल्यासाठी लिहित नाही, माझ्यासारखे पुत्र आपल्यास आणखी आहेत व होतील; परंतु भाऊसाहेबांसारखा बंधु मिळणार नाही.ʼ नानासाहेब फौज घेऊन निघाले हि होते पन त्यांणा ज्यावेळी युद्ध झाल्याची बातमी समजली तेव्हा युद्ध होऊन चार दिवस लोटले होते..नानासाहेब यांना भेलशा मुक्कामी पानिपतच्या अपाताची बातमी संशयित स्वरूपात पत्राद्वारे कळली ते पत्र असे त्याचा मजकूर होता कि “दोन मोती गलत, दसविस अश्राफत,रुपयोके गणती नही” हि सावकारी भाषेत लिहलेली बातमी पाणीपताहून आली..
“दोन मोती गळाले, लाख बांगडी फुटली, 27 मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणतीच नाही, असं या लढाईचं वर्णन केलं गेलं. सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव हे सेनापती, 27 सरदार आणि प्रचंड सैन्य कामी आल्याने पानिपतच्या लढाईचं असं वर्णन केलं जातं. मराठ्यांचे सामानसुमान तर सर्वच गेले डेरे,तंबू ,राहुट्या,वस्त्रे पात्रे,दागदागिने सगळं लुटलं गेलं.पन्नास हजार घोडे,तसेच हजारो बैल,उंट,खेचर,तट्टे वैगरे वाहतुकीची जनावरे,हत्ती,तोफा व हजारो शस्त्रे गिलच्याना मिळाली. अब्दाली व रोहिल्यांचे सुमारे चाळीस हजार माणूस मारले गेले व घोडे हि बरेच मेले.बाकी वेगळं त्यांचं नुकसान काही झालं नाही. (पानीपत भाग २)
पानिपताच्या या लढाईनंतरही उत्तरेत मराठ्यांचं राज्य होतं. मात्र दख्खन प्रांतात नेतृत्वाची उणीव निर्माण झाली. मराठी विश्वकोशाने तीन संदर्भग्रंथांच्या आधारे पानिपतच्या लढाईचा परिणाम मांडला आहे.तीन दिवसांनंतर, दि. १७ जानेवारी या दिवशी अहमदशहा अब्दाली दिल्लीत परतला. जयपूरच्या सवाई जयसिंहाचा पुत्र माधोसिंह याला लिहिलेल्या पत्रात अब्दाली म्हणतो, “आमच्या शत्रुनेसुद्धा त्या दिवशी स्वतःला नामांकित करून सोडले. ते इतक्या उत्कटतेने लढले की, असे लढने इतर कोणाच्याही शक्तीबाहेरचे होते… आमच्या त्या निधडया छातीच्या रक्त वाहवणाऱ्या शत्रुंनीही आपल्या कामात कसूर ठेवली नाही. हेच काय, पण अत्यंत महनीय कीर्तिस्पद अशी कृत्य रणांगणात करून दाखवली….हे पत्र मूळचे फारशीतले आहे.याच सुमारास अब्दालीने पुण्याला नानासाहेब पेशव्यांकडेही एक पत्र रवाना केले. ‘आमची स्वतःची इच्छा (युद्ध करण्याची नव्हती, परंतु तुमच्याच भाऊसाहेबांच्या हट्टामुळे झाले). त्यात तुमचे बंधू, पूत्र व इतर लोक गेले याचा आम्हासही बंद आहे. आता याउपर आपण कायमचा तह करावे हेच बरे’.
मराठे युद्ध हरले पन नंतर अब्दालीच्या मनात मराठ्यांचा इतका दरारा झाला की त्याने पुन्हा कधी हिंदुस्थानाकडे पाहिले नाही त्याचे ह्या युद्धात जबरदस्त नुकसान झाले त्याची हि आरधी फौज कापली गेली.. पुढे 5 महीने झाले व नानासाहेब गेले..थोरले माधवराव गादिवर आले आणि त्यांनी जनु पानीपताची भरपाई सुरु केली..पुन्हा मराठा जरीपटका गगनी डोलला,निजाम ,हैदर,सर्व शत्रु गार झाले महादजी शिंदे यांनी तर नजिबखानची कबर फोडून त्याच्या हाडांना आग लावली.व काहीच वर्षात भगवा थेट दिल्लीवर फडकला.(पानीपत भाग २)
सरत्या शेवटी कुसुमाग्रज यांची एक कविता सांगतो…
समर भूमीचे सनदी मालक शत युद्धाचे मानकरी
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
घोरपडीला दोर लावूनी पहाड-दुर्गट चढलेले !
तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले !
खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले !
बाप असे कलिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची !
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची !
पहाड डोंगर इथे संगती अजिंक्यता अभिमानाची !
जगदंबेचा पालव येथे लढ्वैय्यांच्या सदा शिरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
करवत कानस कोणी चालावो, पिकावो कोणी शेत मळा !
कलम कागदावरी राबवो धरो कोणी हातात तुळा !
करात कंकण असो कोणाच्या व भाळावर गंध टिळा !
शिंग मनोरयावरी वाजता उभी छावणी घरोघरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
पोलादी ‘निर्धार’ अमुचा असुरबळाची खंत नसे !
स्वतंत्रतेच्या संग्रामाला ‘विजया’ वाचून अंत नसे !
श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बळवंत असे !
मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
भरत भूमीचा वत्सल पालक देव मुनींचा पर्वत तो !
रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त स्वराने पुकारतो !
“हे सह्याचाल, हे सातपुडा !” शब्द अंतरा विदारतो !
“त्या रक्ताची, त्या शब्दाची” शपथ अमुच्या जळे उरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !!
जंगल जाळा परी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे !
वणव्याच्या आडदांड गतीला अडसर आता कुठला रे !
तळातळातुनी ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे !
स्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी !
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी !
– कविवर्य कुसुमाग्रज
बहुत काय सांगणे !
आपण सुज्ञ आहात.
संदर्भ सुची –
१)राजवाडे खंड १, ले. १;
२)शिंदेशाही इतिहासाची साधने ३, ले. २०४
३)पेशवे दप्तर.२१.ले १६०
४)पेशव्यांची बखर – का.ना.साने
५)भाऊसाहेबांची कैफियत – र.वि. हेरवाकर
६)श्रीमंत नानासाहेब पेशवे – रियासतकार देसाई
७)द मराठाज (देशमुख-वतनदार-छत्रपती-पेशवा) – डॉ.स्टुअर्ट गॉर्डन
८)सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ – कौस्तुभ कस्तुरे
९)पेशवाई – कौस्तुभ कस्तुरे
१०)अंताजी माणकेश्वर गंधे – कौस्तुभ कस्तुरे
लेखन – प्रसाद पाठक ,नंदुरबार
इतिहास अभ्यासक मंडळ