महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,37,912

पानशेत धरण

By Discover Maharashtra Views: 4040 2 Min Read

पानशेत धरण

बेधुंद पाऊस, हिरवीगार झाडी, पाण्यात डुंबणारी भात शेती, पावसात डोक्यावर इरलं घेऊन शेतात काम करणारा शेतकरी, डोंगरावरून कोसळणारे धबधबे, नागमोडी वळणाची डांबरी वाट आणि या वाटेजळूनच तुडुंब वाहणारी नदी…..असा अदभुत निसर्ग अनुभवायचा असेल….. तर तुम्हाला आताच पानशेत धरण धरणाची वाट धरावी लागेल.

पानशेत धरण हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आंबी नदीवरील धरण आहे. हे धरण पुण्यापासून अंदाजे ५० कि.मी. अंतरावर आहे. हे धरण मातीचे आहे. या धरणामुळे बनलेल्या पाण्याच्या साठ्याला तानाजीसागर असे नाव देण्यात आले आहे. १२ जुलै १९६१ रोजी या धरणाची भिंत फुटून नदीला मोठा पूर आला आणि पुणे शहराचे नुकसान झाले.

पानशेत धरणाकडे जातांना आपल्याला मोसे नदीवर बांधलेले वरसगाव धरण (सध्याचे वीर बाजी पासलकर धरण) ही दिसते.

दोनही धरणाच्या मध्ये असलेल्या MTDC च्या पुढे हिंदवी स्वराज्य स्थापनेचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचा पुतळा उभारला आहे. छ्त्रपति शिवरायांच्या स्वराज्य कार्यात प्रारंभी सहभागी झालेले बाजी पासलकर हे स्वरज्याचे पहिले सरसेनापती होते. ह्या पराक्रमी पुरूषाचा ईतिहास प्रेरणादायी असाच आहे. मोसे खोर्याधतील मोसे बु. गावाचे हे भुमिपुत्र. पुरंदरच्या हल्लात शत्रुला नामोहरम करणारे वीर बाजी पासलकर खळद बेलसर जवळ धारातीर्थी पडले. हिंदवी स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणारे बाजी पासलकर शूर वीर होते.

या पुतळ्यापासून डावीकडील रस्ता MTDC कडे जातो, तोच रस्ता पुढे पानशेत बोटींग क्लब कडे जातो. पानशेत धरणाच्या काठावर पानशेत बोटींग क्लब आहे. येथे तुम्ही बोटिंग करू शकता यात Speedboat आणि Kayaking आनंद घेऊ शकतात. काठावरच एक रेस्टॉरंट आहे जेथे आपण चवदार कांदा भज्जी, मिसळ-पाव आणि जेवणाचा आनंद घेऊ शकता. या रेस्टॉरंटमधून संपूर्ण धरणाचा सुंदर निसर्ग दिसतो.

माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti
Leave a Comment