महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,23,981

पट्टा

By Discover Maharashtra Views: 1481 2 Min Read

पट्टा –

पट्टा हे मराठ्यांच आवडत शस्त्र. ‘आक्रमण हेच संरक्षण’ हे या शस्त्राचे वैशिष्ट्य आहे. तुम्ही पट्याने जेवढे आक्रमण कराल तेवढे तुम्ही सुरक्षित राहाल. पट्टाहे शस्त्र तलवारीपैक्षा (धोप) लांब असून याच्या मुठीला ‘खोबळा’ म्हणतात.

तलवारीत जशी मुठ सुरक्षित असते तशी पट्यात हाताच्या कोप-या पर्यंत हात सुरक्षित असत. पट्टा पकडायला खोबळ्याच्या आत मुठीने पकडायला आडवी दांडी असते तर टोकाला कड्या असतात. पात पोलादाच असून जास्त करून हे पात युरोपिअन असते.

लढाई साठी वापरले जाते ते कडक पात्याचे किवा लवचीक पात्याचे पट्टे असतात. तर दांडपट्टा हे शस्त्र ऐका हातात दांड ( दंड ) तर दुस-या हातात पट्टा हातात घेऊन पट्टाचालवायच शिक्षण दिल जात. दांड वपट्टा मिळून दांडपट्टा शब्द तयार झाला असावा. या पट्टाचा खोबळा हा लहान असून तो मुठी येवढा असतो. अशे दांडपट्टे आखाड्यात किवा मर्दानी खेळ करणारे यांच्या कडे पाहायला मिळतात.

महाराजांच्या सैन्यात अशा पट्टेकरांची फौज पाहायला मिळते. दहा धारकर्यांना एक पट्टेकरी भारी असतो. शिवाजी महाराजांची जी विश्वसनीय चित्र उपलब्ध आहेत त्या चित्रात महाराजांनी पट्टा धारण केला आहे. पट्टाहा त्यांचे आवडते शस्त्र. त्यांच्या पट्टया चे नाव यशवंत होते.

पट्टा शस्त्र हे चालवणे खूप अवघड असते. एकादा तो पट्टाचालवायला लागला की तो एकदम पट्टाईत  होतो. ‘पटाईत असणे ‘ हा वाक्रप्रचार  या मुळे आला असावा. पट्टाचालवताना शत्रूची गर्दन कधी मारली जाईल हे कळत पण नसे.

जिवा महाला य‍ा शस्त्रात पटाईत होता. प्रतापगडाच्या युध्दात सय्यद बंदाचा हात या शस्त्राने  कलम केला होता असे पुस्तकात उल्लेख मिळतात. आनेक घराण्यात , संग्रहालयात आनेक प्रकारचे पट्टे पाहायला मिळतात. गरागरा फिरवी पट्याला.

संतोष चंदने, चिंचवड, पुणे.

Leave a Comment