मैंदर्गी येथील ऐतिहासिक प्याटी बावी विहीर –
ग्रामीण भागातील प्रत्येक गावचे एक वैशिष्ट्य बघायला मिळते.त्याचे ऐतिहासिक पुरातन पाऊलखुणा पाहण्यास मिळतात असेच ऐतिहासिक गाव म्हणजे अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गाव नुकतेच गावाला भेट देण्याची योग आला..मित्रबंधू गणेश गोब्बूर यांच्या सहकार्याने मैंदर्गी गावातील विविध स्थळाला भेट घेतली त्यातलीच ऐतिहासिक पुरातन प्याटी बावी विहीर आहे.
अक्कलकोट तालुक्यातील महत्त्वाचे गाव शहर मेंदर्गी हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील गाव आहे. कुरुंदवाड संस्थानात हे तालुक्याचे ठिकाण होते. मैदंर्गीची सुरुवात इ. स. १५०० च्या शतकाच्या मध्याला झाली आहे. सुरुवातीला मेंदर्गी येथे वीरशैव लिंगायत धर्माचे बिदर येथे देशमुख करणारे देशमुख म्हणजे सध्या आडनाव बदल झालेले केसूर, पाटील आणि कलमनी बंधू या ठिकाणी आले असल्याची माहिती वीरशैव लिंगायत धर्माचे धर्मपीठ उज्जैनी येथे नोंदले आहे.
गावात प्रवेशासाठी हिप्परगा, सलगर, उडगी आणि कमळा असे चार वेस आहेत, कमळा हे गावाचे नाव नसून जुन्या काळच्या एका बागेचे व विहिरीचे नाव आहे. कमळा वेस भागात ग्रामदैवत महादेव मंदिर आहे. सध्याचे मंदिर साधे आहे, जुने प्राचीन मंदिर पडले आहे, मंदिराचे अवशेषानी बावासाहेब विहिरीचे बांधकाम झाले. आजही अवशेष दिसतात. महादेवाची जत्रा ही रुढी, परंपरेनुसार ऐतिहासिक व अनोखी आहे. अनेक वर्षांपासून जत्रेच्या निमित्ताने आठवडे बाजार भरवला जातो. जत्रेची सुरुवात इ. स. १५०० मध्यास सुरुवात झाली आहे.
मेंदर्गी गावात शिवयोगी शिवचलेश्वर यांची अलौकिक कथा असलेले चरित्र घडले. शिवयोगी शिवचलेश्वरास ग्रामदैवताचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यांचा महिमा इ. स. १८९० च्या दशकात लोकांना जाणवला. त्यांचा पालखी महोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होतो. पालखी महोत्सवाची सुरुवात इ.स १९४२ ला, तर रथोत्सवाची इ.स.१९६२ला झाली. ग्रामदैवत महादेव जत्रेच्या मानकरी व त्याच पद्धतीने रथोत्सव साजरा केला जातो.अशा ऐतिहासिक मैंदर्गी गावातील प्याटी विहीर बदल सांगणार आहे.
ग्रामीण भागात मोठमोठ्या विहीर दिसून येतात मैंदर्गी येथील पुरातन प्याटी बावी विहीर भव्य आहे.मैंदर्गी गावात विहीर आहे.यंदा पाऊस भरपूर झाल्याने विहीर पाण्यानी भरलेले आहे.जसे पाण्याचे झरे लागतात तशी विहीरीची रचना केली आहे.विहीरीची भव्यता बघण्या सारखे आहे.वैशिष्ट्यपूर्ण काळ्या दगडी बांधकाम केले आहे.अजूनही बांधकाम भक्कम आहे.विहिरीत खाली जाण्यासाठी पायरी व्यवस्था केलेली आहे.आतापर्यंत एकदा विहीर तळ दिसला नाही.पाणी अटलेला नाही असे जाणकार जुने मंडळी सांगतात.
विहिरीत भिंतीवर शिलालेख बसवले आहे यंदा पाणी जास्त असल्यामुळे शिलालेख दिसले नाही.माहिती नुसार या शिलालेखात गणपतराव बापूसाहेब पटवर्धन आधिपती कुरुंदवाड संस्थान यांनी शके.१७९८ मध्ये प्याटी विहिरीचे जिर्णोदार करण्यात आले आहे.सध्या ऐतिहासिक विहीर मैंदर्गीत प्रवेश केल्यानंतर बस स्थानककडे जाताना उजव्या बाजूला लागतो.विहीरचा सुरक्षित विचार करून स्थानिक नगरपरिषदने लोंखडी चाळी बसलेले आहेत.
विहीरत वरच्या बाजूला पाणी काढण्यासाठी जुन्या पद्धतीचे रोल बसविले आहेत.सध्या विहीर च्या बाजूला बांधकाम सुरू आहे.विहीरी च्या चौही बाजूने घरे असून मध्यभागी विशाल व भव्य विहीर आहे.ऐतिहासिक पुरातन प्याटी विहीर हे मैंदर्गी शहराचे वैभवात भर टाकणारी स्थळ आहे.त्याची जतन व संवर्धन होण्याची गरज आहे.खरोखरच एक ऐतिहासिक व पुरातन विहीर वास्तू पाहून मन प्रसन्न झालं.मैदर्गी सामाजिक कार्यकर्ते मित्रबंधू गणेश गोब्बुर यांच्या मुळे शक्य झालं.
मैंदर्गी गाव ऐतिहासिक गाव आहे.अनेक पुरातन गोष्टी मैंदर्गीत पाहण्यास मिळतात यापुढे पुन्हा मैंदर्गी च्या ऐतिहासिक पुरातन गोष्टी पाहणार आहोत…
धन्यवाद
फोटो व संकलन – धोंडपा नंदे,वागदरी