सज्जनगड येथील फारसी शिलालेख –
१)सज्जनगडाच्या दुसऱ्या दरवाजातून (श्री समर्थ महाद्वार) आत आल्यावर उजव्या बाजूस भिंतीवर हा सज्जनगड येथील फारसी शिलालेख आहे.
२)हा लेख काळ्या पाषाणात उठावदार पध्दतीने सहा भागात कोरलेला असून डाव्या बाजूस ३ व उजव्या बाजूस ३ अश्या स्वरुपात त्यांची रचना आहे. प्रत्येक भागा भोवती नक्षीचे वेष्टन असून त्यामुळे लेखास सौंदर्य आले आहे.
३)लेखातील मजकुर फारसीतील नस्खी पद्धतीत लिहीला आहे.
४)लेखातील कालोल्लेखात महीन्याचे व तारेखेचा उल्लेख ‘३ जमादिलाखर ‘ असा आला आहे. पण ३ हा अंका विषयी शंका असून , जरी तो ग्राह्य धरला तरी सालाचा उल्लेख नसल्यामुळे दरवाज्याच्या पायाचे बांधकाम केव्हा झाले हे कळत नाही.
५)दुसऱ्या इब्राहिम आदिलशहाच्या पूर्वी रेहानचा उल्लेख आढळत नाही. मुहम्मद आदिलशहाच्या कारकिर्दीत दोन रेहान आढळतात – एक सीदी रेहान व दुसरा मलिक रेहान. ह्या दोघांपैकी उपर्युक्त लेखातील रेहान कोण हे सध्या कळत नाही.
फारसी लेखाचे देवनागरी लिप्यांतर –
१. दौलत झ दरत हमहरा रुए नुमायद
२. हिम्मत झ कार ऊ हमह नुव्वार कुशायद
३. तू कब्लह व मर हाजतमन्द हाजती
४. हाजत हमह अझ दर कब्लह वर आयद
५. बिनाए दरवाझह इमारत किलअ परेली आमिर शुद बतारीख ३
६. दर जमदिउल् आखिर कार कर्द रेहान आदिलशाही
फारसी लेखाचे मराठीत भाषांतर –
१. ऐश्वर्य तुझ्या दारातून सर्वांना तोंड दाखवीत आहे.
२. हिम्मत त्याच्या कामामुळे (काम झाल्यामुळे) सर्व फुलांना प्रफुल्लीत करीत आहे.
३. तू विवंचना दूर होण्याचे स्थान आहेस, परंतू पुन्हा विवंचना युक्त आहेस.
४. तुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात.
५. व ६. परेली किल्याच्या इमारतीच्या दरवाजाचा पाया ३ जमादिलाखर या तारखेस तयार झाला. आदिलशाही रेहान याने काम केले.
– ग.ह.खरे (ऐतिहासिक फारसी साहित्य खंड १)
सज्जनगड येथील फारसी शिलालेख
Prathamesh Khamkar Patil