महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,27,379

फलकलेखा | आमची ओळख आम्हाला द्या

By Discover Maharashtra Views: 2446 3 Min Read

फलकलेखा –

आमची ओळख आम्हाला द्या, लेख क्र.२ –

महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांच्या मंडोवरावर आपणास देवांगणांचे अर्थात सुरसुंदरी यांचे अंकन केलेले दिसून येते. मूर्तिशास्त्रासंबंधी माहिती देणाऱ्या ग्रंथांमध्ये देवांगणांचे एकूण 32 प्रकार वर्णिले आहेत. त्या प्रकारांमध्ये विविधता आहे. देवांगणांच्या या मांदियाळीत आपणास आढळणारी फलकलेखा ही देवांगणा आज आपण पाहणार आहोत. शिल्प प्रकाश या ग्रंथामध्ये पत्रलेखा या देवांगण यासंबंधी एक श्लोक पहावयास मिळतो तो असा की,

दक्षिण हस्त कमले ताडपत्री रंग धरित्री,
ललाटे चंद्ररेखाच समान विस्तरे सदा.

याचा मराठीत अर्थ असा होतो की, उजव्या हाताने ताडपत्र धरलेले, भाळावर अर्थ चंद्राप्रमाणे कुंकू रेखाटलेले  अशी देवांगणा म्हणजे पत्रलेखा होय. ग्रंथांमध्ये असा उल्लेख असताना देखील जी फलक लिहित आहे तिला पत्रलेखा म्हणणे कितपत योग्य आहे. सामान्यतः आपण विचार करून पाहिल्यास एखादी स्त्री जर पत्र लिहित असेल तर ती हातात कागद आणि पेन घेऊन खाली मान करून पत्र लिहिते. असे पत्र लिहिणार्‍या देवांगणाचे शिल्प खजुराहोच्या मंदिरावर आहे. हे शिल्प पाहिल्यास आपण पत्र लिहिणारी देवांगना कशी असते याचा अंदाज लावू शकतो. पत्र लिहिणार्‍या देवांगनेच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य ,पत्र लिहिणार्‍या व्यक्तीविषयीच्या तिच्या मनातील भावना स्पष्ट दिसतात.

पत्र लिहीत असताना शरीराची होणारी हालचाल, स्थिती या शिल्पात पहावयास मिळते. त्यामुळे तिला पत्रलेखा म्हटले जाते. परंतु महाराष्ट्रात पत्रलेखा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या देवांगणा कोरवली, होट्टल, धर्मापुरी, खिद्रापूर, मार्कंडा इत्यादी मंदिरावर स्थित आहेत. या प्रत्येक देवांगणाना पाहिल्यास त्यांना कोणत्या अंगाने पत्रलेखन संबोधावे? कारण ह्या देवांगणेस  पाहिल्यास हीची उभारण्याची पद्धत, फलक धरण्याची पद्धत, लिहिण्याची पद्धत यावरून ती पत्र लिहिते का फलक लिहिते ? हे सुज्ञ वाचकांनीच ठरवावे. कागद हातात धरून पत्र लिहिले जाते असे फलकावर पत्र लिहिले जाते का? पत्रलेखा जर देवाला अथवा तिच्या प्रियकराला पत्र लिहीत असेल तर ते गोपनीय असेल .पण एखादा मजकूर हा सार्वजनिक असेल तर तो फलकावर लिहिला जातो. मग पत्र आणि फलक यामध्ये फरक आहे की नाही ?

फलक लिहिणाऱ्या देवांगणेला पत्रलेखा कसे संबोधले गेले? जी देवांगणा फलकावर काहीतरी लिहिते तिला पत्रलेखा म्हणावे का? जिला आम्ही फलकलेखा संबोधत आहोत तिची लिहिण्याची पद्धत पहावी. त्यावरून आपल्या सहज लक्षात येईल की ती फलक लेखन करीत आहे, पत्रलेखन नाही. त्यामुळे मी दोन्ही फोटो याठिकाणी वाचकांना उपलब्ध करून देत आहे ज्यावरून आपणास नक्कीच समजेल कि ,ती फलकलेखाच आहे.हे नांव सर्वप्रथम  प्रदीप म्हैसेकर यांनी सुचविले त्यावद्दल त्यांचे आभार, Sanjay Paikrao व Mayuresh Khadke,zakir Pathan Zaker यांचेहे आभार

पूर्वीचे नांव चूकीचे ठरवून तिला नवीन नाव देण्याचा हा अट्टाहास नाहि.संशोधनात नवनवीन पैलू समोर येत असतात.नवीन माहिती नव्याने समोर येत असते त्यामूळे अभ्यासकांना सत्य स्विकारले पाहिजे.संशोधन हि कधीहि न संपणारी प्रक्रिया आहे असे म्हटले जाते.त्यामूळे ह्या शिल्पावर चर्चा होणे अपेक्षित आहे.!!!!! आता वाचकांनीच ठरवावे फलकलेखा कि पत्रलेखा.वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया जरूर कळव्यात.

डाॅ.धम्मपाल माशाळकर, सोलापूर

Leave a Comment