महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,17,176

बौद्ध धर्मीय कोंबोडिया च्या चलन आणि झेंड्यावर हिंदू मंदिराचे चित्र

By Discover Maharashtra Views: 3672 5 Min Read

बौद्ध धर्मीय कोंबोडिया च्या चलन आणि झेंड्यावर हिंदू मंदिराचे चित्र

आग्नेय आशियातील कंबोडिया नावाचा अगदी 1.5 कोटी लोकसंख्या व 69, 898 चौरस मैल क्षेत्रफळ असणारा देश ज्याची राजधानी नाम पेन्ह ( phnom penh ) असून 9 सप्टेंबर 1953 ला तो फ्रेंचापासून स्वतंत्र झाला. कंबोडियाला प्राचीन इतिहास असून त्याचे जुने नाव कंबोज आहे. कंबोज म्हणजे महाभारतातील कुंभोज देश. इ. स. च्या 8 ते 14 व्या शतकापर्यंत येथे खमेर वंशीय हिंदूचे राज्य होते. या घराण्याची राजधानी ‘ अंकोरथोम ’ होती. मेकोंग नावाची 4500 किमीवर प्रवास करणारी भली मोठी नदी आणि याच नदीपात्रात तयार झालेले टोणले शॕप नावाचे 200 किमी लांबीचे सरोवर येथे आहे. त्यामुळे येथील जमीन सुपीक असून वातावरण अतिशय छान असल्याने या परिसरात वस्ती वाढली असावी. 1953 साली फ्रेंचापासून स्वतंत्र झाल्यानंतर येथे संवैधानिक राजेशाही आहे. कारण कंबोडियाचे घोषवाक्य आहे, “ देश, धर्म आणि राजा” कंबोडियन रियाल हे त्यांचे चलन तर लाल रंगाचा झेंडा त्यांचा राष्ट्रध्वज आहे. जवळपास 98% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. अशावेळी कंबोडियाच्या जनतेने आपल्या चलन आणि ध्वजावर मंदिराचे चित्र राष्ट्रीय स्मारक म्हणून ठेवलेले आहे.बौद्ध धर्मीय कोंबोडिया.

मुळातच 14 व्या शतकापर्यंत कंबोडियावर हिंदू राजाची सत्ता होती. ख्मेर राजा जयवर्धन यांनी मेकोंग नदीकाठी अंगकोर थोम नावाने आपली राजधानी थाटली होती. त्याचे मूळ नाव ‘यशोधरपूर ’ होते. त्यांची राजभाषा ही संकृत होती हे त्या परिसरात सापडलेल्या जवळपास 80 शिलालेखावरून स्पष्ट होते. आजही ख्मेर ही कोंबोडियाची राजभाषा आसून यातील बरेच शब्द हे संस्कृत भाषेशी मिळतेजुळते आहेत. उदा. चक्र, ऋषि, देवी ऐवजी तेवी, विद्या ला विदिया, पैसा, सूर्य ला सु ऊर.

ख्मेर राजा सूर्यवर्मनने बांधले जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर –

अंगकोर थोम ही ख्मेर वंशाची राजधानी. याच परिसरात ख्मेर राजांनी अनेक मंदिरे बांधली. मात्र इ. स. 1113 ते 1145 ला सूर्यवर्मण II याने अंगकोर किंवा अंकोर वाट नावाचे जगातील सर्वात मोठे मंदिर बांधले. यातील अंकोर शब्दाचा अर्थ होतो – नोकोर म्हणजे नगर आणि वाट म्हणजे वाटिका अर्थातच मंदिराची नगरी. 162.6 हेक्टर म्हणजेच जवळपास 402 एकर परिसरावर हे मंदिर पसरलेले असून ते जगातील सर्वात मोठे मंदिर आहे. 1.5 टन वजनाचे सुमारे 1 कोटी दगड याकरिता वापरलेले आहेत. गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झालेली असून दरवर्षी अंदाजे 40 लाख पर्यटक या मंदिराला भेट देण्याकरिता येत असतात.

अंकोरवाट मंदिर हे मूळचे विष्णु मंदिर असून ते पाश्चिमाभिमुख आहे. कारण मोक्षाचा मार्ग त्यादिशेने जातो म्हणून त्याची दिशा त्याप्रमाणे ठेवण्यात आल्याचे दर्शविले जाते. संरक्षणासाठी अंकोर वाट मंदिराभोवती 700 फुट रुंदीचा खंदक खोदलेला असून त्यावरून मंदिरात जाण्यासाठी 100 फुट रुंदीचा एक सेतु बांधलेला आहे. तर मंदिराभोवती 3.5 किलोमीटर लांबीची तटबंदी आहे.मंदिराला अनेक शिखरे असून त्यातील मुख्य शिखर हे 64 मीटर म्हणजे 210 फुट उंचीचे आहे. मंदिराच्या बाह्य प्रांगणात भिंतीवर अनेक शिल्प कोरलेली असून त्यावर शिव, विष्णु, गणेश तसेच रामायणातील अनेक प्रसंगाचे चित्रण केलेले आहे. त्यात राम रावण युद्ध, रामाचे अयोध्यात आगमन यासारख्या शिल्पाचा समावेश होतो.
परकीय आक्रमण आणि याच घराण्याने स्वीकारलेला बौद्ध धर्म यामुळे विष्णुच्या मूर्तीला पुढे बुद्धाचे रूप आले. कालानुरूप घनदाट जंगलातील या मंदिराकडे दुर्लक्ष होऊन अंकोर थोम परिसर निर्जन झाला. त्यामुळे सर्वत्र झाडी वाढली. काही झाडाची ऊंची पाहताना डोक्याची टोपी पडते. आठराव्या शतकात कंबोडियावर फ्रेचांची सत्ता आली. अशावेळी 1860 साली फ्रेंच शास्त्रज्ञ हेनरी मेहोट याने या परिसरातील झाडाविषयी माहिती घेत असताना त्यांना दुर्लक्षित झालेल्या या खजिन्याचा शोध लागला. आणि अंकोरवाटचा हा ठेवा जगापुढे आला. स्वातंत्र्यानंतर कोंबोडियन सरकारने यावर विशेष लक्ष दिले. 98 % लोकसंख्या ही बौद्ध असताना 1983 साली अंकोरवाट हे हिंदू मंदिर कोंबोडियाच्या झेंड्यावर आणि चलनावर आले. आज अंकोर वाट मंदिरामुळे कोंबोडियाच्या अर्थव्यस्थेला अर्थ प्राप्त झालेला आहे.

यासाठी आपणाला सिमरिप नावाच्या अगदी सुधारित शहरात मुक्काम करावा लागतो. तेथून अगदी चार पाच किलोमीटर परिसरात अंकोरवाट आहे. इतरही भरपूर ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. त्यात टोणले शॉप नावाचे 200 किमी लांबीवर पसरलेले सरोवर. या सरोवरात जगातील वेगळी असणारी तरंगणारी गावे आहेत. ज्यांना कुठलेही नागरिकत्व मिळालेले नाही. यांची शाळा, दवाखाना, पोलिस ठाणे, मंदिर, दुकान असे सर्वकाही तरंगनारे आहे. येथे फिरताना तेथील पैसे मागणार्‍या लहान मुलाच्या गळ्यात अडकवलेले महाकाय अजगर पाहताना भीती वाटते. मगरीचे मुझियम पाहण्यालायक आहे. अलीकडे नाइट लाईफ साठी हे शहर प्रसिद्ध पावत असल्याने परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे हजेरी लावताना दिसतात. काही असो एका हिंदू राजाने बांधलेल्या विष्णु मंदिरांने जगात सर्वोत्कृष्ट म्हणून नावतर कमावलेच परंतु एका देशाची अर्थव्यवस्थाही सुधारून टाकली. रूपयाच्या तुलनेत 65 रुपये मिळतात त्यामुळे फार खर्चही येत नाही. हैद्राबाद, चेन्नईवरून सिमरीपला सहज जाता येते. शिवाय जवळच थायलंडचा दौराही होतो. प्राचीन कालखंडात हिंदू धर्म कुठपर्यंत पसरलेला होता याचे हे आदर्श उदाहरण आहे.बौद्ध धर्मीय कोंबोडिया.

प्रा. डॉ. सतीश कदम 9422650044

 

Leave a Comment