महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,201

पिलाजीराव गायकवाड | बडोदा संस्थानचे पहिले महाराजा

Views: 908
2 Min Read

बडोदा संस्थानचे पहिले महाराजा पिलाजीराव गायकवाड | Pilajirao Gaikwad, the first Maharaja of Baroda State

गुजरात मधील वडोदरा जिल्ह्यातील सावली तहसील मध्ये असलेल्या सावली या नगरीत मराठा साम्राज्याच्या बडोदा संस्थानचे पहिले महाराजा पिलाजीराव गायकवाड चिरविश्रांती घेत आहेत.पहिले दमाजी आणि जनकोजी(झिंगोजीराव) हे दोघे बंधू त्यापैकी दमाजीराव गायकवाड यांना त्यांच्या पराक्रमामुळे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या शिफारशी वरून छत्रपती शाहू महाराजांनी समशेर बहाद्दर हा किताब दिला.पहिले दमाजीराव हे बाळापूर लढाईत आपल्या पराक्रमाने लौकिकास पावले त्यांचे निधन 1721 साली झाल्यानंतर त्यांचे पुतणे पिलाजीराव यांना ते पुत्रवत मानत त्यांना दमाजीराव गायकवाड यांचे पद प्राप्त झाले.महाराजा पिलाजीराव गायकवाड यांना गुजरात मधील गायकवाड घराण्याचे संस्थापक म्हटले तरी वावगे ठरणार नाही गुजरात भागात मराठा सत्तेची पायाभरणी करणाऱ्या पराक्रमी सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचे मुख्य सहाय्यक असलेल्या पिलाजीराव गायकवाडांनी मराठा अंमल गुजरात च्या बहुतांश बसविला.ज्यांची कर्तबगारी पाहून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सेनाखासखेल हा किताब दिला.

मोगल सुभेदार मारवाडचा राजा अभयसिंह यांचा पिलाजीराव गायकवाड यांनी दोन वेळा पराभव केला होता .तरीही त्यानं आपला डभोई आणि बडोदा हि शहरे काबीज करण्याचा प्रयत्न सोडला नव्हता. मग त्याने कपटनितीचा डाव खेळला कारण त्याला आलेल्या अनुभवावरून त्यानं ओळखले होते कि आपण पिलाजीराव गायकवाडांना युद्धात पराभूत करू शकत नाही. म्हणून त्याने समझोता करण्याचा बनाव रचून महाराजा पिलाजीरावांना डाकोर येथे भेटीस येण्याचे निमंत्रण दिले त्यांनी अभयसिंह राजपूत यांच्या शब्दावर विश्वास ठेवून निर्धास्त पणे भेटीस आले आणि भेटीस आलेल्या पिलाजीराव गायकवाड यांची मारेकऱ्यांच्या मार्फत दग्याने डाकोर येथे हत्या करण्यात आली.दिवस होता 14 एप्रिल1732या दिवशी मराठा साम्राज्याच्या श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचचे स्वामीनिष्ठ सेनानी पराक्रमी सरदार दग्याने मारले गेले.त्यांच्या नंतर दुसरे दमाजीराव ,गोंविदराव,सयाजीराव, मानाजीराव,गोंविदराव(पुन्हा)आनंदराव, सयाजीराव, गणपतराव, खंडेराव नंतर मल्हारराव आणि सयाजीराव गायकवाड तिसरे हेच बडोद्याचे लोकराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या कार्य-कर्तुत्ववाने गायकवाड संस्थानची किर्ती चोहोमुलखात केली. आणि त्यांच्या नंतर महाराजा प्रतापसिंह गायकवाड (बडोदा संस्थान स्वतंत्र भारतात विलिन)अशा प्रकारे पिलाजीराव गायकवाड यांच्या नंतर गायकवाड घराण्याचा वारसा पुढे स्वातंत्र्यापर्यंत पुढे चालू राहिला.

शब्दांकन शिवभक्त शुभम गायकवाड पाटील

Leave a Comment