शिवाजी महाराजांचं Planning –
शिवाजी महाराज आणि Planning यांचं एक वेगळंच नातं आहे. शिवरायांनी त्यांच्या आयुष्यात एकही काम नियोजनाशिवाय केलेलं नाही, मग तो अफझलखानाचा वध असो, शास्ताखानाची बोटं छाटण असो किंवा आग्र्याहून सुटका असो. आग्र्याहून सुटका यातला एक अपरिचित प्रसंग आहे ज्यातून शिवाजी महाराजांचं अप्रतिम Planning दिसून येईल.
विडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
तर शिवाजी महाराज १७ ऑगस्ट १६६६ ला आग्र्याहून निसटले. ही बातमी औरंगजेबाला समजायला एक दिवस उजाडला म्हणजे १८ ऑगस्ट ला हे औरंगजेबाला समजलं. समजल्या समजल्या त्याने लगेच आपल्या फौजदार, हवालदारांना हे कळवलं.
आता या प्रसंगातली गंमत तुम्हाला व्हिडिओमधल्या मॅपवर बघता येईल. आग्र्यापासून २०० किमी वर नरवर म्हणून एक ठिकाण आहे. महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर ६ दिवसांनी म्हणजे २३ ऑगस्टला या नरवरच्या फौजदाराने औरंगजेबाला कळवलं की “१८ ऑगस्टच्या संध्याकाळच्या नमाजाच्या वेळेला शिवाजी त्याच्या ५ घोडेस्वारांसोबत इथून गेला. त्याच्याजवळ अधिकृत परवाने असल्यामुळे आणि तो आग्र्याहून पळून गेलाय हे मला माहित नसल्याने मी त्याला जाऊ दिलं”. झालं औरंगजेबाचं रागाने डोकंच फिरलं. ही बातमी कळतेय ना कळतेय तोवर त्याला कळलं की चंबळ च्या नदीवरून एका नावाड्याने शिवाजी महाराजन त्यांचा मुलगा, दोन स्त्रिया आणि काही घोडे आणि उंट यांना नदी पार करून दिली. हा नवाडीही म्हणाला की या माणसाकडे अधिकृत परवाने होते.
खरी गम्मत अजून पुढे आहे. या बातमीनंतर औरंगजेबाला कळलं की फिरोजाबाद वरून येणाऱ्या एका सैनिकाने शिवाजी महाराजांना पाहिलं. त्याने महाराजांना मुजरा करून विचारलं ‘राजाजी इकडे कुठे?’ तर त्याला शिवाजी महाराजांनी सांगितलं की ‘औरंगजेबाने माझी सगळी मालमत्ता जप्त केली आहे त्यामुळे मी आता फकीर होण्यासाठी बनारसला जातो आहे.’
झालं का आता? तीन ठिकाणी तीन तीन शिवाजी महाराज सापडले. (विडिओ मधील मॅप पहा). हे शिवाजी महाराजांचं एक अतिशय उत्तम Planning होतं. ‘गोंधळ’ Chaos निर्माण करणं हा शिवरायांच्या Planning चा एक भाग होता. शाहिस्तेखानाला ज्यावेळी महाराज मारायला गेले होते तेव्हाही त्यांनी हेच केलं होतं. याचा व्हायचा तो परिणाम झालाच. औरंगजेब आणि त्याचे सगळे अधिकारी पूर्णपणे गोंधळले.
बरं मग यापैकी शिवाजी महाराज नक्की कोणत्या ठिकाणी खरंच होते? तर कुठल्याच नाही. (पुन्हा एकदा व्हिडिओमधील मॅप पहा) शिवराय दक्षिणेत राजगडाला जाण्यासाठी याच मार्गाने जातील हे औरंगजेब आणि त्याच्या अधिकाऱ्यांना माहिती असेल हे अधिक शिवरायांना अपेक्षित होतं. त्यामुळे सभासद बखरीनुसार शिवाजी महाराज दक्षिणेत न जाता उत्तरेत मथुरेला गेले. इथे लहानग्या संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी काशीपंत, कृष्णाजीपंत आणि विसाजीपंत या त्रिवर्गाकडे ठेवलं. हे मोरोपंत पिंगळ्यांचे नातेवाईक होते. इथे संभाजी राजांना ठेवण्यामागे तीन कारणं होती
१. शंभूराजे यावेळी लहान होते त्यांना इतका प्रवास झेपला नसता
२. वर सांगितलेलं कारण की औरंगजेबाचे अधिकारी राजांना आणि शंभुराजांना दक्षिणेत शोधात होते त्यांना मथुरेत कोणीच शोधलं नसतं
३. औरंगजेब आणि त्याचे अधिकारी एक पुरुष म्हणजे शिवाजी महाराज आणि एक लहान मुलगा म्हणजे शंभू राजे अश्या जोडगोळीला शोधात होते.
या कारणामुळे शिवरायांनी शंभू राजांना मथुरेत ठेवलं आणि ते स्वतः राजगडाकडे निघाले. राजगडाला जाऊन महाराजांनी संभाजी महाराजांचा मृत्यू झालाय असं सांगून त्यांचं श्राद्ध सुद्धा केलं म्हणजे औरंगजेबाने शंभूराजांचा शोध बंद केला असता.
हे होत महाराजांचं Planning. फक्त आपल्याला काय करायचंय याचाच Planning न करता शिवरायांनी आपल्या शत्रूला काय अपेक्षित असेल याचा विचार करून त्या दृष्टीने Planning केलं. शिवजयंती निमित्त महाराजांच्या स्वभावाचा एक अजून गुणविशेष आम्ही आपल्याला सांगितला. पुन्हा भेटू पुढच्या भागात.
संदर्भ:
१. राजस्थानी रेकॉर्ड्स
२. सभासद बखर
Suyog Shembekar