महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,00,109

पोर्तुगीज मराठा सबंध | पोर्तुगीज स्टँप पेपर

Views: 3246
4 Min Read

पोर्तुगीज मराठा सबंध | पोर्तुगीज स्टँप पेपर –

भारतातील  सोळाव्या शतकात व्यापारासाठी पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज भारतात आले. जवळ जवळ अठरा टोपीकर म्हणता येइल . यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील गोवा, दमण, दीव या प्रदेशांवर  अधिसत्ता गाजवली. दुसऱ्या दों जुआंव राजाचा  प्रतिनिधी पेद्रू द कूव्हील्यांउं हा भारतात येणारा पहिला पोर्तुगीज.  यानंतर दोन वर्षांनी पेद्रो आल्व्हरीश काब्राल भारतात आला . त्याने कालिकत येथे वखार घातली व व्यापार सुरू केला.त्या नंतर अफांसो द अल्बुकर्क व फ्रॅन्सिस्कू द अल्बुकर्क हे भारतात आले.   थोड्याच दिवसांत पोर्तुगीजांनी पश्चिम किनाऱ्यावर आपली सत्ता अशी प्रस्थापित केली की, त्यांनी ठिकठिकाणी बांधलेल्या गडांवरून पोर्तुगीज आरमारी परवाना घेतल्याविना भारतीयांना आपली गलबते बाहेर काढता येत नसत.(पोर्तुगीज मराठा सबंध | पोर्तुगीज स्टँप पेपर)

१५१० मध्ये अदिलशाहने गोवा जिंकून घेतला.पण पोर्तुगेजांनी गोवा परत लगेच जिंकला. येथपासूनच अल्बुकर्कने भारतात पोर्तुगीज सत्ता वाढविण्यास सुरुवात केली.

१५२१ पासून गोवा ही पोर्तुगीजांची पूर्वेकडील प्रमुख वसाहत झाली.  १५८० च्या सुमारास पोर्तुगीजांच्या सत्तेखाली दीव, दमण, मुंबईसह वसई प्रांत, चौल, गोवे बेट, सासष्टी, बारदेश व इतर प्रांत होते.आपली सत्ता प्रस्थापित करीत असताना पोर्तुगीजांचा मोगल, इंग्रज, डच व मराठे यांच्याशी संबंध येऊन त्यांच्याशी संघर्ष झाले.  डच भारतात येताच त्यांचा व पोर्तुगीजांचा संघर्ष होऊन हळूहळू पोर्तुगीजांची सत्ता कमी झाली.शिवाजी महाराजांनी बारदेशवर हल्ला केला.मराठ्यांविरुद्ध पोर्तुगीज व्हाइसरॉयने डचांचे साह्य मागितले असता त्यांनी नकार दिला.इंग्रज भारतात आले तेव्हापासून त्यांचा व पोर्तुगीजांचा संघर्ष चालू होता. पुष्कळदा पोर्तुगीज व इंग्रज एक होऊन मराठ्यांन विरुद्ध लढले.

१६६५ मध्ये पोर्तुगालच्या राजाने मुंबई बेट इंग्लंडच्या राजाला आंदण दिले.पोर्तुगीजांची सत्ता पश्चिम किनाऱ्यावर असल्यामुळे मराठ्यांचा व पोर्तुगीजांचा संबंध शहाजींच्या वेळेपासून आला. सुरुवातीला मराठ्यांची सत्ता मर्यादित असताना शिवाजी व मोगल यांच्या संघर्षात पोर्तुगीज गुप्तपणे शिवाजीला मदत करीत किवा तटस्थ राहात. परंतु १६६६ मध्ये शिवाजीने फोंडे किल्ला घेतल्या नंतर संभाजीच्या काळात मराठ्यांचे व पोर्तुगीजांचे संबंध शत्रुत्वाचे आले. मराठ्यांकडे असलेल्या फोंडे किल्ल्याला मोघलांनी वेढा घातला. मोगलांना मराठ्यांविरुद्ध सर्व तऱ्हेची मदत दिल्यामुळे संभाजीने पोर्तुगीजांविरुद्ध लढाई केली. तीत पोर्तुगीजांची दाणादाण उडाली. या सुमारास कान्होजी आंग्रे यांजकडून पोर्तुगीजांना त्रास होत होता. त्याचा नायनाट करण्यासाठी पोर्तुगीज व इंग्रज एक झाले पण आंग्रे यांच्या समोर ते हतबल झाले. मोहिमेनंतर पोर्तुगीजांकडे दीव-दमण व रेवदंडा हे किल्ले राहिले. त्यात चिमाजी अप्पाने वसई घेतल्याने पोर्तुगीजांचे कंबरडे मोडले.

सिद्दी व शिवाजी महाराजांच्या संर्घषात पोर्तुगेज  सिद्दीस साह्य करत व अदिलशाही मराठे संर्घषात ते अदिलशाहीला मदत करत होते.

पोप तेराव्या ग्रेगरीने धर्म न्यायालयाचा कायदा हिंदूंना लागू केला. धर्म न्यायालयाने दिलेल्या शिक्षा फारच कडक असत. हिंदूंवर धर्म न्यायालयाची सत्ता असू नये म्हणून मराठ्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले होते. वेळ प्रसंगी पाद्रींना कारागृहात टाकले जात. गोव्यातील अनेक देवळे पाडून तेथे चर्चे बांधण्यात आली. गोव्यातून परदेशात जाणा-या‍ मिठावर अधिभार लावून कोकणातील मीठाची जास्त निर्यात केली.

१९५४ मध्ये भारत सरकारने गोव्याच्या मुक्तीबाबत पोर्तुगालकडे खलिता पाठविला.  दि. १५ ऑगस्ट १९५५ रोजी गोवे विमोचन समितीने सामुदायिक सत्याग्रह केला. या निःशस्त्र सत्याग्रह्यांवर पोर्तुगीजांनी गोळीबार केला. याच सुमारास दिल्ली येथे भरलेल्या आफ्रो-आशियाई राष्ट्रांच्या बैठकीत गोव्याच्या मुक्तीसाठी पाठिंबा मिळाला. अखेर पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या धोरणानुसार भारतीय फौजांनी गोवा दि. १८ डिसेंबर १९६१ रोजी  मुक्त केला व  गोवा भारतीय संघराज्यात समाविष्ट झाला.

मे १९८७ रोजी केंद्रशासित राज्य बनले. गोव्यातील पोर्तुगीजांची कोकणात सत्ता असल्याने पोर्तुगीजांची काही मोडितील पत्रे ,स्टँप पेपर पाहायला मिळतात. त्यातील चार संग्रहात  असलेले पोर्तुगीजांचे शिक्का असलेले दुर्मिळ पत्र व स्टँप.

संतोष मु चंदने . चिंचवड ,पुणे

1 Comment