छत्रपती शिवरायांवरील भारतीय टपाल खात्याची तिकिटे –
भारतीय टपाल खात्याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील काही पोस्टची तिकिटे काढली आहेत . शिवरायांवरील हि पोस्टाची तिकिटे म्हणजे आम्हा शिवप्रेमींसाठी एक बहुमूल्य ठेव. शिवाजी महाराजांवरील हि तिकिटे , त्यांचे प्रकाशित वर्ष , त्या तिकिटांचे मूल्य पुढीलप्रमाणे .
१ ) प्रकाशित वर्ष : – १७ एप्रिल १९६१ , तिकिटांचे मूल्य :- १५ न.पै
छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर स्वार
२ ) प्रकाशित वर्ष : – २ जून १९७४ , तिकिटांचे मूल्य :- २५ न.पै
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास ३०० वर्ष पूर्ण
३ ) प्रकाशित वर्ष : – २१ एप्रिल १९८० , तिकिटांचे मूल्य :- ३० न.पै
छत्रपती शिवाजी महाराज गडावरून खाली उतरताना
४ ) प्रकाशित वर्ष : – ०७ जुलै १९९९ , तिकिटांचे मूल्य :- ३ रुपये
राजमाता जीजाबाईनसोबत बालशीवाजीराजे
५ ) प्रकाशित वर्ष : – १ मार्च २०१६ , तिकिटांचे मूल्य :- १० रुपये
भारताचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज
६ ) प्रकाशित वर्ष : – ३ में २०१३ , तिकिटांचे मूल्य :- ३ रुपये
भारतीय सिनेमांची १०० वर्ष भालजी पेंढारकर ( शिवाजी महाराजांचे सिनेमातील दृश्य )
श्री. नागेश सावंत