महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,27,163

प्रगटस्थान, संत श्री गजानन महाराज, शेगाव

By Discover Maharashtra Views: 1274 2 Min Read

प्रगटस्थान, संत श्री गजानन महाराज, शेगाव –

परब्रम्ह प्रगटले निराकार.

माघ वद्य सप्तमी, शके१८०० .दिनांक २३/३/१८७८ शनिवार , शेंगावातील देविदास पातुरकर यांच्या घरी ऋतुशांतीचा कार्यक्रमा निमित्त आनेक धार्मिक विधी चालू होते.त्या निमित्ताने भोजन ही आयोजीत केले होते. जेवणानंतर जेवणावळीतील उष्ट्या पत्रावळी वाड्याबाहेरील जागेतील वडाच्या झाडाखाली टाकल्या जात होत्या.(प्रगटस्थान)

मध्यान्हाच्या वेळी भर उन्हात एक तेजस्वी युवक या टाकलेल्या पत्रावळीतील अन्न वेचून खात होता. त्यावेळी गावातील बंकटलाल व दामोदरपंत कुलकर्णी यांच त्या युवकावर लक्ष पडल. प्रथमदर्शनी त्यांना तो वेडसर अथवा भिकारी वाटला. पण त्याच सर्व व्यवहार बघता ही व्यक्ती सामान्य नसून थोर विभूती आहे याचाी अनुभूती आली. आपले भाग्य थोर म्हणून आपल्याला यांचे दर्शन झाले याची दोघांना खात्री पटली.

धर्म हा अनुभवाचा विषय असून महाराजांनी प्रत्येक कृतीतून हे स्पष्ट केले आहे.

याची अनुभूती ही प्रत्येकाला येत असते. अनुभूती ही व्यक्तीगत असते. महाराजांनी पहिली केलेली कृती म्हणजे ‘अन्न हे पुर्ण ब्रम्ह.’ अशी ही थोर विभूती म्हणजे शेगाव मध्ये वटवृक्षाखाली प्रगटलेले संत गजानन महाराज.

शेगाव मधील एक महत्वाच दर्शनाच ठिकाण म्हणजे संत गजानन महाराज प्रगटस्थान. श्रीगजानन महाराज ज्या वटवृक्षाखाली प्रगट झाले तेथे संस्थानने सुंदर प्रगटस्थान उभारल आहे. वटवृक्षाखाली जवळ सभामंडप व प्रगटस्थानावर मेघडंबरीत महाराजांच्या प्रतिकात्मक पादुका आहेत.श्रीगजानन महाराज ज्या वटवृक्षाखाली प्रगट झाले तेथे संस्थानने सुंदर प्रगटस्थान उभारल आहे. वटवृक्षाखाली जवळ सभामंडप व प्रगटस्थानावर मेघडंबरीत महाराजांच्या प्रतिकात्मक पादुका आहेत.

संतोष मुरलीधर चंदने. चिंचवड ,पुणे.

Leave a Comment