पु. ल. देशपांडे उद्यान (पुणे ओकायामा मैत्री गार्डन)
पुणे ओकायामा मैत्री गार्डन अर्थात पु.ल. देशपांडे उद्यान हे भारत आणि जपान या दोन देशांमधील पुणे आणि ओकायामा या प्रमुख शहरांमधील मैत्रीचे प्रतीक आहे. उद्यान हे पुण्यातील सिंहगड रोड वर आहे.
हे जपानी पद्धतीने तयार केलेले उदयान आहे. जपानमधील प्रसिद्ध ओकायामा कोरोक्वेन उद्यानाच्या धर्तीवर पु. ल. देशपांडे उद्यानाची रचना करण्यात आली आहे.
सुमारे दहा एकरात वसलेल्या उद्यानात जपानी उद्यान संस्कृती आणि विचारधारा दिसून येते. वर्षभरातल्या बदलत्या ऋतूंतील निसर्ग सौंदर्याचे स्वरूप लोकांना पहावयास मिळावे अशी या उद्यानाची रचना करण्यात आली आहे
या उद्यानात फिरताना हिरवळ, तळी, पाण्याचे झरे, टेकड्या या सर्वांचा अनुभव घेता येतो. येथे विविध वैशिट्यपूर्ण वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. या शिवाय अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. गुलाब, तगरी पासून विविध शोभेची फुले या उद्यानाचे सौंदर्य खुलवतात. पाण्याचे झरे आणि विविध फुले यामुळे विविध पक्षी येथे पाणी प्यायला आणि विसाव्याला येतात.
माहिती साभार – माझी भटकंती फेसबुक पेज