महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,11,706

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

By Discover Maharashtra Views: 1696 5 Min Read

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर –

राजे-रजवाड्यांचे इतिहास जगभर घडले आहेत. पुरुष-प्रधान व्यवस्थांत केवळ भारतातच नव्हे तर जगभर स्त्रीयांचे दमनच झाले असल्याचे आपल्याला दिसते. जगात राण्या-महाराण्या झाल्या असल्या तरी त्या शेवटी कर्तुत्वाने म्हणा कि कोणा महाराजांची पत्नी होती म्हणुन म्हणा प्रसिद्ध आहेत पण त्या इतिहासावर स्वत:चा असा स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या अगदी बोटावर मोजण्या इतक्याच स्त्री व्यक्तिमत्व इतिहासात असाव्यात, त्यातील एक आपल्या इतिहासाचे सुवर्ण पान म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर!

कर्तुत्ववान सासऱ्याचा वारसा लाभलेल्या अहिल्यादेवींनी इतिहासाला आपली दखल घेण्यासाठी प्रवृत्त केले एवढे मोठे कार्य त्यांच्या हातून घडले. पानीपतच्या युद्धानंतर महादजी शिंदे यांनी मराठ्यांचा ध्वज आपल्या हाती घेतला खरा पण तरीही पानिपत युद्धानंतर पळापळाने मराठेशाही लयास निघाली असताना. या कालखंडात अहिल्याबाई होळकरांनी १७६६ ते १७९५ तीस वर्षाच्या कालखंडात आजच्या हिंदू धर्माच्या अस्मितेची प्रतीकं, आजच्या स्वातंत्र्य भारताची वारसा स्थळांची निर्मिती किंवा पुनर्बांधणी केली.

या तीस वर्षाच्या काळातील जर निर्माण क्षेत्रात अहिल्यादेवी यांनी केलेल्या कार्याची दखल घ्यायची झाली तर बोटं आपसूक तोंडात जातात., आज स्वतंत्र आणि सार्वभौम देशाचे नागरिक म्हणून या विज्ञान युगात वावरताना ज्या गोष्टी वर्षोनुवर्षे चालू असल्याचे आपण अनुभवतो ते कार्य आपल्या कार्यकाळात त्यांनी पूर्ण केले. त्यांच्या हयातीत पूर्ण झालेले हे कार्य म्हणजे निव्वळ मंदिर आणि घाट यांची उभारणी नसून त्याकाळी मराठ्यांनी मिळवलेल्या राजकीय वर्चस्वाचे ते प्रतिकं आहेत. धर्मवेड्या औरंगजेबानं काढलेल्या मंदिर पाडण्याच्या आदेशा पासून, संपूर्ण भारतभर अहिल्यादेवींनी केलेले मंदिर आणी घाट उभारणीचे कार्य हा काळ हा मराठ्यांच्या चढत जाणाऱ्या पराक्रमाची साक्ष देतो.

आईसाहेब नक्कीच वंदनीय आहेत, आणि हे वास्तव अगदी सूर्याच्या तेजाप्रमाणे प्रखर आहे, परंतु मराठा आणि धनगर अश्या वादात दोन्ही बाजूंनी संकुचित वृत्ती मनी बाळगून ज्यांनी अहिल्यादेवी समजून घेतल्या किंवा समजासमोर मांडल्या त्यामुळेच आमच्या पिढीला स्फूर्तीचा हा जिवंत वारसा समजून घ्यायला काही वेळ जावा लागला असे आम्ही म्हणू. शिवरायांना अभिप्रेत असणाऱ्या पराक्रमासाठी त्यांच्या विचारांच्या या साऱ्याच वंशजांनी आपले तन मन धन अर्पण केले, व कधीच मागे वळून  पाहिले नाही. या साऱ्यावर कोटी म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले हे राष्ट्र उभारणीचे कार्य आहे.

मागे एकदा याबबत अनिश गोखले यांनी पोस्ट प्रकाशित केली होती त्यात अहिल्यादेवींनी उभारणी किंवा पुनर्प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली जी काही क्षेत्र आहे त्यांची यादी व नकाशावरील क्षेत्रं हि पुढील प्रमाणे –

१. देव प्रयाग ( धरमशाला )
२. गंगोत्री ( घाट )
३. केदारनाथ ( कुंद )
४. बद्रीनाथ (कुंड )
५. अयोध्या ( मंदिर , घाट )
६. प्रयाग ( घाट , धरमशाला )
७. वाराणसी ( मंदिर , घाट )
८. गया (मंदिर , घाट )
९. अमरकंटक ( धरमशाला )
१० . फातेह्गड ( घाट )
११. जगन्नाथपुरी ( मंदिर )
१२. ओमकारेश्वर ( मंदिर )
१३. महेश्वर ( मंदिर , घाट )
१४. रामेश्वरम ( धरमशाला )
१५. गोकर्ण ( अन्न क्षेत्र )
१६ . राजापूर ( मंदिर )
१७. पंढरपूर (मंदिर )
१८. जेजुरी ( मंदिर )
१९. पुणे ( धरमशाला )
२० . ब्राह्मणगाव ( मंदिर , घाट )

२१. इंदोर ( मंदिर )
२२. उज्जैन ( मंदिर )
२३. चीकाल्धारा ( मंदिर )
२४. नागेश्वर ( मंदिर )
२५. सोमनाथ ( मंदिर )
२६. द्वारका (धरमशाला )
२७. नाथद्वारा (मंदिर )
२८. पुष्कर (मंदिर , धरमशाला )
२९. धर्माराजेश्वर (घाट )
३० . भांपुरा ( छत्री )
३१ व्रीन्दावन (मंदिर )
३२. हरिद्वार ( घाट )
३३. ह्रीशिकेश (घाट )

यापलीकडेहि अहिल्यादेवींनी केलेल्या कार्य खाली नमूद करतो

वेरूळ – घृष्णेश्वर आणि बारव, कैलास लेणे (जीर्णोद्धार)
पुणे – भुलेश्वर मंदिर (जीर्णोद्धार)
परळी – वैजनाथ मंदिर (जीर्णोद्धार)
भीमाशंकर (जीर्णोद्धार)
भुसावळ – चांगदेव मंदिर (जीर्णोद्धार)
चंदगड – विष्णू व रेणुका मंदिर
चौंडी – चौंडेश्वरी मंदिर
नंदुरबार – बारव
ओझर – 2 विहिरी आणि एक बारव
नाशिक – श्री राम मंदिर, गोरा मंदिर, धर्मशाळा,रामघाट
पुणतांबा – घाट
पुणे – संगमेश्वर घाट
संगमनेर – राम मंदिर
सप्तशृंगी – धर्मशाळा
सिद्धटेक – सिद्धिविनायक मंदिर
शिखर शिंगणापूर – बारव
वाफगाव – वाडा
अंबड – मत्स्योदरी देवी मंदिर आणि बारव/कुंड

यापलीकडे देखील हजारो पुन्हा  नमूद करतो हाजारो छोटी मोठी देवस्थान, किंवा सार्वजनिक, वैयक्तिक मालकी हक्कांच्या स्थळांची निर्मिती अहिल्यादेवी यांनी केली.  एकीकडे त्यांनी या गोष्टी जोरदार प्रमाणात साकारल्या असतानाच दुसरीकडे त्यांनी शत्रू किंवा आप्तस्वकीयांच्या विरोधात शस्त्रं देखील तेवढ्याच ताकदीने पेलली आहेत.

या पश्चातही काही निर्माणकार्य आपणास माहिती असतील तर ती कमेंटमध्ये जरूर मेन्शन करा…!

– अभिषेक कुंभार

Leave a Comment