महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,50,013

पुतळा बारव, सिंदखेडराजा

Views: 1456
2 Min Read

पुतळा बारव, सिंदखेडराजा, बुलढाणा –

सिंदखेडराजा. रास्ट्रमाता जिजाऊसाहेबांच जन्मगाव. या गावात आनेक ऐतिहासिक वास्तू आहेत पण या गावातील पुतळा बारव ही स्थापत्यकलेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बारव आहे.

महाराष्ट्रात आनेकबारव प्रसिध्द आहेत पण पुतळा बारव ही सौंदर्याने नटलेली असून सुध्दा कायम  अपरिचित व दुर्लक्षित राहिली आहे. या दुर्लक्षितपणा मुळे आज हीबारव व त्यावरील शिल्प नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

पुतळाबारव ‍साधारण चौरसाकार असून या मध्ये उतरायला तिन बाजूने पाय-या बांधल्या आहेत.( कदाचीत चारही बाजूने असतील पण चौथी बाजू काळाच्या अोघात जमिनदोस्त झाली असावी. किवा कोणती नोंद सापडतेका ते बघाव लागेल. सध्यातरी तीनच मार्ग  दिसतात. ही जया प्रकारची बारव असून या बारवेच्या चारही वरच्या बाजूने विविध प्रकारचे दगडी शिल्प कोरली आहेत. या बारवेत सर्वत्र साजशृंगार करणा-या यक्षिणीं / सुरसुंदरीचे  पुतळे कोरले आहेत .या पुतळ्यांमूळेच या बारवेला पुतळा बारव म्हंटले जाते.

बारव शिल्पस्थापत्य कलेतील ही बारव पुरातत्व विभागाने संरक्षित बारव म्हणून याची नोंद करावी असे वाटते. आनेक प्रकारच्या यक्षिणी , सुरसुंदरी ,गणपती , किर्तिमूख, कोरीव व घडीव शिल्प अस्ताव्यस्त पडले आहेत. या बारवेच संर्वधन करणे गरजेच आहे.

समुद्रमंथना अवतरली देवांगना l
सुरसुंदरी सज्ज मनोरंजना. ll

कधी काळी या पुतळा (सुरसुंदरी)  शिल्पांवरून अोळखली जाणारी पुतळा बारवेच सौंदर्य आज लयास जात आहे. याच सुरसुंदरींनी साज शृंगार करून आपल्या सौंदर्याने या बारवेच सोंर्दय वाढवल होत. आज त्यांच्या नशीबी रस्त्याच्या बांधावरचे दगड म्हणून वापर केला जातो. अशाच सुरसुंदरी अर्ध्या जमिनीत गाडलेल्या व इतरस्त विखुरलेल्या.

संतोष मुरलीधर चंदने, चिंचवड, पुणे.

Leave a Comment