झाशीची राणी –
१८५७ च्या विद्रोहात झाशीची राणी लक्ष्मीबाई आपल्या जहागिरीसाठी लढता लढता परकिय साम्राज्यशाही विरोधात लढली. पारोळा येथील मोरोपंत तांबेची मुलगी मणिकर्णिका हीचा विवाह झाशीच्या तत्कालीन सरदार गंगाधर नेवाळकर याच्यांशी वयाच्या २२ व्या तर काहींच्या मते ३० वर्षी झाला. पेशवाईच्या अंतानंतर इंग्रज्यांच्या मते झाशी घराणे जहागिरदार म्हणूनच बघत. गंगाधर नेवाळकर निपुत्रिक असल्याने त्यांनी वारसासाठी नेवाळकर कुटुंबातील एक मुलगा दत्तक घेतला.तथापि गव्हर्नर लॉर्ड डलहौसीच्या धोरणानुसार हे दत्तक विधान अमान्य करून ब्रिटीशांनी झाशीची जहागिरी खालसा केली.
दरम्यान विधवा झालेल्या राणी लक्ष्मीबाईने त्यानंतर झाशीचा किल्ला सोडून शहरातील आपल्या वाड्यात काही सैनिक आणि पुत्रासह राहू लागली. १८५७ चा विद्रोह सुरू झाल्यावर लक्ष्मीबाई च्या तैनातीला असलेल्या सैनिकांच्या फलटणीतही प्रादुर्भाव झाला. लक्ष्मीबाईला बंडखोर सैनिकांची मागणी मान्य करणे उचित वाटले. नंतर ती पुत्रासह झाशीच्या किल्ल्यावर गेली. परंतु तिथेही सैनिकांनी बंड पुकारून इंग्रज्यांच्या तोफा, बंदुका आणि शस्रास्रे हस्तगत केली होती. त्याच सुमारास बंदेलखंडातील बंडखोर सरदारांनी झाशीकडे मोर्चा वळवला.
एका बाजूने ब्रिटिशांची फलटण व दुसऱ्या बाजूला गडाच्या पायथ्याशी बुंदेला ठाकुर, नाथेखान इत्यादि बुंदेलखंडी बंडखोर सरदार असा संघर्ष सुरू झाला. त्यावेळी ब्रिटीशांनी जबलपूरहून इंग्रजी सेना येईपर्यंत राणीने किल्ला सांभाळावा असा खलिता पाठविला होता. म्हणून ती किल्यावर राहिली होती. परंतु गडाच्या पायथ्याजवळील लढतीत इंग्रज्यांनी बंडखोरांचा पराभव केला व किल्ल्यातील बंडखोर सैनिकांवर सुड उगवण्यास सुरुवात केली. अशा परिस्थितीत राणी लक्ष्मीबाई स्वातंत्र्य समरात सामिल झाली. आपल्या दत्तक पुत्रास पाठीवर बांधून घोड्यावर स्वार होऊन पेशव्यांच्या मार्गदर्शन घेण्यासाठी ती गडावरून उत्तरेस जाण्यास निघाली तेव्हा गडाची तटबंदी ढासळलेली होती आणि बंडखोर आणि ब्रिटिश सैनिकांच्या मध्ये सापडून तिला गोळी लागली. आणि ती शूर महिला ठार झाली. असामान्य असलेल्या लक्ष्मीबाईची काही गाऱ्हाणी होती. काही अभ्यासकांच्या मते तिने अकरा दिवस किल्ला लढवला. काही या लढ्यास बंडखोरी म्हणतात तर काही स्वातंत्र्ययुध्द काहीच्या मते ती जहागिरी साठी लढत होती, म्हणजे झाशीसाठी तर काही भारतीय स्वातंत्र्य युध्दासाठी.. कितीही मतभेद असले तरी १८५७ या लढ्याची ती चेहरा बनली ही गोष्ट मात्र खरी.
१८५९ मध्ये तिच्या कुटुंबीयांच्या मखलकीचे पारोळा शहर व किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला व पारोळ्याचा भक्कम किल्ला पाडून टाकला.
पुढे २८५९-७९ मध्ये वरणगाव आणि एरंडोल परगण्याचे अधिग्रहण जे १८६१ मध्ये केले जो १८५७ च्या झाशीच्या लढ्याचा परिणाम मानला जातो तर मालेगाव आणि बागलाण यांचे नाशिक जिल्ह्यात हस्तांतरण जे १८६९ मध्ये झाले. तरी देखील तात्या टोपे माळवा आणि उज्जैनकडे अथवा गुजरात मध्ये जाण्याची दाट शक्यता असल्याने सर ह्यू सिंदवा घाटाकडे जायला निघाले. परंतु बंडखोर दल पश्चिमेकडे वळल्यावर व उत्तरेकडून दुसरी इंग्रज सेना टोपेवर चाल करून आल्याचे कळताच सर ह्यू शहाद्याला आला. व धुळ्याच्या सेना दलाच्या मदतीला अहमदनगर येथील सेना दल आणण्यात आले.
त्यानंतर बंडखोरांची सेना छोटा उदेपूर येथे पोहोचली. १८ डिसेंबर रोजी १८५८ रोजी तिच्यावर इंग्रज ब्रिगेडियर पार्कने मात केली. त्यामुळे बंडखोर पुन्हा नर्मदा पार करून अक्राणीमार्गे खानदेशात प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली. म्हणून इंग्रज सेना सुलतानपूर आणि तळोदा येथे आली. तथापि ते नर्मदा पार करतांना बंडखोरांची गफलत झाली आणि ते पुर्वेस खांडव्याकडे चाल करून गेले. अशा प्रकारे या प्रदेशात तात्या टोपे यास अपयश आले.
संदर्भ –
महाराष्ट्र राज्य गॅझेटियर जळगाव जिल्हा १९९४.
कित्ता पृ. २६२-६३, निर्मला सोहोनी, एका समकालीन अनामिक कवीची साक्ष, राणी लक्ष्मीबाई संशोधक आॉक्टोबर डिसेंबर १९९३.
माहिती संकलन –