रास्ते ताई राम मंदिर, पुणे शहर –
कुमठेकर रस्त्यावर सदाशिव पेठ हौदाजवळ ७३४, अयोध्या, सदाशिव पेठ या इमारतीमध्ये एक सुमारे १२५-१५० वर्ष जुने राम मंदिर आहे. रास्ते ताई राम मंदिर या नावाने ते प्रसिद्ध आहे.
हे राम मंदिर सन इ.स. १८६२ मध्ये बांधले गेले. या मंदिराचा गाभारा दगडी असून अंदाजे ८ फूट x ८ फुटचा आहे. उत्तर व दक्षिण या दोन्ही बाजूला खिडक्या आहेत. गाभाऱ्याच्या बाहेर दगडी कमानी असून आत हंड्या टांगलेल्या आहेत. वर धनुर्धारी श्रीरामाचे मुर्तीचित्र आहे. गाभाऱ्यासमोरील सभा मंडप हा अंदाजे २० फूट x ३० फूट असून, अलीकडच्या काळात तो नवीन सिमेंट काँक्रीटचा बांधला आहे. सभामंडपात रामाच्यासमोर मारुतीची व समर्थ रामदासांची मूर्ती आहे. मंदिराला नक्षीदार कळस आहे.
गाभाऱ्यात राम, लक्ष्मण, सीता यांच्या पूर्वाभिमुख मूर्ती असून, त्या दगडी नक्षीदार कमलाकृती चौथऱ्यावर बसवलेल्या आहेत. मूर्ती संगमरवरी असून रामाची मूर्ती अंदाजे दोन फूट व सीता, लक्ष्मणाची मूर्ती दीड फुटांची आहे. चौथऱ्याच्या वर नक्षीदार लाकडी देव्हारा आहे.
संदर्भ:
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन
पत्ता : https://goo.gl/maps/uTTsigv3Fz1w5KhN9?coh=178571&entry=tt
आठवणी इतिहासाच्या