राही रखुमाई मंदिर, संगम माहूली, सातारा –
‘”राही रखुमाबाई राणीया सकळा, अोवाळिती राजा विठोबा सावळा.
जय देव जय पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा जय देव जय देव.”
संत नामदेवांनी रचलेल्या पांडुरंगाच्या आरती मध्ये विठ्ठला सोबत राही चा ही उल्लेख येतो. विठ्ठला सोबत असणारी या राही बद्दल लोककथेत व संत साहित्यात एकमत नसल्याने तसेच ज्या काही कथा सांगीतल्या जातात त्या कथांना पण वारकरी मान्यता देत नाही.(राही रखुमाई मंदिर)
श्री कृष्णाचे रुप म्हणजेच विठ्ठल. राहीचा सबंध हा राधे किवा सत्यभामाशी जोडल्याने ती राही बनून पांडुरंगा सोबत राहीली आसे मानले जाते. पंढरपूरात विठ्ठलाच्या रथ यात्रेत सुध्दा राही व रखुमाई च्या मूर्ती असतात.
विठ्ठल-राही-रखुमाई एकत्र असे मंदिर महाराष्टात दोन तीनच आहेत..त्यातील एक मंदिर म्हणजे सातारा मधील संगम माहूलीतील राहीरखुमाई मंदिर. मंदिराच्या गाभा-यात विठ्ठलाच्या डाव्या बाजूला रखुमाईतर उजव्या बाजुला राही आहे. दगडी बांधकाम असलेल्या मंदिराच्या आंगणात सुंदर वृंदावन आहे. विठ्ठला सोबत राहीवरखुमाई असणारे हे एक दुर्लभ मंदिर.
संतोष मु चंदने. चिंचवड