महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,734

राजे दत्ताजीराव लखुजीराव जाधवराव

Views: 3880
5 Min Read

★राजे दत्ताजीराव लखुजीराव जाधवराव ★

१) परिचय = हे राजे लखुजीराव जाधवराव यांचे थोरले पुत्र होत.
२) है पराक्रमी असुन यांचा उल्लेख शिवभारतात आढळतो. हे नेहमी पिता राजे लखुजीराव यांच्या प्रत्येक लष्करी मोहिमेसोबत असत.याना पतंगराव हा किताब असुन या नावाची इ सन १६०६,१६१५,१६१७ सालची पत्रे देखिल उपलब्ध आहेत.
३) जन्म = यांच्या जन्माची नोंद आढळत नाही.
४) म्रुत्यु = २३ फेब्रुवारी १६२३ साली देवगिरीवर खंडागळे हत्ती प्रकरणात .
खंडागळे हत्तीप्रकरण हे एक आकस्मात घडलेला प्रसंग होता..यात राजे जाधवराव घराण्याने पराक्रमी दत्ताजीराव व राजे भोसले घराण्याने संभाजीराजे (शहाजीराजे यांचे चुलत बंधु) हे दोन पराक्रमी मोहरे गमावले..या दोन घराण्यातील हा प्रसंग हा आकस्मात घडलेला प्रसंग असुन यापुढे या दोन घराण्यानी एकमेकाविरुद्धच्या शाह्यात लढले परंतु एकमेकाचा रक्तपात कधी केला नाही.

४) कुटुंब = याना तीन पुत्र होत. 1.राजे यशवंतराव 2. राजे ठाकुरजी उर्फ पतंगराव 3. राजे लिंबाजी.
याचा उल्लेख खुद्द राजे लखुजीराव यांच्या समाधीवरील एका शिलालेखात आढळतो.
५) राजे यशवंतराव = हे राजे दत्ताजीराव यांचे थोरले पुत्र असुन हे सुरुवातीपासुन आजोबा राजे लखुजीराव यांच्या प्रत्येक लष्करी मोहिमेत असत. प्रसिद्ध भातवडी युदधात देखिल सहभागी असल्याचा उल्लेख शिवभारतात आढळतो. हे पराक्रमी होते.
यांची हत्या देखिल आजोबा व चुलते राजे आचलोजीराव व राजे राघोजीराव यांच्या समवेत देवगिरीवर झाली. यासमयी याना ४००० जात व ३००० स्वार अशी मनसब होती. तसेच यांचा उल्लेख जाधवराव घराण्याचे ” सिपेसालार एवं पराक्रमी कुलवर्धक यौद्धा” असा केलेला आढळतो.
याना दोन पुत्र होत. * ¡◆ राजे रतनोजी उर्फ रुस्तुमराव ◆ राजे लखुजी दुसरे उर्फ लखमोजी.

◆ राजे रतनोजी उर्फ रुस्तुमराव = यांचा उल्लेख इ सन १६३९ च्या एका अस्सल कौलानाम्यात आढळतो. हे सुरुवातीस शिवराय महाराजांसोबत होते,परंतु परत सिंदखेडराजा परिसरात आल्याचा उल्लेख सापडतो.
रतनोजी व यांचे चुलते राजे ठाकुरजी याना इ सन १६३३ च्या जाधवराव घराण्यातील वाटणीपत्रातील एक हिस्सा मिळाल्याचा उललेख असुन राजे लखुजीराव यांच्या म्रुत्युनंतर जाधवराव घराण्याचा “जाधवराव” हा वंशपरंपरागत किताब देखिल याच ठाकुरजीच्या व यशवंतरावांच्या थोरल्या शाखेत दिलेला आहे. यानी व चुलते ठाकुरजी यानी छत्रपती शिवराय महाराजांशी संधान बांधुनच कार्य केले. रतनोजी याना तीन पुत्र व एक कन्या होत.

* राजे रायाजीराव /रायभानजी = याना १५०० जात व ६०० स्वाराची मनसब असल्याची नोंद मिळते. यांच्या वंशजशाखा सिंदखेडराजा परिसरातील जवळखेड व चिखली परिसरातील करवंड येथे आहेत.
* राजेसुभानजी/सुर्यभानराव = याना ७०० जात व ३०० स्वार मनसब होती. यांची वंशजशाखा सिंदखेडराजा परिसरातील उमरद देशमुख (रुसुमचे) या गावी आहे.
* राजे लखुजी तिसरे = यांची वंशजशाखा ही जालना जिल्ह्यातील सारवडी येथे आहे.
* दुर्गाबाईसाहेब = या छत्रपती संभाजी महाराज यांच्या द्वितीय राणीसाहेब होत.

◆ राजे लखुजी दुसरे/लखमोजी =यांची वंशजशाखा भुईंज सातारा येथे असुन ही शाखा शेवटपर्यंत मराठा स्वराज्यात राहिली.छत्रपती शाहु महाराज यांच्या कार्यकाळात या शाखेने उल्लेखीनीय कामगिरी केली. लखमोजी उर्फ लखुजी दुसरे यांचे पुत्र खंडोजी जाधवराव हे छत्रपती शिवाजी तिसरे (छत्रपती राजाराम महाराज व ताराबाई राणीसाहब यांचे पुत्र) यांच्या कार्यकाळात म्हणजे इ सन १७०२-०५ या काळात सिंहगडचे किल्लेदार होते.

५) राजे ठाकुरजी उर्फपतंगराव = हे राजे दत्ताजीराव यांचे द्वितीय पुत्र असुन यशवंतराव यांचे कनिष्ठबंधु असुन यांचा उल्लेख इ सन १६३३ च्या वाटणीपत्रात असुन हा हिस्सा यशवंतराव यांच्या पुत्रासोबत एकत्रीत आहे. हे इ सन १६६० सालच्या अफजल खानाच्या वधासमयी शिवराय महाराजांच्या सैन्यात मराठा सरदार म्हणुन पराक्रम केल्याचा उल्लेख सापडतो. तसेच यानी महाराजांशी संधान बांधुन वेळेनुसार कधी स्वराज्यात तर कधी मोगलांकडे जाऊन स्वराज्याचे कार्य केले याचा उललेख एका इंग्रजांच्या पत्रात, तसेच मोगलसाहित्यात देखिल आढळतो.
याना “दखनी जाधवराव” हा किताब होता. ठाकुरजी हे याच नावाने ओळखले जात. याना ५००० /५००० अशी मनसबदारी होती व हे इ सन १६७२ साली नाशीकचे ठाणेदार होते.यानी महाराजांशी संधान बांधुन साल्हेर मोहिमेत महाराजाना साथ देऊन परत स्वराज्यात आले.परंतु महाराजांच्या सांगण्यावरुन ठाकुरजी व पुतणे रुस्तुमराव /रतनोजी परत मोगलांकडे गेले. तेदेखिल दक्षिण दिग्विजयागोदर आपली खास माणसे महाराजानी मोगलाकडे पेरली होती त्यापैकी हे दोघे होत.

अशाप्रकारे जाधवराव घराण्याची राजे दत्ताजीराव जाधवराव यांची थोरली शाखा देखिल मराठा स्वराज्याच्या कार्यास वाहुन घेतलेली शाखा होय हेच सिद्ध होतै.
सदरील समाधी सिंदखेडराजा येथे आहे.
यांच्या वंशजशाखा = १) जवळखेड,२) उमरद देशमूख (रुसुमचे) ता सिंदखेडराजा, ३) करवंड ता चिखली जी बुलढाणा, ४) करणखेड ता चिखली जि-बुलढाणा, ५) वडाळी ता कन्नड , जि औरंगाबाद, ६) सारवडी जि जालना व ७) भुईंज (सातारा)

माहिती साभार – मराठा रियासत (स्वराज्याचे शिलेदार)

Leave a Comment