महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,914

राजे शिवबा प्रतिष्ठाण संभाजीनगर

Views: 3730
3 Min Read

राजे शिवबा प्रतिष्ठाण संभाजीनगर

संभाजीनगरात 4 वर्षांपूर्वी संस्थापक अध्यक्ष भागिनाथ शिर्के यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या राजे शिवबा प्रतिष्ठाण अंतर्गत विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्य होतात त्यात प्रामुख्याने दुर्गसंवर्धन,शिवकालीन युद्धकला,जन-सुरक्षा बंदोबस्त, सांस्कृतिक कार्यक्रम व शिवपालखी सोहळा हे होतात यांची थोडक्यात माहिती.

पहिले 1 वर्ष राजे शिवबा ग्रुप म्हणून काम चालू केले व कामाचा व्याप पाहून ग्रुप चे प्रतिष्ठाण करण्यात आले.
प्रतिष्ठाण च्या दुर्गसंवर्धनाच्या जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील 17 मोहिमा
प्रतिष्ठाण च्या अनाथ आश्रमना भेट फराळ, आर्थिक मदत करणे.
हॉस्पिटलमध्ये अनाथांना मदत करणे.
प्रथम वर्धापनदिन निमित्ताने स्थानिक पातळीवर कार्यक्रम रक्तदान शिबीर, घेणे व्याख्यान चे आयोजन करणे.
शिवकालीन युध्द कलेचे प्रात्यक्षिक सादर करणे.
ह भ प रवी महाराज यांचे कीर्तनाचे आयोजन साई पालखीचे नियोजन करणे. शिवाजीनगर ते साईटेकडी प्रवास
शहरात चालू असलेल्या विविध अभियानात भाग घेणे
द्वितीय वर्धापनदिन
आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील 26 पोलिसांचा सत्कार समारंभ करणे.
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला वेगवेगळ्या ठिकाणी शाळेला भेट देणे.
आषाढि एकदशी निमीत्त पंढरपूर येथे गर्दीच्या ठिकाणी पोलिसांना मदत करणे. असे विवीध उपक्रम राबविले जात आहे.

प्रतिष्टानाद्वारे दुर्गसंवर्धन करने

महाराष्ट्राची खरी संपत्ती व संस्कृती हे गडकोट. संपुर्ण राज्याचे सार हे गडकोट शिवरायांच्या या दुरदृष्टी विचाराने प्रेरीत होऊन प्रतिष्ठान गेल्या ३ वर्षांपासुन संभाजीनगरातील १० गडकोटांपैकी ४ महत्त्वपूर्ण असे भांगसिगड,खंडोबागड,वेताळवाडी व जंजाळा किल्ल्यावर सातत्याने दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहिमा राबवत आहे. आत्तापर्यंत प्रतिष्ठाणच्या १६ दुर्गसंवर्धन मोहिमा झाल्या असुन त्या जिल्ह्यात व जिल्याच्या बाहेरील गडचिरोली जिल्ह्यापर्यंत प्रतिष्ठाण पोहचले आहे. तसेच स्थानिक लोकांमध्ये दुर्ग जनजागृतीसाठी गावात संदेश देणारी फेरी काढली जाते संभाजीनगरातील गडकोटांचे संवर्धन व विकास व्हावा व त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा व आपली संस्कृती जपावी हा उददेश आहे.

प्रतिष्टानाद्वारे शिवकालीन युद्धकला

प्रशिक्षण: प्रक्षिशक:गोरक्षनाथ कुंडलवाल शिवकाळातील दुर्मीळ अश्या युद्धकलाचे प्रात्यक्षीक दाखवने तसेच प्रतिष्ठाणचे मावळे व खास करुन रणरागिणींना याचे प्रशिक्षण देण्याचे कार्य प्रतिष्ठाण व शिवकालीन युद्धकला प्रसारक मंडळ व प्रतिष्ठाण 10 दिवस नवरात्रित करत आहे. यात लाठि-काठी,तलवार,दांडपट्टा,अग्निचक्र प्रकारातले साहसी खेळ शिकवले जात. आजच्या महिला व मुलींना यातुन स्वसंरक्षणाचे धडे देऊन त्यांना सशक्त बनवण्याचे कार्य केले जाते.

प्रतिष्टानाद्वारे जनसुरक्षा बंदोबस्त

आज आपण बघतो पोलिस बांधव रात्रं-दिवस कष्ट करुन ड्युटी करत जनतेची सेवा करतो कुठल्याही सणाला गरदीला नियंत्रीत करण्यासाठी त्यांची ड्युटी असते. त्यांचे कष्ट व ताण कमी करण्यासाठी प्रतिष्ठाणच्या मावळ्यांचे दल गरदीच्या ठिकाणी जाऊन त्यांना साह्य करते उदा. इथे होणारी पंढरपुरची यात्रा,खुलताबाद उरुस,माॅरेथाॅन स्पर्धा ची व्यवस्था, अपघात समई मदत करणे इत्यादी.

प्रतिष्टानाद्वारे सांस्कृतीक विभाग

विविध समाजातील संत व थोर स्त्री- पुरुषांची जयंती साजरी करणे तसेच शिवरायांची किर्ती व ख्याती जनमाणसापर्यंत पोवाड्यां द्वारे पोहोचवणारे प्रतिष्ठाणचे कोशाध्यक्ष तथा शिवशाहिर यशवंत जाधव हे काम करतात. अंगावर शहारे आणनारे शिवकाळातील पोवाड्यांचे सादरिकरण करतात.

शिवपालखी सोहळा

शिवजयंतीला संभाजीनगरात शिवरायांच्या प्रतिमेची पालखीतुन शोभायात्रा काढण्याची संकल्पना प्रतिष्ठाणने राबवली असता यात सर्व मित्र परिवार सामील होऊन अश्या शिस्तबद्ध यात्रेत रणरागिनी व मावळ्यांच्या दलामध्ये पालखीतुन शिवरायांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढली जाते व संदेश फलकाने महत्त्वपूर्ण संदेश दिला जातो.

Leave a Comment