महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,577

राजकुमार शाहू उर्फ चिमासाहेब

Views: 1343
2 Min Read

राजकुमार शाहू उर्फ चिमासाहेब –

राजकुमार शाहू उर्फ चिमासाहेब यांनी कोल्हापुरात १८५७ रोजी उठाव करायचा प्रयत्न केला, म्हणून इंग्रजांनी त्यांना कराची येथे स्थानबद्ध केले व १५ मे १८६९ ला त्यांच कराचीत निधन झाल.

१८५७ च्या उठावानंतर चिमासाहेब बंडात सामील असल्याने त्यांना कराची येथे पॉईंट मनोरा येथे नजरकैदेत ठेवले होते. पुढे दोन वर्षानंतर एका स्वतंत्र निवासस्थानी ठेवण्यात आले व उपजीविकेसाठी ५०० रुपये देण्यात येऊ लागले. चिमासाहेब कराचीला ११ वर्षे इंग्रजांच्या बंदिवासात होते. इ.स.१८६९ मध्ये ते निधन पावले. त्यांचे दहन लियारी कोर्ट मध्ये झाले. तेथे लियारी नावाचा एक ओढा असून, त्यापलिकडे हिंदूंची स्मशानभूमी आहे. त्यांच्या दहनभूमीवर नंतर समाधी बांधण्यात आली. पाकिस्तानची निर्मिती होईपर्यंत चिमासाहेबांच्या समाधीजवळ कराचीतील महाराष्ट्रीय समाज मोठा उत्सव करीत असे. नंतर मात्र हा उत्सव बंद पडला.

बंडाच्या समयी करवीर गादीवर चिमासाहेबांचे थोरले बंधू बाबासाहेब होते. परंतु बंडात मात्र चिमासाहेबांचा सहभाग होता. त्यांना कैद करण्याच्या अगोदरच्या काळात संशयावरून इंग्रज अधिकारी जेकब याने चिमासाहेबांची चौकशी केली‌. त्याला उठावाच्या मागे चिमासाहेबांचा हात असला पाहिजे, याविषयी संशय आला होता असे स्पष्ट दिसते. तरी पण त्याला पुरेसा पुरावा मिळाला नाही. म्हणून त्याला त्यावेळी काही करता आले नाही. यासंबंधीचे जेकबने म्हटले आहे की,

“एवढीच माहिती बाबासाहेब महाराजांच्या भावांनी (चिमासाहेब) पुरविली असती तर मी तिच्याकडे साशंकतेने पाहिले असते; पण थोरला भाऊ (बाबासाहेब) नरम वृत्तीचा आणि शांत स्वभावाचा आहे. तो विश्वासही ठेवणार नाही. याच्या उलट, धाकटा भाऊ चिमासाहेब मात्र मोठा तडफदार आहे, “शिवाजी चा खरा वंशज शोभतो” तो आपल्या राज्यात अतिशय लोकप्रिय आहे.”

(संदर्भ : Western India Before and During the Mutiny : by Major General Jacob)

संदर्भ : स.मा.गर्गे, करवीर रियासत.

Sanket Pagar

Leave a Comment