महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,97,421

पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण राम-सीता !

Views: 2490
1 Min Read

पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण राम-सीता !

अयोध्येत श्रीरामांची लवकर प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. देशभरात चैतन्याचे वारे वाहत आहेत. पुणे हे “मंदिरांचे शहर” असल्याने, इथल्या प्रसिद्ध राम मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. शहरात राम मंदिरांची कमतरता नाही. फक्त पेठ भागात मी सुमारे ४० राम मंदिरे बघितलेली आहेत. प्रत्येक मंदिराचे, तिथल्या मूर्तींचे अणि त्याभोवती असलेल्या इतिहासाचे वेगळेपण जाणवतं. अशीच एक अनोखी, काळ्या पाषाणात घडवलेली राम-सीतेची मूर्ती आहे.
रामरक्षा स्तोत्रात या मूर्तीचे वर्णन आलेले आहे :

अथ ध्यानम् ।
ध्यायेदाजानुबाहुम् धृतशरधनुषम् ।बद्धपद्मासनस्थम् ।
“मूर्तीचे हात गुडघ्यापर्यंत गेल्यामुळे – आजानुबाहू असलेला, धनुष्य धरलेला, पद्मासनात बसलेला.”
पीतं वासो वसानम् नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ।
वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभम् ।
“पितांबर परिधान केलेल्या, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळी सारखे डोळे असलेली श्रीरामांची मूर्ती. त्याच्या डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे, श्रीरामाची नजर तिच्या मुखकमलाकडे लागलेली आहे. “

या सार्‍या शिल्पाला रेखीव प्रभावळ लाभलेली आहे. त्यामुळे ते अधिकच उठून दिसतं. अज्ञान आणि दुर्लक्ष यामुळे मूर्तीवर ऑइलपेन्ट चा लेप दिलाय. मूर्तीवरचे बारकावे त्यात गडप झालेत. शेजारी असणाऱ्या मारुतीला तेल वाहतात तसे, याही मूर्तीवर तेल वाहिले जाते. त्यामुळे मूर्तीचा रेखीवपणा नाहीसा झाला आहे. पुणे शहरात अशा प्रकारची मूर्ती मी तरी बघितलेली नाही.रामरक्षेतील श्लोकांचा अर्थ लावण्यात Anagha Pendharkar ची खूप मदत झाली !

पत्ता : पुण्यातील एका पेठेत.
© साकेत नितीन देव.

Leave a Comment