रामायण शिल्पपट –
कैलास मंदिराच्या डाव्या अंगाला महाभारतपट तर उजव्या अंगाला रामायणपट आहे. या शिल्पपटात एकूण आठ थरांत संक्षिप्त रामायण शिल्पांकित केलेले आहे. शिल्पपट उजवीकडून डावीकडे असा सुरु होतो व पुढील थरात तो उजवीकडून डावीकडे विस्तार पावतो व परत तसेच क्रम आहे. त्यामुळे ह्या शिल्पपटाला एकप्रकारे सलगता आलेली आहे. प्रत्येकाने एकदा आवर्जून पहावा असा हा शिल्पपट आहे.
संक्षिप्त रामायण असे आहे:
आदौ राम तपोवानादि गमनं, हत्वा मृगं कांचनम।
वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणंम ।।
वालीनिर्दनलं समुद्रतरणं लंकापुरिदाहनंम ।
पच्छात रावणकुंभकर्ण हननं एतद्धि रामायणंम।।
Rohan Gadekar
तुम्हाला हे ही वाचायला आवडेल