महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,38,699

रामेश्वर मंदिर, जुने कायगाव, औरंगाबाद

By Discover Maharashtra Views: 1855 1 Min Read

रामेश्वर मंदिर, जुने कायगाव, औरंगाबाद –

नगर – औरंगाबाद महामार्गावर दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर, गोदावरी-प्रवरा संगम तीरावर प्राचीन रामेश्वर मंदिर आहे. या मंदीराची कथा थोडक्यात अशी की, कांचन मृगाचा पाठलाग करत असताना प्रभू रामचंद्र सध्याच्या अहमदनगर – औरंगाबाद जिल्ह्यांच्या वेशीजवळील गोदावरी – प्रवरा संगमावर येतात इथे प्रभू रामचंद्र कांचन मृगाचे शीर धडा वेगळे करतात. मृगाचे शीर जेथे पडले ते स्थान सध्या टोका म्हणवले जाते, तर धड जेथे पडले ते स्थान कायगाव असे मानतात. या दोन्ही गावात महादेवाची अनेक सुंदर मंदीरे आहेत. त्यातीलच हे कायगावातील एक रामेश्वर मंदिर होय.

प्रभू रामचंद्रांनी या मंदिरातील शिवलिंगाची स्वहस्ते स्थापना केली असल्याचे मानले जाते. मंदिराची रचना अर्ध मंडप, सभामंडप व गर्भगृह अशी साधारण असली तरी डोळ्यात भरणारी आहे. मंदिर लहान असले तरी त्याची शिल्पकला पाहणाऱ्याला नक्कीच आकर्षित करते. दशक्रिया विधीसाठी हे स्थान खूप पवित्र मानले जाते. औरंगाबाद, अहमदनगर, पुणे आदी जिल्ह्यातून लोक दशक्रिया विधीसाठी येथे येतात.

Rohan Gadekar

Leave a Comment