महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,997

रामलिंग, हातकणंगले, कोल्हापूर

Views: 5490
2 Min Read

रामलिंग, हातकणंगले, कोल्हापूर | Ramling –

आपल्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी, आडबाजूला पुरातन काळापासून वसलेली नितांत रमणीय देवस्थानं आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात आळते गावाजवळ रामलिंग (Ramling) म्हणून असेच एक स्थान आहे. रामलिंग नावाची अनेक ठिकाणे आहेत. अगदी कोल्हापूरजवळच तीन आहेत. त्यातलं हे एक. आळते गावच्या मागे छोट्याशा डोंगराच्या कुशीत, गर्द वनराईत वसलेले. वनवासात असताना रामचंद्र इथे आले, त्यांनी इथे शंकराची आराधना केली आणि अभिषेकासाठी बाण मारून झरे काढले अशी आख्यायिका. मंदिराच्या बाहेर गोमुखातून सतत पाण्याची धार पडत असते. इथे आल्यावर सातारा जिल्ह्यातल्या देवस्थानांची अनुभूती आली.

सातारा जिल्ह्यातल्या आमच्या कुलदेवतांची मंदिरे काहीशी अशीच आहे. इथल्या मंदिराबाहेरचा सभामंडप पुणे जिल्ह्यातल्या मावळ भागातल्या मंदिरांची अनुभूती देतो. सभामंडपात विठोबा रखुमाईची मूर्ती आहे. येथे गेली शंभरहून अधिक वर्षे अखंडपणे सुरू असलेले धुनी अग्निकुंड आहे. मुख्य स्थान गुहेत आहे. गुहेत शिवलिंग आणि गणपती, पार्वती, वीरभद्र, कालभैरव यांच्या मूर्ती आहेत. गुहेत सर्वत्र पाणी झिरपते, त्यामुळे ओल असते.

गुहेच्या छताला मस्त लवणस्तंभ झालेले आहेत. बाहेर कुंड, त्यात अनेक मासे आणि कासवं. आजूबाजूला सप्तर्षीच्या नावाची मंदिरं आणि जुन्या दगडी धर्मशाळा आहे. फार छान परिसर. मंदिरातली लोकंही चांगली वाटलीत. वनराईत मोर, काळ्या तोंडाची वानरं खूप आहेत. रामलिंगपासून(Ramling) पुढे त्याच डोंगरात असलेल्या धुळोबा – धुळेश्वरलाही जाऊन आलो. तिथला परिसरही रमणीय आहे.रामलिंगपासून पुढे त्याच डोंगरात असलेल्या धुळोबा – धुळेश्वरलाही जाऊन आलो. तिथला परिसरही रमणीय आहे.

माहिती साभार – Pranav Kulkarni

Leave a Comment