महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,24,032

रणमस्तखान

By Discover Maharashtra Views: 4490 17 Min Read

रणमस्तखान…

खिजरखानपन्नी हा विजापूरच्या बहलोलखानचा खास साहाय्यक होता रणमस्तखान. बहलोलखाना बरोबर शिवाजी महाराजांच्या बरोबर झालेल्या लढाईत होता विजापूर दरबारात अफगाण मुसलमान व दख्खनी मुसलमान असा वाद होता….

खिरजखानपन्नी अफगाण मुसलमान होता विजापुरचे दख्खनी मुसलमानांना त्यांचे वर्चस्व सहन होत नसे शेख मिनहाज या दख्खनी मुसलमानाने त्याचा खून केला खिरजखानाचे भाऊ रणमस्तखान आणि दाऊदखान यांस खानजहाॅन बहादुरखान याने विजापूरकरांच्या चाकरीतन फोडून मोघली चाकरीत आणले.”

शिवाजी महाराजांना सुद्धा या रणमस्त खानने अडविले होते इ.स. १६७९ मध्ये दिलेरखान हा
विजापूर जिंकण्याच्या ईर्षेने लढत होता महाराजांनी दिलेरखानाचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी मोरोपंतासह जालन्याचा प्रदेश लुटावयाचे ठरविले शहजादा मुअज्जम हा औरंगाबादचा सुभेदार होता…..

१५ नोव्हेंबर,१६७९ च्या सुमारास शिवाजी महाराजांनी सतत चार दिवस जालना पेठ लुटली ही लूट घेऊन जातांना औरंगाबादहून रणमस्तखान ८-१० हजार स्वारांसह चालून आला एक पंचहजारी सिदोजी निंबाळकर ठार झाला….

बर्हिजी नाईकाने महाराजांना आडवाटेने पट्टा गडावर आणले (तेथेच त्यांना संभाजीराजे दिलेर कडून सुटून पन्हाळ गडावर सुखरूप पोहचल्याची बातमी समजली.)

या रणमस्तखानास कल्याण-भिवंडीच्या दुसऱ्या मोहिमेसाठी बादशहाने पेडगावहून बोलावून घेतले तो १२ सप्टेंबर, १६८२ रोजी पेडगांवहून निघाला आणि बादशाही लष्करापाशी पोहचला त्याने बादशहाची भेट घेतली त्यावेळी बादशहाने काही विचित्र प्रश्न विचारले “तु काही वाचलेस का?

तुला कुराण पाठ येते का? तुला मुले किती आहेत? वगैरे त्यास खिल्लत देऊन बहादुरखान हा किताब दिला तसेच त्यास सोन्याच्या साजाचा घोडा, हत्ती, पंचहजारी मन्सब दिली त्याच वेळी दाऊदखानास खिल्लत सोन्याच्या साजाचा घोडा व मूळ चार हजारी, तीन हजार स्वार, वाढ ५०० स्वार, असे दिले….

रणमस्तखान ४ नोव्हेबर १६८२ च्या सुमारास तळकोकणात पोहचला त्याच्या बरोबर कान्हाजी नावाचा अधिकारी व नऊ हजार मोघल सैनिक होते रणमस्तखान (बहादुरखान) याने आपली कामगिरी चालू गेली…..

मराठ्यांचे आठशे स्वार आणि आठ हजार पायदळ डिसेंबरचे १५-१६ चे दम्यान कल्याण-
भिवंडीचे भागात फिरत होते त्यांचे नेतृत्व रूपाजी भोसले, केशवपंत, निळोपंत पेशवे करीत होते….

रुहुल्लाखानाने कल्याण-भिवंडीच्या कोटाची दुरुस्ती करून तेथे पक्के ठाणे उभारले होते पुढे २८ नोव्हेंबर, १६८२ रोजी मराठ्यां बरोबर त्याचा सामना झाला अनेक लोक मेले छोट्या, छत्री, धूप वगैरे। सामान मोघली सैनिकांनी पळविले….

मराठ्यां जवळ १०,००० घोडेस्वार आणि १२,००० पायदळ असल्याची बातमी त्याला समजली पुन्हा ४ डिसेंबर, १६८२ रोजी मराठयांशी सामना झाला मोघलास विजय मिळाला असे ते आपल्या बातमी पत्रातून कळवितात मराठ्यांचा वितंगा या गडाच्या
वाडीला खानाच्या सैनिकांनी आग लावली….

कल्याणच्या तटाची भिंत पडली होती ते काम करणे शक्य झाले नाही मराठ्यांनी निकराने हल्ला चढविला संभाजी महाराजांनी तुकोजी नावाच्या सरदारास भरपूर सैन्य देऊन पाठविले कल्याण जवळील ८ मैलांचे अंतरावरील एका गावा जवळ सैन्य थांबले…..

मराठा सरदार तुकोजीने मोठ्या सैन्यासह कल्याण भिवंडीच्या गढीच्या अलीकडे आठ मैलांवर मोर्चेबंदी केली रणमस्त खानाने सिद्दी याकूबखान व धान्य घेऊन आलेल्या जहाजांचा सरदार रूमीखान यांना कल्याण भिवंडी येथे पाठविले…..

आणि दाऊदखान, अब्दुल फय्याजखान, शुजावल वगैरेंना मराठ्यांवर चाल करण्यास पाठविले मराठ्यांच्या बरोबर प्रथम बाणांची व बंदुकीची लढाई झाली नंतर हातघाईचा सामना झाला अनेक लोकांसह तुकोजी मारला गेला मराठे डोंगरात लपून बसले…..

बादशाही लोकांनी त्यांचा दहा मैलांपर्यंत पाठलाग केला नंतर ते कल्याण-भिवंडीच्या कोटात परत आले…..

“जेधे शकावलीतील नोंद : शके १६०४ मार्गशीर्ष मासी रणमस्तखान येऊन कल्याणी बसले त्यावर रूपाजी भोसले व केसोपंत व निळोपंत पेशवे रवाना केले….

यापुढे १६८३ मध्ये हा संघर्ष चालूच राहिला कल्याण-भिवंडी-तळकोकणात अशांतताच होती मराठा सैन्य मोघलांशी शर्थीने लढत होते कधी यश कधी अपयश मिळत होते

चौफेर #हल्ले :- रामसेजचा वेढा चालच होता.

सिद्दी, इंग्रज जरी शांत होते तरी ते मोठ्या शत्रूपक्षाकडेच होते पोर्तुगीज औरंगजेबाला भिऊन होते फक्त औरंगजेबाशी निकराचा सामना दक्षिणेत एकाकीपणे मराठावीरच देत होता औरंगजेबाच्या खंद्या सेनानींची दमछाक झाली होती…

हसनअलीखान, खानजहाॅन बहाद्दूर,इब्राहीमखान, कासीमखान आणि त्यांच्या बरोबर आलेले राजपूत सरदार मराठी सैन्यापुढे हतबल झाले होते मोघल सैनिक मराठी मुलखात जिथे किल्ला असेल, जेथे ठाणे असेल तेथे धुमाकूळ घालत होते…..

तर मराठेपण मोघलांच्या ठाण्यावर गनिमी काव्याचे हत्यार चालवीत होते खानजहाॅन बहाद्दूरची रामसेजच्या कामगिरीवर नेमणूक होण्यापूर्वी त्याने जानेवारी, १६८२ च्या सुरुवातीस सातारा भागात लुटालूट केली रहिमतपूर लुटले, त्याच्या जवळची काही गावे पण लुटून सातारगड, रहिमतपूर भागातही जंगले ताब्यात घेतली…..

आगी लावल्या मराठ्यांचा सरदार भीमराव
आणि त्याचा मुलगा यांना पकडले पंचवीस हजार कैदी सापडले, त्यात दहा हजार मुसलमान होते ही सर्व लूट पेडगावला पाठविली अखबारातील आकडेवारी ही अतिशयोक्तीची वाटते माण तालुक्यात
सेखापूर कर्यात नाझरे येथे चकमकी उडाल्या.

नाझरे येथे मराठे व मोघल यांच्यातील चकमकीमुळे तेथील प्रजा परमुलखात गेली शेताची नासाडी झाली नाझरे गाव हे हल्ली सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात आहे श्रीधर कवीचे हे गांव साताऱ्या कडील लुटीचे वेळी मोघल सैन्याने शिवापूर, शिरवळ येथे लूटमार केली….

नाशिक, #बागलाणात #मराठे #मोघल #चकमकी -:

साल्हेरचा किल्ला घेण्यासाठी मोघल सैन्याचे ह्याच वेळेस प्रयत्न चालू होते ६ डिसेंबर,१६८२ च्या सुमारास त्र्यंबक गडावर मराठ्यांचे सैन्य आले होते खानजहाॅन बहाद्दुरचा मुलगा मुजफ्फरखान। त्यावर चालून गेला….

लढाई झाली त्याने अनेकांना मारले वाडी जाळली व तो परत आला त्याला हजार रुपयांचा हत्ती त्याचे वकिला मार्फत देण्यात आला पुढे हा किल्ला मराठे १६८३ पर्यंत लढवीत होते…..

नाशिक, औंढा पट्टा, सोनगड, येथे मोघल मराठ्यांची चकमक झाली मोघलांनी निकराचे प्रयत्न केले काही गावांना आगी लावल्या व लुटली मोघलांनाही किल्ले मिळाले नाहीत….

सिन्नर तालुक्यातील सोनगड किल्ल्याच्या नजीकचा परताबगड (प्रतापगड) हा मोघलांच्या ताब्यात होता मराठ्यांनी त्यावर लढाई केली जुलै, १६८२ मध्ये दोरीच्या जिन्यावरून किल्ल्यावर शिरण्याचा प्रयत्न केला अब्दुल्लाखान या किल्लेदाराने तीव्र प्रतिकार केला….

ऑक्टोबर, १६८२ मध्ये मराठे बागलाणात घुसले त्यांना अडविण्यासाठी मामूरखान यास
बंदोबस्तासाठी बादशहाने पाठविले….

कांचन गडावरून कळवण तालुक्यातील हनुमंतगड येथे मराठयांची मोघली सैन्याशी टक्कर झाली मराठे हनुमंतगड रवळा, जवळा वगैरे चार किल्ल्यांतून चौथ – वसुलीसाठी गेले होते त्यांच्या बरोबर मोघली सैन्याने सामना दिला…..

दहा-पंधरा मराठे मेले व अनेक लोक कैद झाले धोडपगडचा किल्लेदार (नेकनामखान) याने ही लढाई केली पुढे या चकमकी चालूच राहिल्या.

२४ नोव्हेंबर, १६८२ बागलाणात मराठी सैन्य धुमाकूळ घालीत होते त्याकरिता त्या भागातला
फौजदार महादजी खबरदार होता पण त्या भागातील ठाणेदारांनी जागृत असावे, आणखी लोक नेमून घ्यावेत

नानज घाटातून कोकणात सैन्य कसे जाऊ शकेल याची माहिती कसून घेण्या बद्दल बहाद्ददूर खानास विचारण्या बाबत रुहुल्ला खानास हुकूम झाला रामनगर जवळच्या कण्हेरगडाला सय्यद इझनखानाने वेढा दिला सामना झाला किल्ला त्याला मिळाला नाही.

नाशिक-बागलाणा कडील हनुमंतगड, रवळा, जवळा या किल्ल्यांतून मराठी सैन्य धोडपगडाचे बाजूला चौथ-वसुलीसाठी गेले असता, धोडपगडच्या किल्लेदार नेकनाम खानाने आपले सैन्य पाठविले त्याचे बहुतेक लोक कामास आले पंधरा मराठे कैद झाले.

रामसेजच्या वेढयाचे काम चालूच होते खानजहाॅन बहाद्दूर खानाने रामसेजच्या किल्ल्याला वेढा देऊन मोर्चे कायम केले होते पण त्याला बादशहाने हुकूम दिला की,”तू स्वतः तेथील सैन्य घेऊन तळकोकणच्या खोऱ्यात जावे”

अहमदनगरचा #बंदोबस्त :- सन १६८१ मध्ये अहमद नगरवर वरचेवर हल्ले होत असल्याचे आपण पाहिले या वर्षी (१६८२) मध्ये सुद्धा अहमद नगरवर मराठे हल्ले करीतच होते २३ मे,१६८२ या दिवशी रूहुल्ला खानची नेमणक तेथे मराठयांच्या बंदोबस्तासाठी झाली…..

मराठ्यांनी अगदी त्या सुमारासच अहमद नगरवर हल्ला चढविला हसनअली खानाने दिलावरखान आणि शेखजी या दोघांना पाठविले कालव्या जवळ लढाई झाली मराठ्यांना यश आले नाही मराठ्यांनी पळविलेली जनावरे व सामान परत मिळविले अहमद नगरसाठी औरंगजेबाने अधिक चांगली उपाययोजना करावयाचे ठरविले….

२८ सप्टेंबर, १६८२ रोजी मराठ्यांचे हल्ले परतवून लावण्याचे कामासाठी शहजादा महंमद मुईजुद्दीन याला बादशहाने आठ हजार आणि दहा हजार स्वारांचा मन्सबदार बनविले…..

त्याला रत्नजडीत कंठा, एक घोडा आणि खिल्लतीची वस्त्रे देऊन, मराठ्यांचा मोड करण्यासाठी त्याला अहमद नगरच्या दिशेने रवाना केले रणमस्तखान, गजत्फरखान आणि शहजादा मुईजुद्दीन यांना निरोप देण्यात आला.

बादशहाने सरदार तरीन याला शेवगावचा फौजदार म्हणून ठेवले सिन्नरचा ठाणेदार हिंदुराव, मुईजुद्दीनच्या चाकरीत दाखल झाला शियाबुद्दीन खानाला तातडीचा हुकूम देण्यात आला की, ताबडतोब अहमदनगरला जा..

अहमदनगरचा किल्लेदार सय्यद ख्वाॅजा अहमद हा होता त्यामुळे मुईजुद्दीन हा पेडगावला न जाता अहमद नगरला थांबला त्यावेळी त्यांना समजले की,मराठ्यांचे सैन्य ५ हजार असून ते अहमदनगरच्या दिशेने येत आहे…

त्याचवेळी इखलासखान याने अहमदनगर पेडगांव-संगमनेर-नेवासा-औरंगबाद या मार्गावरील ठाणेदारांची तपासणी करून छोट्या मोठ्या किल्ल्यांची तजवीज करून मराठ्यांच्या चौथ-वसुलीस प्रतिकार करण्याची तयारी ठेवली….

५ नोव्हेंबर, १६८२ ला पेडगांवच्या बंदोबस्तासाठी मुईजुद्दीन अहमद नगरहून पेडगावला गेला कवठेपिरान येथे मराठ्यांचे माणको बल्लाळ पंडित लखमाजी हे चौथ वसुलीसाठी आले होते….

त्यांच्या बरोबर मोघली सैन्याची हत्यारांची लढाई झाली नंतर आखूड हत्यारांची लढाई झाली त्यात माणको बल्लाळ व तीन लोक ठार झाले लखमाजी वगैरे पळून गेले तुरा, छत्री, सरदाराचा घोडा, ९८ घोड्या हाती लागल्या….

मोघलांचा राजपूत सरदार राजा दुर्गासिंह बुंदेला याचा भाचा दानसिंह ठाकूर पाच लोकांसह मेला १५० लोक (मोघलांचे) जखमी झाले खुद्द दुर्गासिंहाला धूप लागून जखम झाली….

औरंगजेबाचे सैन्य चौफेर मराठ्यांचा बंदोबस्त करीत होते मराठे औरंगजेबाच्या ठाण्यावर आणि त्याच्या आसपासच्या भागातून चौथ वसूल करीत होते विशेषत: ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, १६८२ मध्ये हे हल्ले होत होते असे दिसते….

नाशिक, बागलाण, अहमदनगर, पेडगाव, सोलापूर, सातारा, पुरंदर (पुणे-चाकण), शिरवळ या भागांत चकमकी चालू होत्या परकीय प्रदेशात लढाई करणे म्हणजे त्यास भूगोलाचे ज्ञान असणे जरूर असते…

बादशाही सैन्यात दक्षिणेचा भूगोल (नद्या, डोंगर, दऱ्या, रस्ते, घाट इत्यादी) माहित असणारा अबु मुहम्मद या अधिकाऱ्यास मराठ्यांच्या मुलखातील घाट खिंडीची माहिती करून घेण्या बद्दल सांगण्यात आल्यावर

त्याने मराठ्यांचे प्रदेशात जाण्यास ३६० घाट व खिंडी आहेत व ६५ घाट असे आहेत की जेथून हत्ती, उंट वगैरे जाऊ शकतात व बाकी खिंडी मधील वाटा अरुंद असल्याची माहिती ९ नोव्हेंबर १६८२ मध्ये बादशहाकडे माहिती दिली…

१० नोव्हेंबर, १६८२ चे सुमारास खानजहाॅन बहाद्दूर रामसेजचा वेढा सोडून तळकोकणात घाटाकडे रवाना झाला पुढे तो चांदवड जवळ पोहचला हसन अलीखान कल्याण-भिवंडी (तळकोकण) मोहिमेत जखमी झाला होता….

त्याची चौकशी बादशहाने केली त्याची प्रकृती चांगली आहे असे बादशहास कळविण्यात आले रूहुल्ला खानाला मुअज्जमने सैन्यासह मराठ्यांच्या प्रदेशात त्यांना तंबी देण्याच्या कामावर पुढे पाठवले होते…

त्याला हुकूम झाला होता की, त्यांचा पाठलाग करून पकडावे, मारावे, कैद करावे खानजहाॅन बहाद्दुरा कडून समजले की, मराठे त्र्यंबकहून एक तोफ रामसेजकडे नेत होते त्याने त्यांना मारून बहुतेक लोकांना जिवंत पकडून तोफ परत मिळविली….

शिवनेरीच्या ठाणेदाराकडे सयाजी नावाचा मराठयांचा एक नोकर कैदेत होता त्यास सोडवावे म्हणून संभाजी महाराजांचा एक उत्तम सरदार विठोजी काटे याने विनंती केली संगमनेर जवळ मराठे (६-७ हजार) चौथ वसूल करण्यासाठी फिरत होते….

मुजफ्फर खानाच्या फौजा ओंढा पट्ट्याकडे नेमल्या होत्या त्यांनी त्यांना रोखले ठाणेदार नारोजी याने वेढा घालून भोजपूर जवळ लढाई झाली मराठ्यांचा सरदार लखमोजी मेला लखमोजीचे शीर कापून पाठविण्यात आले थाळनेर भागात मराठे चौथ वसुलीसाठी दौडत होते….

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील खवासपूर या गावाजवळ मराठ्यांचे २० हजार लोकांनी तळ दिला होता मुहमंद आज्जम शहाच्या आज्ञेने हसन अलीखान कुलिमखान वगैरेंनी मराठी सेने बरोबर सामना दिला….

स्वत: शहजादा लढाईत पुढे आला मराठ्यांची घोडे आणि हत्यारे गेली आठ मैलांपर्यंत मोघली सैन्याने पाठलाग केला शहजादा घुसलखान्यात असतांना हसनअलीखान कुलिमखान, दिलावरखान यांच्याशी त्याने ३-४ तास खलबत केले….

मराठ्यांवर विजय मिळविल्या बद्दल हसनअली खानास घोडा, खंजीर, बर्हिजी यास खिल्लत व हत्ती, कुलिमखान यास खिलल्त घोडा, खंजीर आणि दिलावरखान यास खिल्लत आणि सोन्याच्या साजासह घोडा अशी बक्षिसे देण्यात आली.

२४ डिसेंबर, १६८२ चे सुमारास मुहंमद आज्जमशहा हा कोल्हापूर बाजूस पन्हाळ्याकडे होता त्याच्या डेऱ्याच्या अलीकडे १०-१२ मैलांवर तो पोहचला असता हंबीरराव मोहित्यांचे २० हजार फौजेपैकी ५ हजार स्वारांनी त्याच्या वेढ्याच्या पिछाडीवर हल्ला करण्याचा बेत ठरविला….

म्हणून शहजाद्याने फिरुझखान आणि राव अनुपसिंह वगैरेंना फौजेसह डेऱ्याच्या पिछाडीवर ठेवले मराठ्यां बरोबर समोरा समोर लढाई झाली बरेच मराठे सैन्य मारले गेले जखमी झाले फिरुझखान जखमी झाला कुलिमखानाने पण बरेच कष्ट घेतले….

बहुतेक मोघली सैन्य कामी आले विजय झाला
कोणाचा? मराठ्यांचा की शहजाद्याचा? बातमीपत्रात मात्र बहुतेक बादशाही सैनिक कामास आले शत्रूचा विजय झाला ही बातमी दिली….

जेधे शकावलीतील नोंद : शके १६०४ दुंदभी संवछरे- माषमासी सुलतान अजमशहा येऊन”
कोल्हापूर पावेतो धाविला त्यास हंबीररायांनी फिराऊन भवरे (भिवरा) पलिकडे लाविले.

या सुमारास संभाजी महाराजांचा सरदार नारो त्रिमल हा मोठे सैन्य घेऊन शिक्रापुरचे भागात गेला असता शिक्रापूरच्या ठाणेदार माणकोजी बरोबर सामना झाला मराठ्यांचे पाच घोडे व चाळीस तलवारी ही त्याचे हाती लागली बरेच लोक जखमी झाले आणि मारले गेले….

शत्रूच्या सैन्याला आपले हद्दीत येऊन देणार नाही म्हणून बादशहा किल्लेदार, ठाणेदार यांचेकडून सैन्य-हमीपत्रे लिहून घेत असे ओझरच्या किल्ल्यातून बाहेर येऊन मराठ्यांनी पालखेड जि.नाशिक येथील चार लोकांना पकड़ून नेले…..

त्याबद्दल बादशहाने दिंडोरी, चांदवड, तिसगांव येथील ठाणेदारांच्या मनसबी कमी केल्या
बिदरला मराठे चौथ वसुलीसाठी गेले असता तेथील ठाणेदार मुकर्रमखान याने मराठयांना
प्रतिकार केला नाही त्यामुळे त्याची मनसब कमी करण्यात आली.

जशी मन्सब कमी करण्यात येत होती तशी चांगली कामगिरी केली की वाढविली जाई….
उदा.उंतूरचा ठाणेदार अहमदखान याने शत्रूवर विजय मिळविला म्हणून त्याची मन्सब वाढविण्यात आली कारण मराठे औरंगाबाद जवळील लासूर येथील जनावरे व तेथील जमीनदाराचा मुलगा यास सामानासह घेऊन जात असता त्याने पाठलाग केला देशमुखाचा मुलगा व जनावरे सोडवून आणली…..

शहाबुद्दीनखान डिसेंबर ९ तारखेला मराठ्यांचे प्रदेशात आला त्याने जवळ जवळ २० गावे लुटली आणि १४ डिसेंबर, १६८२ च्या सुमारास लोहगडा जवळ त्याचा व मराठ्यांचा सामना झाला ६० लोक मेले….

मराठे विसापूर व कुसुर येथे चौथ वसूल करीत असतांना बहुतेकांना मोघली सैन्याने मारले मराठी प्रदेशातील अठरा खेडी लुटली शहाबुद्दीनला बढती मिळाली व खिल्लत, विजया बद्दल फर्मान व तलवार बादशहाने पाठविली….

शेवगांव भागात थाकू वंजारी बादशाही सैन्यास हैराण करीत होता वैजापूर, औरंगाबादकडे ऑक्टोबर, १६८२ चे अखेरीस मराठे मोघल सैन्याच्या चकमकी झाल्या, औरंगजेबाने सगळीकडे सावधानतेचे आदेश दिले होते….

शहजादा आज्जम, मुइजुद्दीन, मुर्करमखान,
शहाबुद्दीनखान, बहरोझखान वगैरेंना आणि सर्व ठाणेदारांना मराठ्यांच्या बंदोबस्ता बद्दल आणि चौथ-वसुलीला पायबंद घालण्या बद्दल एकमेकांस सहाय्य करावे व निष्काळजीपणा करू नये अन्यथा मन्सबी कमी दिल्या जातील

असा कडक आदेश बादशहाने ३१ ऑक्टोबर १६८२ चे सुमारास दिला इ.स.१६८२ मध्ये मोघलांच्या सैन्याची ससेहोलपट मराठा सैन्याने चालविली होती प्रत्येक ठिकाणी त्यांचे बहुतेक लोक कामास येत होते चौथ वसूल करण्यासाठी मोघली प्रदेशावर मराठे झडप घालीत होते….

तर मराठ्यांची ठाणी काबीज करण्यासाठी मोघली सैन्य निकराचे प्रयत्न करीत होते औरंगजेबाच्या अवाढव्य आक्रमणाला तोंड देणे हे अतिशय कठीण काम होते १६८२ हे साल मराठी सैन्याचे अविश्रांत श्रमाचे वर्ष! संभाजी महाराजांची समशेर सगळीकडे तळपत होती.

तेज तेज अन् तेज घेऊनी, सौदामिनी ती लखलखली।

त्या चपलेचे तेज घेऊनी, वीरश्री तव धगधगली।।

त्या बिजलीचा लोळ दिसावा, महाराष्ट्राच्या भूमीत।

सळसळते समशेर शंभुची, महाराष्ट्राच्या भूमीत।।

अशी संभाजी महाराजांची झुंज, झुंज अन् झुंज मराठी मुलखात हैदोस घालणाऱ्या मोघली हशमांची मुंडकी कापीत होती, तर मोघलांच्या सेनापतींची मुंडकी खाली वाकवीत होती!

औरंगजेब हताश झाला-: बादशहाचे दोन्ही शहजादे शहजादा मुअज्जम व शहजादा आज्जम हे रक्ताचे पाणी करीत होते संभाजी महाराजांच्या समशेरीचे पाणी पाहत होते, तर तिसरा शहजादा ‘अकबर’ हा संभाजी महाराजांच्या समशेरीच्या म्यानात अडकला होता!

खानजहाॅन बहाद्दुरखान याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रभा पाहून डोळे पांढरे केले होते आता संभाजी महाराजांच्या पुढे त्याने हात टेकले होते रहुल्लाखान,शहाबुद्दीनखान, बहादुरखान, रणमस्तखान सगळ्यांना संभाजी महाराजांनी वेडे केले होते तर खुद्द अलमारगीर बादशहा वेडापिसा झाला होता….

त्याची मनःस्थिती अतिशय बेचैनीची झाली तो संभाजी महाराजांवर अतिशय चिडला ३० जुलै,१६८२ च्या पत्रातून कारवारकर इंग्रज सुरतकरांना लिहितात

“मोघल बादशहा संभाजी विरुद्ध इतका चिडला आहे की, त्याने आपल्या डोक्याची पगडी (किमॉश) खाली उतरली आणि शपथ घेतली की, त्याला मारल्या शिवाय किंवा राज्यातून हाकलून दिल्या शिवाय मी ती डोक्यावर घालणार नाही अशी त्याने प्रतिज्ञा केली आहे”

औरंगजेबाला दक्षिणेत येऊन १-१॥ वर्ष झाले. प्रचंड सेनादल, भक्कम दारूगोळा, कसलेले सेनानी, अमाप पैसा पणाला लावणाऱ्या औरंगजेबाला डोक्यावरचे किमॉश खाली टाकावयास लावून बोडके व्हावे लागले

यातच संभाजी महाराजांच्या, मराठी सेनेच्या औरंगी अजस्व आक्रमणास तोंड देणाऱ्या विजिगिषु वृत्तीची कल्पना आल्या वाचून राहात नाही….

संदर्भ :- ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा – डॉ सदाशिव शिवदे

Leave a Comment