शूर सेनापती राणोजीराव शिंदे उर्फ सिंधिया
शूर सेनापती श्रीमंत महाराज दत्ताजीराव राणोजीराव शिंदे उर्फ सिंधिया आणि शिंदे घराण्याने केले पराक्रम यांची ओळख फक्त बुराडी घाटा मध्ये दाखवलेले असामान्य पराक्रम पुरता आहे का? महाराष्ट्र मध्ये बहुतांश लोकसंख्या पैकी बऱ्याच लोकांना शूर श्रीमंत महाराज दत्ताजीराव शिंदे यांच्याबद्दल माहिती नसावी. ज्या मंडळी लोकांना माहिती आहे त्या मंडळींना बोराडी घाटामध्ये दाखल असामान्य पराक्रम याच्याबद्दल माहिती असेल. पण सूर दत्ताजीराव शिंदे हे किती महापराक्रमी होते. त्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न.
शूर सेनापती राणोजीराव शिंदे उर्फ सिंधिया
“बचेंगे तो और भी लढेंगे”
हे वाक्य एक शूर सेनापती दत्ताजीराव शिंदे यांच्या मुखातून उद्गारले गेले होते.
सन 1760 ते 1761 या काळ मध्ये या भारताचा देशाने ते राष्ट्रप्रेम पाहिले आणि तो इतिहास अनुभवला. या काळात इतिहास ने एकनिर्णायक मोठी घनघोर लढाई पहिली. लढाई म्हणजे पानिपतची तिसरी लढाई. या लढाईची सुरुवात सतराशेसाठ मध्ये झाली. जेव्हा बुराडी घाटामध्ये मराठा साम्राज्याचे मातब्बर सरदार दत्ताजीराव शिंदे यांची हत्या झाला.तेव्हा पानिपतचे तिसरे युद्ध होण्यास कारणीभूत ठरले.
सण 1707 पासून मराठा साम्राज्य विस्तार करू लागले.
मराठा साम्राज्य प्रमुख विस्तार उत्तरेकडे चालू लागला. या मराठा साम्राज्यविस्तार मध्ये पेशवे, सर्नोबत, सरसेनापती आणि मराठा सरदार आणि कित्येक सरदार घराणी यांचा सिंहाचा वाटा होता. या मध्ये मराठा साम्राज्य प्रमुख आधारस्तंभ पैकी एक ते शिंदे घराणे उर्फ सिंधिया घराणे.
हे शिंदे घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेड या गावचे आहेत. या घराण्यातील मूळ पहिले महापराक्रमी सरदार पुरुष म्हणजे विठोजी शिंदे त्यांची मूळ ओळख वेडात मराठे वीर दौडले सात असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते ते शूर सेनानी पैकी एक विठोजी शिंदे हे होते. व त्यांचे पुत्र जनकोजी राव शिंदे हे पण तसेच पराक्रमी निघाले.आणि इथूनच या शिंदे घराणे या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्या मध्ये सुवर्ण मातब्बर सरदार अर्पण केले.
जनकोजी राव शिंदे यांचे पुत्र रानोजी शिंदे आणि उज्जैन पाशी आपले शिंदे घराण्याचे सत्ता स्थापन केली आणि मराठा साम्राज्य विस्तार मध्ये आपले मोलाचे योगदान देऊ लागले.
राणोजी शिंदे यांचा पराक्रम आणि इतिहास.
१७२७-२८ पासून राणोजी शिंदेचा कार्यकाळ सुरु होतो. माळवा प्रांतातून, चौथ व सरदेशमुखी वसूल करण्यासाठी मल्हारराव होळकर यांच्या जोडीला राणोजी शिंदे यांची नेमणूक होती. माळवा प्रांताचा मोगल सुभेदार गिरीधर बहाद्दर याचा जो निर्णायक पराभव मराठ्यांनी केला त्यात उदाजी पवार, मल्हारराव होळकर यांच्या जोडीला राणोजी शिंदे देखील आपल्या पथकासोबत उपस्थित होते.
१७३५ पासून राणोजी शिंदे यांनी आपले लष्करी मुख्यालय उज्जैन येथेच ठेवले. जुलै १७३६ च्या दरम्यान महादेव भट्ट हिंगणे यास पाठविलेल्या एका पत्राद्वारे राणोजी शिंदे यांची स्वराज्यनिष्ठा आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्व विशेष खुलून दिसते. असे हे राणोजी शिंदे १७३५ ते १७४५ मराठ्यांचे बस्तान बसविण्याच्या कामगिरीत सतत आघाडीवरचं होते.
जयपूरचा शासक सवाई जयसिंह याच्या मृत्यूनंतर त्याच्या गादीवरुन चाललेल्या वारसाहक्कात राणोजी शिंदे यांना ईश्वरसिंहाने विशेष पत्र लिहून मदतीस बोलाविले यावरून त्यांचे त्याकाळचा दरारा देखील लक्षात येतो. या केलेल्या मदतीखातर ६६ लाख रुपये राणोजी शिंदेंना मिळाले. छत्रपती शाहू राजांच्या पदरी असणाऱ्या अशा या रणमर्द सेनानायकाचा १९ जुलै १७४५ रोजी मध्य प्रदेशातील शुजालापूर या ठिकाणी स्वर्गवास झाला.
फोटो: श्रीमंत महाराज राणोजीराव शिंदे
स्थळ शिंदे सरकार वाडा पंढरपूर.
काही चूक झाली असेल तर कृपया माझ्या चुक मला दाखवून द्यावे आणि योग्य ते मार्गदर्शन करावे
मोहित पांचाळ