महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,969

जुन्नर मधील लेण्यांत दुर्मीळ खेळाचे पट

Views: 1414
2 Min Read

जुन्नर मधील लेण्यांत दुर्मीळ खेळाचे पट –

जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील कोरीव लेणी गट समूहाचा अभ्यास करीत असताना काही लेणीमधील सपाट पुष्ठभागावर खोदलेल्या स्वरूपात दुर्मीळ खेळाचे पट आढळले असल्याचे जुन्नरचे प्राचीन इतिहास अभ्यासक बापुजी ताम्हाणे यांनी सांगितले.

बापुजी ताम्हाणे म्हणाले की, जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावरील दक्षिण बाजूची लेणी गट समूहातील लेणी क्रमांक ५९ च्या जोड लेणीतील उजव्या बाजूकडील खोलीतील मोठ्या मंडपात तसेच भिमाशंकर, लेण्याद्री  मधील सातवाहन काळात खोदलेल्या लेणी गट समूहातील लेणीच्या खालील सपाट पुष्ठभागावर अनुक्रमे ‘ वाघ – बकरी व मंकाला,चौसर’  सारख्या दुर्मीळ बैठ्या खेळाचे पट खोदलेले दिसून येतात.

नाणेघाट ,दाऱ्याघाट, माळशेज अशा व्यापारी मार्गाने कल्याण, सोपारा, भंडोज बंदरातून समुद्रमार्गे पश्चिमात्य देशात व्यापार होत असताना कधीतरी मध्ययुगीन काळात जुन्नरला हा बैठा खेळ त्यानी आपल्या सोबत आणला असावा. शिवनेरी किल्ला लेणी परिसरात असणारे शिपाई, व्यापारी, पहारेकरी, डोगरावर गुरे चारण्यासाठी येणारे गुराखी किंवा अन्य लोक हे खेळ खेळत असणार हे नक्कीच असावेत.

वाघ – बकरीचा हा बुध्दीबळासारखा खूप रोमांचक खेळ आहे. ह्या बैठ्या खेळात दोन खेळाडू असतात. एखाद्या खेळाडू कडे समजा  ४ वाघ आहेत .आणि दुसऱ्या खेळाडू कडे समजा २० शेळ्या आहेत. वाघांच्या खेळाडू ला सर्व बकऱ्याची शिकार करावी लागते आणि बकरी खेळाडूला वाघाला अडवावे लागते. जर खेळातील खेळाडूने समजा वाघाने सर्व बकऱ्याची शिकार केली तर वाघ खेळाडू वादक विजयी होईल. जर खेळातील खेळाडू बकरीने एकत्र वाघास एखाद्या दुर्गम ठिकाणी रोखले तर शेळी खेळाडू जिकला असे समजावे.

अशा प्रकारचा बैठा पट खेळ लहानांपासून वृध्दांपर्यत सर्वानाच मनोरंजन, विरगुंळ्याची गरज त्या काळी भासत असेलच मुख्य म्हणजे हे बैठे खेळ खेळण्यासाठी लागणारी सामग्री अतिशय साधी असते.

अशा प्रकारच्या बैठे खेळाचे पट भाजे, र्काला, पातळेश्वर,रायगड, जेजूरी, सिंहगड  अन्य कित्येक गड किल्ले व लेण्या ह्यामधून खोदलेले दिसतात .अशा प्रकारचे बैठे ‘बाघ – बकरी व मंकाला, चौसर’ खेळ वेळ घालवण्याचे व बुध्दिला चालना देण्यासाठी आजही खेडेगावातून खेळले जातात असे बापुजी ताम्हाणे, जुन्नर यानी सांगितले.

बापुजी ताम्हणे, गोळेगांव – लेण्याद्री ( जुन्नर )
( जुन्नर परिसरातील इतिहासाचे अभ्यासक )

Leave a Comment