शिवजन्माच्या नोंदी –
१९ फेब्रुवारी १६३० शुक्रवार , शके १५५१ फाल्गुन वद्य तृतीया शिवनेरी गडावर स्वराज्याच्या सूर्य उगवला . छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म दिवसाच्या नोंदी अनेक समकालीन व उत्तरकालीन साधनांमध्ये आढळून येतात . सदर शिवजन्माच्या नोंदी लेखात निरनिराळ्या साधनांचे लेखनवर्ष व त्या साधनांत आढळून येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म नोंदी व त्यातील त्रुटी यांचा उल्लेख करण्यात आला आहे . कालगणनेनुसार शके १५४९ रोजी प्रभव संवत्सर , वैशाख शुक्ल १ रोजी शुक्रवार , वैशाख शुक्ल २ रोजी शनीवार , वैशाख शुक्ल ५ रोजी मंगळवार , वैशाख शुक्ल २ रोजी भरणी नक्षत्र होते . खालील निरनिराळ्या साधनांत ह्याबाबत चुकीच्या नोंदी आढळून येतात . सदर शिवजन्माच्या नोंदी लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म दिवसाच्या नोंदी व त्यातील त्रुटी या विषयापुरताच मर्यादित आहे.
(१) रायरी बखर ( लेखनकाळ १७७० ) :-
जन्म दिनांक :- शके १५४८ , क्षय , वैशाख शुक्ल ५ , सोमवार
त्रुटी : – वर्षाचे नाव व वार चुकीचा . तिथी वार जुळत नाहीत
(२) ९१ कलमी बखर ( लेखनकाळ १७७० ) :-
जन्म दिनांक :- शके १५५९ क्षय, वैशाख शुक्ल ५ , सोमवार
त्रुटी :- वर्षाचे नाव (शक संवत्सर) चुकीचे व वार चुकीचा .
(३) तारिख – इ – शिवाजी ( लेखनकाळ १७८० ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ . क्षय , वैशाख शुक्ल ५
त्रुटी :- वर्षाचे नाव (शक संवत्सर) चुकीचे , वार दिला नाही .
(४) प्रभानवली शकावली ( लेखनकाळ १७९८ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ , विभव
त्रुटी :- वर्षाचे नाव (शक संवत्सर) चुकीचे, अर्धवट नोंद .
(५) धडफळे यादी ( लेखनकाळ १८०७ ) :-
जन्म दिनांक :- शके शके १५४९, प्रभव
त्रुटी :- वर्षाचे नाव (शक संवत्सर) चुकीचे, अर्धवट नोंद .
(६) चिटणीस बखर ( लेखनकाळ १८१० ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ प्रभव, वैशाख शुक्ल २ , गुरुवार
त्रुटी :- वार आणि तिथी जुळत नाहीत
(७) मराठा साम्राज्याची छोटी बखर ( लेखनकाळ १८१७ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ , क्षय, वैशाख शुक्ल ५ , सोमवार
त्रुटी : – वर्षाचे नाव (शक संवत्सर) चुकीचे आणि वार चुकीचा .
(८) शिव दिग्विजय बखर ( लेखनकाळ १८१८ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९, प्रभव , वैशाख शुक्ल २ , गुरुवार , रोहिणी नक्षत्र
त्रुटी :- वार आणि तिथी , नक्षत्र जुळत नाही
(९) नागपूर भोसले बखर ( लेखनकाळ १८२२ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ , प्रभव वैशाख शुक्ल २ गुरुवार
त्रुटी :- वार आणि तिथी जुळत नाही
(१०) छत्रपती वंशाची यादी ( लेखनकाळ १८२२ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ वैशाख शुक्ल ५
त्रुटी :- वर्षाचे नाव (शक संवत्सर) चुकीचे , अर्धवट नोंद
(११) शिवाजी प्रताप ( लेखनकाळ १८२९ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ , रक्ताशी
त्रुटी:- वर्षाचे नाव (शक संवत्सर) चुकीचे , अर्धवट नोंद
(१२) रामदासी शकावली ( लेखनकाळ १८३१ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ , रक्ताशी
त्रुटी:- वर्षाचे नाव (शक संवत्सर) चुकीचे, अर्धवट नोंद
(१३) विजयदुर्गची हकीकत ( लेखनकाळ १८३५ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ , समान अश्रिफ अलफ कृष्ण -२
त्रुटी:- मुस्लिम वर्ष चुकीचे ,अर्धवट नोंद
(१४) पंतप्रतिनिधी बखर ( लेखनकाळ १८४४ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ प्रभव, वैशाख पौर्णिमा सोमवार
त्रुटी :- वार आणि तिथी जुळत नाही
(१५) पंडितराव बखर ( लेखनकाळ १८४८ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ , प्रभव
त्रुटी :- अर्धवट नोंद
(१६) शेडगावकर बखर ( लेखनकाळ १८५४ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९ प्रभव वैशाख शुक्ल ३, शनिवार ,रोहिणी नक्षत्र, कर्क लग्न
त्रुटी:- माहितीचा परस्परांशी संबंध जुळत नाही
(१७) इतिहास भिडे ( लेखनकाळ १८६६ ) :-
जन्म दिनांक :- शके १५४९, प्रभव, वैशाख शुक्ल ३, शनिवार
त्रुटी :- वार व दिवस जुळत नाहीत
(१८) दासपंचायतन शकावली ( लेखनकाळ १७३५ ) :-
जन्म दिनांक :- शके १५५१
त्रुटी : – अर्धवट नोंद
(१९) स्प्रिंगेलचा इतिहास ( लेखनकाळ १७९१ ) :-
जन्म दिनांक :- सन १६२९
त्रुटी :- अर्धवट नोंद
(२०) तंजावरचा शिलालेख ( लेखनकाळ १८०३ ) :-
जन्म दिनांक :- शके १५५१
त्रुटी :- अर्धवट नोंद
(२१) मराठयांची बखर ( लेखनकाळ १८२९ ) :-
जन्म दिनांक :- सन १६२७
त्रुटी :- अर्धवट नोंद
समकालीन आणि विश्वासनीय अश्या शिवभूषण ( लेखनकाळ १६७० ) , सभासद बखर ( लेखनकाळ १६९५ ) , चित्रगुप्त बखर ( लेखनकाळ १७६० ) आणि शिवकाव्य संकर्षण संकळकळेकृत ( लेखनकाळ १८२० ) यामध्ये शिवजन्माची नोंद दिली गेली नाही.
(२२) शिवभारत ( लेखनकाळ १६६५ – १६७० ) :-
जन्म दिनांक :- शके १५५१ फाल्गुन वद्य ३ ,शुक्रवार
नोंद बरोबर
(२३) राज्याभिषेख शकावली ( लेखनकाळ १६७४ ) :-
जन्म दिनांक :- शके १५५१ , फाल्गुन वद्य ३ , शुक्रवार , शुक्ल संवत्सर
नोंद बरोबर
(२४) जेधे शकावली ( लेखनकाळ १६९५ ) :-
जन्म दिनांक :- शके १५५१ शुक्ल , फाल्गुन वद्य ३ ,शुक्रवार
नोंद बरोबर
(२५) जोधपूर कुंडली ( लेखनकाळ १७०० ) :-
जन्म दिनांक :- संवत १६८६ फाल्गुन वद्य ३ शुक्रवार
नोंद बरोबर
(२६) बिकानेर कुंडली :-
जन्म दिनांक :- संवत १६८६ फाल्गुन वद्य ३ भृगो रात्री
नोंद बरोबर
(२७) बनेडा कुंडली :-
जन्म दिनांक :- संवत १६८६ चैत्र वद्य ३ शुक्रवार
नोंद बरोबर
(२८) फोर्बचा संग्रह ( लेखनकाळ १६७४ ) :-
जन्म दिनांक :- शके १५५१ फाल्गुन वद्य ३ – नोंद बरोबर
संदर्भ :-
शिवाजी महाराजांचा जन्म दिनांक :- मोहन आपटे.
शककर्ते शिवराय :- विजयराव देशमुख.
श्री. नागेश मनोहर सावंत.