रेवदंडा किल्ला –
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्याचे ठिकाणाहून २० किमी अंतरावर चौल आणि रेवदंडा हि प्राचीन गावे वसलेली आहेत. ६ व्या शतकात मौर्यांच्या राजवटीत चौल व रेवदंडा ही बंदरे म्हणुन भर-भराटिला आली याच ठिकाणाहून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे. निजामशाहीच्या काळात रेवदंडा हा चौलचाच भाग होतापण पुढे १५२८ मधे पोर्तुगीज कप्तान सोज याने रेवदंडाचे महत्व ओळखून येथ किल्ला बांधला कुंडलिका नदी जेथे सागराला मिळते तेथे रेवदंडा किल्ला आहे
रेवदंडा किल्ल्याचा संपूर्ण परीघ ५ किमी.चा आहे रेवदंडा किल्ल्याचा विस्तार जरी बराच मोठा असला तरी याची बऱ्यापैकी तटबंदी आजही चांगल्या स्थितीत शाबूत आहे. या किल्ल्यावरील ८०% दुर्गावशेश नारळी, पोफळि व आंब्याच्या बागेत हरउन गेले आहेत त्यामुळे आपल्याला हे अवशेष तुटक-तुटक पहावे लागतात..
रेवदंड्याच्या समुद्राकडील दरवाज्याने किनाऱ्यावरील वाळूच्या पुळणवर उतरायचे समोरच कुंडलिक नदीच्या काठावरिल टेकडीवर कोर्लई किल्ला आपनास सहजपणे न्याहाळता येतो रेवदंडा किल्ल्यावरील सप्तखणि मनोऱ्याचे चार मजले आजही शाबूत असून या सातमजलि मनोऱ्यास ‘पोर्तुगीज आरमाराचा रखवालदार’ असे म्हणतात या मनोऱ्यावरून उत्तरेला मुंबई पर्यंत व दक्षिणेस जंजिऱ्यापर्यंत टेहळणी करता येत असे १५५८ मध्ये कॅप्टन सोज याने हा किल्ला बांधला १६३६ मध्ये शहाजीराजांनी रेवदंड्याच्या कॅप्टनला आपण आदिलशाही व मोगलांविरुध निजामशाही वाचवण्यासाठी लढत आहोत तेव्हा आपले कुटुंब किल्ल्यात ठेवण्यास परवानगी द्यावी व वेळप्रसंगी आपण स्वतः आश्रयाला येउ असे लिहिले होते पण पोर्तुगीजांनी मोगलांच्या भीतीने परवानगी नाकारली..
संभाजीराज्यांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी ६००० पायदळ व २००० घोडदळासह रेवदंडा किल्ल्यास वेढा घातला होता पोर्तुगीजांनी चानाक्ष पणे रेवदंडा किल्ल्याचा वेढा उठवावा म्हणुन फोंडा किल्ल्यावर स्वारी केली तेव्हा संभाजी महाराजांनी वेढ्याचि सूत्रे निळोपंताना देउन फोंडा किल्ल्याच्या मदतीला धावले अखेर मराठ्यांना हा वेढा उठावावा लागला..
पुढे १७३७ मध्ये मराठे व पोर्तुगीज यांच्यात उत्तर कोकणात लढाइस सुरुवात झाली या वेळी पोर्तुगीजांचि सारी ठाणि जिंकुन घ्यायचीच अशा इर्षेपोटी मराठे पेटून उठले होते मराठ्यांना वसइचा बलाढ्य किल्ला जिंकला पण रेवदंडा काही त्यांना जिंकता आला नाही.
– गोपाळ निकुंभ