महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,14,034

शालिवाहन शकाचा उदय

Views: 4268
2 Min Read

शालिवाहन शकाचा उदय

आज आपण जे शालिवाहन शक वापरतो ते ख्रिस्तीवर्षाच्या पहिल्या शतकात ७८ व्यावर्षी सुरु झाले, ते कसे ? चला जाणुन घेउया.Rise of Shalivahan Shaka.

पहिल्या शतकात महाराष्ट्रावर क्षहरातक्षत्रप घराण्यातील राजा नहपान हा ४६ वर्षापासून राज्य करीत होता क्षत्रप आणि सातवाहनांमधे वारंवार होत असलेल्या युद्धाला इतिहास साक्षी आहे पण पहिल्या शतकाच्या ७८ व्यावर्षी नासिक येथिल गोवर्धन येथे सातवाहन (शालीवहान) राजा गौतमीपुत्र सातकर्णी आणि क्षत्रपनहपान यांच्यामधे त्याकाळातील सर्वात मोठे युद्ध झाले व त्या युद्धात नहपान राजा हरला व त्याचे शिरच्छेद केले. ह्या युद्धाचा उल्लेख नाशिक लेणी मध्ये सातकर्णी राजाची आई गौतमीबलश्री हिने शिलालेख कोरलेला आहे.

ह्या युद्धानंतर गौतमीपुत्र सातकर्णी राजाने नहापानराजाचे नाणे जमा करुन त्यावर स्वतःचा शिक्का उमटउन त्याच्या नावाने ते पुन्हा चलनात आणले. सातवाहनांनी क्षहरात वंशाचा अस्त केला. क्षहरातांच्या अस्तानंतर क्षत्रपांचे नविन घराणे उदयास आले ‘कार्दमक’.
कार्दमक घराण्यातील पहिला राजा चष्टन गादीवर आला आणि त्यानी जे शक सुरु केले त्याला आपण शालिवाहन शक असे संबोधतो आणि नंतर त्याला काहींनी “शकराजांचासंवत” असेही संबोधले. चष्टनानी आणि त्यानंतरच्या सर्व कार्दमक घराण्यातील राज्यकर्यांनी शालिवाहन शकाचा वापर जवळजवळ ३०० वर्ष केलेला दिसतो, आणि सातवाहनांनी या शकाचा वापर केलेला दिसत नाही.

 

Rise of Shalivahan Shaka
नहपानाला हरविल्या नंतर गौतिमीपुत्राने पुनर्मुद्रित केलेल्या नाण्याचा फोटो.

ज्या दिवशी चष्टन गादीवर बसला त्या दिवशी त्याने जे शक सुरु केले त्याला आपण “शालिवाहनशक” असे संबोधतो.इ.स. ७८ मधे हे शक चष्टनाने सुरु केले आणि या घटनेला १९४० वर्ष पुर्ण झाली !
अशी आहे या शालिवाहन शकाची गोष्ट !

संदर्भ-
सातवाहनकालीनमहाराष्ट्र.
सातवाहनआणिपश्चिमीक्षत्रपांचाइतिहासआणिकोरीवलेख- वा.वि.मिराशी
चष्टनानेसुरुकेलेशालिवाहनशक- डॉ.मंजिरीभालेराव.
©आशुतोष पाटील.
नाणी संग्राहक आणि अभ्यासक
[email protected]

 

Leave a Comment